Breaking News

कपड्यांपासून मोबाईल आणि टीव्ही महागणार, ५ ते ६ टक्क्यांनी महागणार? ५-१० टक्के वाढ होण्याची शक्यता

मुंबईः प्रतिनिधी
मालवाहतुकीचे दर लक्षणीयरीत्या कमी झाले आहेत. पण उच्च इनपुट (उत्पादन) खर्चामुळे कपड्यांपासून ते मोबाईल फोन आणि टीव्ही येत्या काही महिन्यांत महाग होतील. कच्च्या मालाच्या किमतीत वाढ आणि इनपुट कॉस्टमध्ये वाढ झाल्यामुळे कंपन्या आता ग्राहकांवर बोजा टाकण्याच्या तयारीत आहेत. पुढील महिन्यापर्यंत टेलिव्हिजन, स्मार्टफोन, रेफ्रिजरेटर आणि एअर कंडिशनरच्या किमती ५ ते ६ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. यानंतर जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये त्यांच्या किमती पुन्हा १०-१२ टक्के वाढू शकतात.
कपडे निर्यातदार (Apparel exporters) मोठ्या ब्रँड्सशी दर वाटाघाटी करत आहेत जेणेकरून उत्पादन खर्च कमी होईल. भारतातील खराब हवामानामुळे उत्पादन आणि पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. यामुळे पिकांचेही नुकसान झाले आहे. त्यामुळे बासमती तांदळासारख्या वस्तूंचे भाव आधीच वाढले आहेत. भारतात किंवा भारतातून कंटेनरचे भाडे ऑगस्टमध्ये १०,०००-१२,००० डॉलर पर्यंत पोहोचले. तो सध्या ५-१५ टक्के पर्यंत खाली आला आहे.
जानेवारीत कंटेनरचे भाडे कमी होते
जानेवारीमध्ये कंटेनरचे भाडे केवळ ३,०००-४,००० डॉलर होते. ते अजून त्याहून अधिक आहे. निर्यातदारांना किमतीत घट आणि कंटेनरच्या उपलब्धतेत सुधारणा अपेक्षित आहे, ज्यामुळे भारताच्या निर्यातीला आणखी चालना मिळेल. ऑक्टोबरमध्ये निर्यात ४३ % वाढून ३५.६५ अब्ज डॉलर झाली. भारतातील साथीच्या आजाराच्या संभाव्य तिसऱ्या लाटेबद्दल खरेदीदार चिंतेत असताना निर्यातदारांना वर्षाच्या सुरुवातीला किंमतींवर फेरनिविदा करणे कठीण जात होते. तथापि, आता कोविड मोठ्या प्रमाणात नियंत्रणात आहे. जगभरात लसीकरण सुरू झाले आहे.
धाग्याचे भाव झपाट्याने वाढले
वस्त्रोद्योगाला सतावत आहे ती सुताच्या वाढत्या किमती. गेल्या एका वर्षात त्यात ६० टक्के पेक्षा जास्त वाढ झाली आहे. यामुळे उत्पादनाची किंमत वाढेल. पूर्वीच्या तुलनेत कंटेनरचा साठा संपला असून तो आता आठवडाभरात उपलब्ध होत असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.त्यात सुमारे १० ते १५ टक्के घट झाली आहे. कंटेनरचे दर आता सुमारे ६,००० डॉलर आणि ६,५०० डॉलर चीनमधून आहेत, जे एका महिन्यापूर्वी सुमारे ७,००० डॉलर होते. हाँगकाँगहून येणारे हवाई भाडेही कमी झाले आहे.
टीव्ही पाहणे महागणार
दरम्यान, येत्या १ डिसेंबर पासून टीव्ही पाहणे महागणार आहे. चॅनेल्ससाठी ५० टक्के जास्त खर्च करावा लागणार आहे. ‘ट्राय’च्या नवीन दर आदेशाच्या अंमलबजावणीमुळे किंमती वाढवण्यात येणार आहेत. दरवाढ १ डिसेंबर २०२१ पासून लागू होणार आहे.

Check Also

स्टार हेल्थचा आयपीओ ३० नोव्हेंबरला खुला, प्रती शेअर ‘इतकी’ असेल किंमत ८७० ते ९०० राहणार किंमत

मुंबईः प्रतिनिधी स्टार हेल्थ अँड अलाईड इन्शुरन्स कंपनीचा आयपीओ ३० नोव्हेंबर रोजी उघडणार असून तो …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *