मुंबईः प्रतिनिधी
प्रॉव्हिडंट फंड ( पीएफ) खातेदारांसाठी आता खूशखबर आहे. केंद्र सरकारने पीएफ खातेदारांना दिवाळीची भेट दिली आहे. पीएफवर आता ८.५ टक्के व्याज मिळणार आहे.
अर्थ मंत्रालयाने २०२०-२१ साठी भविष्य निर्वाह निधी ठेवींवर ८.५ टक्के व्याजदर मंजूर केला आहे. यामुळे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेला (EPFO) ६ कोटींहून अधिक लाभार्थ्यांच्या खात्यात व्याज जमा करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सरकारचा हा निर्णय म्हणजे एक प्रकारे दिवाळी भेटच मानली जात आहे. कामगार मंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील EPFO च्या केंद्रीय विश्वस्त मंडळाने या वर्षी मार्चमध्ये २०२०-२१ साठी ८.५ व्याजदर मंजूर केला. मात्र, प्रस्तावित दराला अर्थ मंत्रालयाकडून मंजुरी घेणे बंधनकारक आहे. अर्थ मंत्रालयाने यास आता मंजुरी दिली आहे. EPFO ने २०२०-२१ साठी PF ठेवींवरील व्याज दर २०१९-२० प्रमाणेच ठेवला होता.
कामगार मंत्रालयाच्या उच्च अधिकाऱ्यांनी या महिन्याच्या सुरुवातीला त्यांच्या प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी आणि प्रक्रिया जलद करण्यासाठी वित्त मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली होती. EPFO ने गेल्या काही वर्षात जाहीर केलेल्या उच्च व्याजदरावर अर्थ मंत्रालयाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. विशेषत: जेव्हा सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी किंवा लहान बचत योजनांसह इतर सरकारी योजनांचे व्याजदर खूपच कमी होते.
EPFO ने गेल्या आर्थिक वर्षात ७०,३०० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळण्याचा अंदाज व्यक्त केला होता, ज्यामध्ये त्याच्या इक्विटी गुंतवणुकीचा काही भाग विकून सुमारे ४,००० कोटी रुपये आणि कर्जातून ६५,००० कोटी रुपयांचा समावेश होता.
ईपीएफओचे सक्रिय सदस्य संख्या ६ कोटींपेक्षा जास्त आहेत. सदस्य मिस्ड कॉलद्वारे ईपीएफ शिल्लक जाणून घेऊ शकतात. यासाठी नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून 011-22901406 वर मिस्ड कॉल करावा लागेल. याशिवाय UAN आणि पासवर्डद्वारे पोर्टलवर लॉग इन करावे लागेल. यामध्ये Download / View Passbook वर क्लिक केल्यानंतर ईपीएफ पासबुक समोर उघडेल. यामध्ये शिल्लक रक्कम दिसेल.
एसएमएसद्वारेही शिल्लक रक्कम तपासता येते. यासाठी ईपीएफओकडे नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून ७७३८२९९८९९ वर EPFO UAN LAN (भाषा) पाठवावा लागेर. LAN म्हणजे तुमची भाषा. इंग्रजीत माहिती हवी असल्यास LAN ऐवजी ENG लिहावे लागेल. हिंदीमध्ये माहिती मिळवण्यासाठी EPFOHO UAN HIN लिहून मेसेज करावा लागेल. त्याचवेळी उमंग ऍप उघडा आणि EPFO वर क्लिक करा. यामध्ये Employee Centric Services वर क्लिक करा आणि त्यानंतर View Passbook वर क्लिक करा आणि UAN आणि पासवर्ड टाका. नोंदणीकृत मोबाईल नंबरवर OTP येईल.OTP टाकल्यावर तुम्ही शिल्लक पाहू शकता.
Tags from this year pf account holders will get 8.5 rate of interest on theirs pf saving. pf saving rate of interest
Check Also
एलआयसीने अदानी कंपनीत गुंतवणूकीचे मुल्य वाढले ५९ टक्क्याने मूल्य वाढल्याचे उपल्बध आकडेवारीवरून दिसते
एलआयसीने २०२३-२४ या आर्थिक वर्षात अदानी समूहाच्या कंपन्यांमध्ये केलेल्या गुंतवणुकीच्या मूल्यात ५९ टक्क्यांनी वाढ झाली …