Breaking News

ग्रामपंचायत निवडणूकीतील तब्बल २ लाख १४ हजार ८८० उमेदवारांचे भवितव्य पेटीबंद निवडणुकांसाठी सरासरी ७९ टक्के मतदान

मुंबई : प्रतिनिधी

राज्यातील ३४ जिल्ह्यांतील सुमारे १२ हजार ७११ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकींत प्राथमिक अंदाजानुसार सरासरी ७९ टक्के मतदान झाले, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे दिली.

मदान यांनी सांगितले की, राज्यातील सुमारे १४ हजार २३४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा ११ डिसेंबर २०२० रोजी करण्यात आली होती. त्यातील काही ग्रामपंचायतींच्या निवडणुका पूर्णत: तर काही ग्रामपंचायतींच्या निवडणुका अशंत: बिनविरोध झाल्या आहेत. सरपंच व सदस्यपदाच्या लिलावप्रकरणी नाशिक जिल्ह्यातील उमराणे (ता. देवळा) आणि नंदुरबार जिल्ह्यातील खोंडामळी (ता. नंदुरबार) ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रिया रद्द केली. गडचिरोली जिल्ह्यातील सहा तालुक्यांतील १६२ ग्रामपंचायतींसाठी २० जानेवारी २०२१ रोजी मतदान होणार आहे. अशा विविध कारणांमुळे आज प्रत्यक्षात १२ हजार ७११7 ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले. गडचिरोली जिल्ह्यात २२ जानेवारी २०२१ रोजी; तर अन्य सर्व जिल्ह्यांत १८ जानेवारी २०२१ रोजी मतमोजणी होईल.

आज मतदान होत असलेल्या ग्रामपंचायतींच्या १ लाख २५ हजार ७०९ जागांसाठी एकूण ३ लाख ५६ हजार २२१ उमेदवारी अर्ज प्राप्त झाले होते. छाननी आणि माघारीनंतर २ लाख ४१ हजार ५९८ उमेदवार शिल्लक होते. त्यापैकी २६ हजार ७१८ उमेदवार बिनिविरोध विजयी घोषित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे अंतिमत: २ लाख १४ हजार ८८० उमेदवार आज प्रत्यक्ष निवडणूक रिंगणात होते. त्यासाठी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळत मतदान झाले. अनेक ठिकाणी सायंकाळी उशिरापर्यंत मतदानासाठी मतदारांच्या रांगा होत्या. गडचिरोली जिल्ह्यात आणि गोंदिया जिल्ह्यातील चार तालुक्यांत मात्र दुपारी ३ पर्यंतच मतदानाची वेळ होती, असेही त्यांनी सांगितले.

ग्रामपंचायत निवडणुकांसाठी मतदान झालेल्या जिल्हानिहाय ग्रामपंचायतीची संख्या:

ठाणे- १४३, पालघर- ३, रायगड- ७८, रत्नागिरी- ३६०, सिंधुदुर्ग- ६६, नाशिक- ५६५, धुळे- १८२, जळगाव- ६८७, नंदुरबार- ६४, अहमनगर- ७०५, पुणे- ६४९, सोलापूर-५९३, सातारा-६५२, सांगली-१४२ , कोल्हापूर- ३८६, औरंगाबाद- ५७९, बीड- ११११, नांदेड- १०१३, परभणी- ४९८, उस्मानाबाद- ३८२, जालना- ४४६, लातूर- ३८३, हिंगोली-४२१ , अमरावती- ५३७, अकोला- २१४, यवतमाळ- ९२५, वाशीम- १५२, बुलडाणा- ४९८, नागपूर- १२७, वर्धा- ५०, चंद्रपूर-६०४, भंडारा- १४५, गोंदिया- १८१ आणि गडचिरोली- १७०. एकूण- १२,७११.

ग्रामपंयात निवडणूक एक दृष्टिक्षेप

  • निवडणूक जाहीर ग्रामपंचायती- १४ हजार २३४
  • आज प्रत्यक्ष मतदान झालेल्या ग्रामपंचायती- १२ हजार ७११
  • एकूण प्रभाग- ४६,९२१
  • एकूण जागा- १ लाख २५ हजार ७०९
  • प्राप्त उमेदवारी अर्ज- ३ लाख ५६ हजार २२१
  • अवैध नामनिर्देशनपत्र- ६ हजार ०२४
  • वैध नामनिर्देशनपत्र- ३ लाख ५० हजार १९७
  • मागे घेतलेली नामनिर्देशनपत्र- ९७ हजार ७१९
  • बिनविरोध विजयी होणारे उमेदवार- २६ हजार ७१८
  • अंतिम निवडणूक रिंगणातील उमेदवार- २ लाख १४ हजार ८८०

 

Check Also

नरेंद्र मोदी यांचा आरोप, … लूट करण्याचा कट उधळल्याने काँग्रेस हादरली

जनतेची संपत्ती हिसकावून त्यांच्या विशेष लोकांमध्ये वाटून घेण्याचा काँग्रेसचा कट उघड केल्यामुळे संपूर्ण काँग्रेसमध्ये खळबळ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *