Breaking News

दुकानदारांनोः खाद्यपदार्थ पॅकेट, बिलावर FSSAI रजिस्ट्रेशन नंबर अनिवार्य अन्यथा होणार कारवाई १ ऑक्टोबरपासून नियम लागू

मुंबईः प्रतिनिधी
भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणने (एफएसएसएआय – FSSAI) खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्या सर्व दुकानदारांना १ ऑक्टोबरपर्यंत आपली नोंदणी करण्याचे निर्देश दिले आहेत. तसंच १ ऑक्टोबरपासून खाद्यपदार्थांशी संबंधित दुकानदारांना मालाच्या बिलावर FSSAI नोंदणी क्रमांक लिहिणे अनिवार्य आहे. याशिवाय डिस्प्लेमध्ये दुकानापासून ते रेस्टॉरंटपर्यंत सर्वांना ते कोणते खाद्यपदार्थ वापरत आहेत ते सांगावे लागेल.
मालाच्या बिलावर FSSAI नोंदणी क्रमांक न लिहिणाऱ्या दुकानदारांवर १ ऑक्टोबर नंतर कारवाई केली जाणार आहे. अन्न सुरक्षा अधिकारी ते दुकान बंदही करू शकतो आणि त्याच्या मालकावर कायदेशीर तरतुदींनुसार कारवाई करू शकतो.
एफएसएसएआयने आदेश दिला आहे की,१ ऑक्टोबरपासून रेस्टॉरंट्स आणि मिठाईच्या दुकानांसह इतर खाद्य आणि पेय दुकानांना प्रथम एफएसएसएआयकडे नोंदणी करावी लागेल. त्यानंतर दुकानाच्या बाहेर एक डिस्प्ले बोर्ड लावावा लागेल. ज्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या मालाची माहिती द्यावी लागेल. जर तूप वापरले जात असेल, तर कोणते तूप आहे याची माहिती द्यावी लागेल. तसंच तेल आणि इतर वस्तूंची माहिती देखील प्रदर्शित करावी लागेल. रोग प्रतिकारशक्तीला धोका ठरेल, अशा वस्तूंच्या भेसळीवर पूर्ण बंदी असेल.
सध्या पॅकेज केलेल्या फूड पॅकेटवर FSSAI नंबर लिहिणे अनिवार्य आहे. ही अडचण विशेषतः रेस्टॉरंट्स, मिठाईची दुकाने, केटरर्स, किरकोळ स्टोअर बाबतीत येते. कोणत्याही फूड बिझनेस ऑपरेटरचा १४ अंकी FSSAI क्रमांक सहज दिसत नाही किंवा बिलावर नमूद केलेला नसतो. यामुळे ग्राहकांना एफएसएसएआयकडे तक्रार करणे कठीण होते. यामुळे FSSAI क्रमांक लिहिणं बंधनकारक करण्यात आलं आहे.
तुम्हाला कोणत्याही रेस्टॉरंट किंवा खाद्यपदार्थांच्या दुकानांबद्दल तक्रार करायची असेल तर तुम्ही FSSAI च्या पोर्टलला भेट देऊन करू शकता. तुम्ही onlinelegalindia.com/services/consumer-complaint/ ला भेट देऊन तुमची तक्रार नोंदवू शकता. येथे तुम्हाला तुमचे नाव, मोबाईल नंबर, मेल आयडी, राज्य आणि झालेल्या नुकसानीची माहिती द्यावी लागेल.
FSSAI काय आहे
ज्या ठिकाणी खाद्यपदार्थ बनवले जातात किंवा त्यांची विक्री केली जाते किंवा साठवले जाते त्या सर्व व्यवसायांना FSSAI फुड लायसन्स परवाना बंधनकारक आहे. ज्या व्यवसायाची वार्षिक उलाढाल १२ लाखांपेक्षा कमी आहे त्यांना fssai नोंदणी आवश्यक आहे. ज्या व्यवसायाची वार्षिक उलाढाल १२ लाखांपेक्षा जास्त आणि २० कोटीपर्यंत आहे त्यांना fssai state license आवश्यक आहे.

Check Also

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिआरडिओच्या शास्त्रज्ञांचे केले अभिनंदन अग्नी- ५ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अग्नी-५ या क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल आज ११ मार्च …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *