Breaking News

रायगडच्या कुमार अक्षय ष्ण्‍मुगम स्ट्रॉगमॅन सलग दुसऱ्यांदा किताब ५ सुवर्ण, ११ रौप्य आणि १ कास्ये मिळून १७ पदकांचे अभुतपुर्व आणि घवघवीत यश

मुंबई: प्रतिनिधी
राज्य पॉवरलिप्टींग संघटना आणि गिरणी कामगार क्रिडा भवन, परळ यांच्या संयुक्तपणे रविवार दिनांक 2 व 3 नोव्हेंबर,2019 रोजी राज्यस्तरीय इंक्विप(साधनसहित) आणि अनइंक्विप (साधनविरहित) बेंचप्रेस पॉवरलिप्टींग स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धेत रायगड जिल्हयाचा कुमार अक्षय ष्ण्‍मुगम “सिनियर स्टेट अनइंक्विप स्ट्र्रॉगमॅन बेन्चप्रेस” किताबाचा मानकरी ठरला, कुमार अक्षयने सलग दुस-यांदा किताब विजेता होण्याचा सन्मान मिळवीला आहे.
रायगड जिल्हयातील ग्रामीण भागातील महिला व पुरुष अशा एकुण 46 खेळाडूनी सदर स्पर्धेत सहभाग नोंदवला आहे. या यशाबददल रायगड जिल्हयाचे मानद सचिव अरुण लक्ष्मण पाटकर आणि अध्यक्ष गिरीश वेदक सचिन भालेराव, राहुल गजरमल, यशवंत मोकल आणि संजय सरदेसाई (राज्य संघटना मानद सचिव) यांनी आनंद व समाधान व्यक्त केले.
आगामी राष्टीय स्पर्धेत अशीच उत्तम कामगिरी रायगड जिल्हयाचे खेळाडू राष्ट्रीय पातळीवर नाव उज्वल करतील अशी आशा व्यक्त केली.
पदके विजेते खेळाडू पुढील प्रमाणे :- 59- किलो वजनी (कनिष्ठ) गट -बबन झोरे (रौप्य), 59- किलो वजनी (एम-1)- गट- विनायक पाटील (सुवर्ण), महेश पाटील (रौप्य), 66 किलो वजनी गट (एम-1)- संतोष गावडे, 66 किलो वजनी गट (वरीष्ठ)-निलेश पाटील (सुवर्ण), प्रतिम मंडल (रौप्य), 66 किलो वजनी गट (कनिष्ठ)- मनिष पाटील (रौप्य), रविराज घाडगे- (कास्य), 74 किलो वजनी गट (कनिष्ठ)- अक्षय ष्ण्‍मुगम (सुवर्ण), 93 किलो वजनी गट (उपकनिष्ठ)- शुभव विचारे-(रौप्य), 120 किलो वजनी गट (कनिष्ठ)- सरवर पाटील-(रौप्य),
महिला 52- किलो वजनी (कनिष्ठ) गट, वैष्ण्वी चव्हाण (रौप्य), 57- किलो वजनी अक्षता भोसले-(रौप्य), 59- किलो वजनी (उपकनिष्ठ) गट- अनुराग कांबळे -(सुवर्ण), 66- किलो वजनी (कनिष्ठ) गट -प्रज्ञा पवार-(रौप्य)

Check Also

मुख्यमंत्र्यांची ग्वाही, खटला जलदगती न्यायालयात चालवून पीडीतेला न्याय देणार गृहमंत्री, मुंबई पोलिस आयुक्तांशी चर्चा

मुंबई : प्रतिनिधी साकिनाका परिसरात घडलेल्या दुर्दैवी घटनेची मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *