Breaking News

राज्यपाल कोश्यारी यांच्या विमान वापरावरून भाजपा नेते काय म्हणाले? वाचा तर मग

मुंबई : प्रतिनिधी

अत्यंत दुर्दैवी घटना- देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्रात आजपर्यंत अशी घटना यापूर्वी कधी घडलेली नाही. राज्यपाल हे व्यक्ती नाही एक पद आहे. व्यक्ती येतात आणि जातात. परंतु, विमानात बसेपर्यंत जाणीवपूर्वक परवानगी देण्यात आली नाही. मुख्यमंत्र्यांनी एवढा एवढा अहंकार बाळगणे योग्य नाही.  आजपर्यंत मी एवढे इगोस्टीक सरकार कधी पहिले नाही,अशी टीका विरोधी पक्षनेते देवैंद्र फडणवीस यांनी केली आहे.

राज्यपालांची सरकारने माफी मागावी- सुधीर मुनंगटीवार

सरकारकडून असे घडले असेल तर त्यानी क्षमा मागून हा विषय येथेच थांबवावा. कोणत्या अधिकाऱ्याकडून घडले असेल तर त्याला तात्काळ बडतर्फ करण्यात यावे तसेच सरकारने राज्यपालांची माफी अशी मागणी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केली.

ठाकरे सरकारने प्रथा-परंपरांना हरताळ फासला -प्रवीण दरेकर

राज्यपाल हे संविधानिक पद आहे. त्याची गरिमा राखली पाहिजे. मात्र सूडभावना किती नसानसात भरली आहे. सगळ्या प्रथा, परंपरा या सर्वांना हरताळ भासण्याचे काम या सरकारने केलं, अशी घणाघाती टीका प्रवीण दरेकर यांनी केली.

हा तर सरकारच्या मनाचा कद्रूपणा- भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना विमान प्रवास नाकारणे म्हणजे राज्य सरकारच्या मनाचा कद्रूपणा आहे. आम्हाला जे हवे तेच आम्ही करणार अशी ताठर भूमिका सरकार घेत आहेत. कारण या सरकारला लोकांनी निवडून दिले नाही, त्यामुळे आम्ही जनतेला उत्तर देण्यास बांधील नाही अश्या अर्विभावात सरकार वागत असल्याची जोरदार टिका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

Check Also

चंद्रकांत पाटलांची शिवसेनेला पिंजऱ्यातील वाघाची उपमा वाढदिवसानिमित्त प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया

पुणे: प्रतिनिधी आमची दोस्ती जंगलातील वाघाशी होते. पिंजऱ्यातील वाघाशी नाही. वाघ जोपर्यंत पिंजऱ्याबाहेर बाहेर होता …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *