Breaking News

राज्यपालांकडून शेतकऱ्यांना हेक्टरी ८ हजाराची मदत जाहीर बागायतदारांना १८ हजार रूपयांची मदत

मुंबईः प्रतिनिधी
राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर अवकाळी पावसामुळे आर्थिक संकटात सापडलेला शेतकरी वाऱ्यावर असल्याची टीका सर्वच पक्षांकडून होवू लागली. याची गंभीर दखल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी घेतली असून शेतकऱ्यांना तातडीने मदत म्हणून हेक्टरी ८ हजाराची तर बागातयतदारांना १८ हजार रूपयांची मदत जाहीर केली.
राज्यातील कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी किमान २ हेक्टर पर्यंत जमिन असलेल्या शेतकऱ्यांना ८ हजार रूपयांची मदत मिळणार आहे. तर २ हेक्टरपर्यंतची जमिन असलेल्या बागायतदारांना १८ हजार रूपयांची मदत देण्यात येणार असून ही मदत तात्काळ शेतकऱ्यांना देण्यात यावी असे स्पष्ट निर्देशही त्यांनी दिले.
याशिवाय नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांना शेतसारा, शालेय विद्यार्थ्यांना परिक्षा फी माफ करण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी जाहीर केले.

Check Also

मुख्यमंत्र्यांनी दिली शेतकऱ्यांना ही ग्वाही म्हणाले… मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कृषी संजीवनी मोहिमेचा समारोप

मुंबई : प्रतिनिधी शेतकरी महाराष्ट्राचे वैभव असून त्यांच्या  हिताला धक्का पोहचेल असे निर्णय घेणार नाही …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *