Breaking News

पवार-मुंडे नंतर दोन प्रतिस्पर्ध्यांचे वाढदिवस एकाच दिवशी : कोणत्या आहेत जमेच्या बाजू उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वाढदिवस एकाच दिवशी

मुंबई: विशेष प्रतिनिधी

राज्याच्या राजकारणात शरद पवार यांनी एकाहाती कमांड धरल्यानंतर त्यांना आव्हान देण्यासाठी भाजपाचे स्व.नेते गोपीनाथ मुंडे हे पुढे सरसावत त्यांनी नंतर चांगलेच आव्हानही दिले होते. विशेष म्हणजे या दोन्ही नेत्यांचा वाढदिवस एकाच दिवशी आहे. फक्त जन्माचे वर्षे वेगवेगळी आहेत. त्यानंतर आता राज्याचे माजी तथा भाजपाचे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे प्रतिस्पर्धी विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस एकाच दिवशी आहे. मात्र या दोघांनी कोरोनामुळे साजरा करायचा नाही असा निर्णय जाहीर घेतला आहे.

वास्तविक राज्याच्या राजकारणात एकाच दिवशी दोन तुल्यबळ नेत्यांचे वाढदिवस येणे हा निव्वळ योगायोग आहे. गोपीनाथ मुंडे आणि शरद पवार यांचे वाढदिवस १२ डिसेंबर या दिवशी आहेत. मात्र या एकाच जन्मदिवसांमुळे दोन नेत्यांमधील राजकिय पदे भुषविण्यात योगायोग काही केल्या दिसून आला नाही. तसे पाह्यला गेले शरद पवार यांनी राजकिय मांड पक्की बसवत राज्यातील जनमानसांची मने जिंकत स्वत:च्या कार्यकर्त्यांची आणि मानणाऱ्यांचा एक वर्ग तयार करत जनाधार असलेला नेता म्हणून प्रतिमा तयार केली. सुरुवातीला ते काँग्रेसमध्ये होते, त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना करत ती ताकद कायम राखली. त्यांचे तेव्हाचे प्रतिस्पर्धी राहिलेले स्व.गोपीनाथ मुंडे यांनी ही राज्यात महाराष्ट्राचे लढाऊ नेते म्हणून स्वत:ची प्रतिमा निर्माण केली. तसेच स्वत:च्या कार्यकर्त्यांचा आणि मानणाऱ्यांचा एक वर्ग तयार केला. त्यामुळे त्यांची प्रतिमा जनाधार असलेली नेता अशी तयार झाली. हे दोन्ही नेते जरी राज्याचे नेते म्हणून ओळखले जात असले तरी या दोघांचे स्वभाव वैशिष्टे वेगळी आहेत.

या दोघानंतर विद्यमान परिस्थितीत पक्ष सारखेच मात्र व्यक्ती बदलेल्या आहेत. मात्र या दोन प्रतिस्पर्धी नेत्यांचे वाढदिवस एकाच दिवशी आलेले म्हणजे, भाजपा नेते तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार. या दोन्ही नेत्यांचे वाढदिवस २२ जुलै रोजीच आहेत. यापैकी अजित पवार यांचा जन्म १९५९ साली झालेला आहे. तर फडणवीसांचे जन्मसाल १९७० चा आहे. स्व.मुडे यांच्यात आणि शरद पवार यांच्यात जवळपास ९ वर्षाचे अंतर होते. त्यामुळे शरद पवार हे गोपीनाथ मुंडे यांना तसे ते थोर होते.

आता विद्यमान परिस्थितीत अजित पवार यांचा जन्म १९५९ वर्षाचा असल्याने ते देवेंद्र फडणवीस यांना जवळपास ११ वर्षांनी मोठे आहेत. अजित पवार यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे आणि निर्णयातील तत्परतेपणामुळे आणि कार्यकर्त्यांमध्ये सहज मिळण्याच्या स्वभावामुळे त्यांचे चाहते जसे सत्ताधारी पक्षात आहेत. तसे विरोधकांमध्येही आहेत. त्या उलट माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पक्षाप्रती असलेली निष्ठा आणि त्यांच्या अभ्यासूपणामुळे त्यांचे नेतृत्व उदयास आले. त्यांनी त्यांच्या अभ्यासाच्या जोरावर राज्याचे मुख्यमंत्री पद भूषविले. पण या पाच वर्षाच्या कालखंडात स्वत:चे सर्वसमावेशक नेतृत्व म्हणून स्थापित करण्याऐवजी स्वकियांबरोबरच दुसऱ्या पक्षात राजकिय शत्रूच निर्माण केले. त्यांचे राज्याचे नेते म्हणून राजकिय मान वाढलेला असला तरी त्यास केंद्रातील मोदी सरकारची त्यास किनार आहे. त्यामुळे त्यांचे निखळ पध्दतीने स्वागत न होता दबावापोटी राजकिय वर्तुळात स्वागत करण्यात येते. जनमानसात त्यांची प्रतिमा अद्यापही अभ्यासू नेता म्हणूनच निर्माण झाले असून अद्याप तरी त्यांच्या राजकिय चारित्र्यावर शितोंड उडाले नाहीत.

Check Also

नरिमन पाँईटमधील एका टॉवरमध्ये ठरतात महाविकास आघाडीची धोरणे पुणे-मुंबईतले दोन उद्योजक, काही आयएएस अधिकारी आणि मंत्र्यांच्या उपस्थितीत होते बैठक

मुंबई: विशेष प्रतिनिधी राज्यात शिवसेनेच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार कामकाज चालवित असले तरी राष्ट्रवादी काँग्रेस …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *