Breaking News

गणेशोत्सवासाठीची कोंकण रेल्वेची पहिली रेल्वे उद्या धावणार उद्यापासून बुकींग आणि गाडी धावणार

मुंबई : प्रतिनिधी

गणेशोत्सव काळात मुंबईतील चाकरमान्यांना कोकणातील आपल्या गावी जाण्यासाठी रेल्वे सुरू करावी अशी मागणी सातत्याने करण्यात येत होती. त्यास अखेर यश आले असून १५ ऑगस्ट २०२० पासून कोकणात जावू इच्छिणाऱ्या चाकरमान्यांसाठी कोकण रेल्वे मार्गावर २०० गाड्या धावणार असल्याची माहिती कोकण आणि मध्य रेल्वेने एका प्रसिध्दी पत्रकान्वये आज जाहीर केले.

तसेच या विशेष रेल्वे गाड्यांकरिता उद्या १५ ऑगस्ट २०२० पासून आरक्षण सुविधा सुरु होणार असल्याचेही रेल्वेकडून जाहीर करण्यात आले.

मुंबईतून सुटणाऱ्या गाड्या

०११०७- लोकमान्य टिळक टर्मिनस ते रत्नागिरी-दररोज

१५ ते २२ ऑगस्ट याकालावधीत दररोज धावणार

०११०८- रत्नागिरी ते लोकमान्य टिळक टर्मिनस-दररोज

१६ ते २३ ऑगस्ट रोजी दररोज धावणार

या गाडीला ठाणे, पनवेल, रोहा, माणगांव, वीर, खेड, चिपळूण, सार्वडा, अरवली रोड आणि संगमेश्वर रोड स्थानकात थांबा देण्यात आलेला आहे.

 

०११०५- मुंबई सीएसएमटी ते सावंतवाडी रोड- दररोज

१५ ते २२ ऑगस्ट दरम्यान दररोज धावणार

०११०६ सावंतवाडी ते मुंबई सीएसएमटी-दररोज

१६ ते २३ ऑगस्ट दररोज धावणार

या गाडीला दादर, ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, सार्वडा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदूर्ग आणि कुडाळ स्थानकात थांबा देण्यात आला आहे.

 

०११०१-मुंबई सीएसएमटी ते सावंतवाडी रोड-दररोज

१५ ते २२ ऑगस्ट दरम्यान दररोज धावणार

०११०२ सावंतवाजी रोड ते मुंबई सीएसएमटी

१६ ते २३ ऑगस्ट दरम्यान दररोज धावणार

या गाडीला दादर, ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, सार्वडा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदूर्ग आणि कुडाळ स्थानकात थांबा देण्यात आला आहे.

 

०११०४- लोकमान्य टिळक टर्मिनस ते कुडाळ-दररोज

१५ ऑगस्टपासून ते २२ ऑगस्टपर्यत दररोज धावणार

०११०५ कुडाळ ते लोकमान्य टर्मिनस

१६ ते २३ ऑगस्ट दरम्यान दररोज धावणार

थांबा-ठाणे, पनवेल, रोहा, माणगांव, वीर, खेड चिपळूण, सार्वडा, अर्वली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगांव रोड, कणकवली आणि सिंधुदूर्ग स्टेशन

 

०१११३-लोकमान्य टिळक टर्मिनस ते सावंतवाडी रोड- दररोज

२४ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर दरम्यान दररोज धावणार

०१११४ सावंतवाडी रोड ते लोकमान्य टिळ‌क टर्मिनस-दररोज

२४ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर दरम्यान दररोज धावणार

थांबा- ठाणे, पनवेल, रोहा, माणगांव, वीर, खेड, चिपळूण, सार्वडा, अर्वली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगांव रोड, कणकवली, सिंधुदूर्ग आणि कुडाळ रेल्वे स्थानक.

 

०११११- मुंबई सीएसएमटी ते सावंतवाडी रोड- दररोज

२५ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर दरम्यान दररोज धावणार

०१११२ सावंतवाडी ते मुंबई सीएसएमटी-दररोज

२५ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर दररोज धावणार

या गाडीला दादर, ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी,अडवली, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदूर्ग आणि कुडाळ स्थानकात थांबा देण्यात आला आहे.

 

०११०९-मुंबई सीएसएमटी ते सावंतवाडी रोड-दररोज

२५ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर दरम्यान दररोज धावणार

०१११० सावंतवाजी रोड ते मुंबई सीएसएमटी

२५ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर दरम्यान दररोज धावणार

या गाडीला दादर, ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडवली, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदूर्ग आणि कुडाळ स्थानकात थांबा देण्यात आला आहे.

Check Also

मुख्यमंत्र्यांची ग्वाही, खटला जलदगती न्यायालयात चालवून पीडीतेला न्याय देणार गृहमंत्री, मुंबई पोलिस आयुक्तांशी चर्चा

मुंबई : प्रतिनिधी साकिनाका परिसरात घडलेल्या दुर्दैवी घटनेची मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *