Breaking News

शासकिय नियमाचा गृहनिर्माण मंत्र्यांकडूनच भंग बैठका टाळण्याचे आदेश असतानाही बंगल्यावर अधिकारी विकासकांसोबत बैठका

मुंबईः विशेष प्रतिनिधी
दिवसेंदिवस कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासकिय कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या संख्यावर नियंत्रण आणि मंत्रालयासह शासकिय कार्यालयांमध्ये बैठकांचे आयोजन करू नये असे आदेश नुकतेच काढले. मात्र या आदेशालाच केराची टोपली दाखवित गृहनिर्माण मंत्री डॉ.जितेंद्र आव्हाड यांनी स्वतःच्या बंगल्यावर विकासक, अधिकाऱ्यांचा दिवसभर बैठकांचा धडाका लावल्याची माहिती पुढे आली आहे.
कोरोना व्हायरसचा आजार हा संसर्गातून वाढत असल्याने शासकिय कार्यालयात बैठक घेवू नये, तसेच आवश्यकताच असेल बैठकांचे आयोजन करावे मात्र आसनव्यवस्था दाटीवाटीची किंवा योग्य ते अंतर ठेवावे असे आदेश सामान्य प्रशासन विभागाने काढलेल्या आदेशात म्हटले आहे. तरीही गृहनिर्माण मंत्री आव्हाड मंत्रालयासमोरील ए-२ या आपल्या बंगल्यावर म्हाडा, एसआरए आणि गृहनिर्माण विभागाच्या अधिकाऱ्यांना पाचारण केले. विशेष म्हणजे या बैठका घेताना बिल्डर्संनाही मंत्र्याने बोलाविल्याने त्यांच्या बंगल्यावर एकच गर्दी झाल्याचे चित्र पाह्यला मिळाले.
त्याचबरोबर त्यांच्या बंगल्याबाहेर तर गाड्यांची आणि अधिकाऱ्यांची आणि विकासकांची एकच गर्दी झाल्याने सामान्य प्रशासन विभागाने जारी केलेल्या आदेशालाच हरताळ फासला गेला आहे.
विशेष म्हणजे या बैठका म्हणजे एसआरएचे २० वर्षापासून रखडलेले प्रकल्प, विकासकांना अडचणीच्या ठरत असलेल्या अटींमध्ये करावयाचे बदल या सारख्या विषयांवर विकासक आणि म्हाडा, एसआरए आणि गृहनिर्माण अधिकाऱ्यांच्या संयुक्त बैठक घेण्यात येत होत्या. या गर्दीमधूनच जर एखाद्या अधिकारी किंवा विकासकाला किंवा स्वतः मंत्र्यांना कोरोना व्हायरसचा संसर्ग झाल्यास त्यास जबाबदार कोणाला धरावयाचे असा सवाल या सर्वांकडूनच विचारण्यात येत आहे.
संसर्ग टाळण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे निवडक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत व्हिडीओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून बहुतांष बैठका घेत आहेत.

corona -meeting awhad (बैठकांबाबतचे शासन आदेश)

Check Also

नरेंद्र मोदी यांचा आरोप, … लूट करण्याचा कट उधळल्याने काँग्रेस हादरली

जनतेची संपत्ती हिसकावून त्यांच्या विशेष लोकांमध्ये वाटून घेण्याचा काँग्रेसचा कट उघड केल्यामुळे संपूर्ण काँग्रेसमध्ये खळबळ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *