Breaking News

पॉलिसी बाजारचा आयपीओ १ नोव्हेंबरला खुला, ‘इतकी’ आहे प्राइस बँड ३ नोव्हेंबरला बंद होणार

मुंबई: प्रतिनिधी

ऑनलाइन इन्शुरन्स कंपनी पॉलिसी बाजारचा आयपीओ १ नोव्हेंबर उघडत आहे. याशिवाय पैसा बाजारची मूळ कंपनी PB Fintech चा आयपीओ देखील या दिवशी उघडणार आहे. दोन्ही आयपीओ ३ नोव्हेंबरला बंद होतील. पॉलिसी बाजारच्या इश्यूची किंमत ९४०-९८० रुपये निश्चित करण्यात आली आहे. आयपीओनंतर पॉलिसी बाजार १५ नोव्हेंबर २०२१ रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध केली जाईल.

पॉलिसी बाजार आपल्या आयपीओद्वारे ५,७०९.७२ कोटी रुपये उभारणार आहे. आयपीओअंतर्गत ३,७५० कोटी रुपयांचे शेअर्स जारी केले जातील. त्याचवेळी कंपनी ऑफर फॉर सेल (OFS) मध्ये १,९५९.७२ कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री करेल. SVF Python II (Cayman) ऑफर फॉर सेलमध्ये १,८७५ कोटी रुपयांचे शेअर्स विकणार आहे. त्याचबरोबर यशिश दहिया ३० कोटी रुपयांचे शेअर्स विकणार आहेत. तर आलोक बन्सल १२.७५ कोटी रुपयांचे आणि शिखा दहिया १२.५० कोटी रुपयांचे शेअर्स विकणार आहेत. राजेंद्र सिंह कुहार ३.५० कोटी रुपयांचे शेअर्स तर कंपनीचे संस्थापक युनायटेड ट्रस्ट २.६८ लाख शेअर्स विकणार आहेत.

इश्यूच्या अप्पर प्राइस बँडनुसार पॉलिसी बाजार आयपीओचे मूल्य २६.२२ कोटी रुपये असेल.  पॉलिसी बाजारमध्ये SVF Python II (Kayman) ची कंपनीत ९.४५ टक्के हिस्सेदारी आहे. तर यशिश दहिया यांच्याकडे ४.२७ टक्के आणि आलोक बन्सल यांच्याकडे १.४५ टक्के हिस्सा आहे. अनेक बड्या गुंतवणूकदारांनी कंपनीत गुंतवणूक केली आहे. यात सॉफ्टबँक, टेमासेक, इन्फोएज, टायगर ग्लोबल आणि प्रेमजी इन्व्हेस्टचा समावेश आहे.

कोटक महिंद्रा कॅपिटल, मॉर्गन स्टॅनले, सिटीग्रुप ग्लोबल मार्केट्स इंडिया, ICICI सिक्युरिटीज, SDFC बँक, IIFL सिक्युरिटीज आणि जेफरीज इंडिया हे पॉलिसी बाजारचे बुक रनिंग लीड मॅनेजर आहेत. पॉलिसीबाजार आपल्या ग्राहकांना वाहन, आरोग्य, जीवन विमा आणि सामान्य विमा पॉलिसींचे मूल्यांकन करण्याची सुविधा प्रदान करते. पॉलिसी बाजारच्या साइटवर दरवर्षी १०० दशलक्ष लोक भेट देतात. कंपनी दर महिन्याला ४ लाख पॉलिसी विकते.

दरम्यान, ब्यूटी आणि वेलनेस सेवा देणाऱ्या  नायका (Nykaa) चा आयपीओ २८ ऑक्टोबर रोजी उघडून १ नोव्हेंबर रोजी बंद होईल. तर फिनो पेमेंट्सचा आयपीओ २९ ऑक्टोबर रोजी सुरू होणार असून २ नोव्हेंबर रोजी बंद होईल. नायका ५,४०० कोटी रुपये आणि फिनो पेमेंट्स बँक ३०० कोटी रुपये आयपीओद्वारे उभारणार आहेत. Nykaa ५,४०० कोटी रुपयांपैकी ६३० कोटी रुपये आयपीओमधून उभारेल. तर उर्वरित पैसे ऑफर फॉर सेल (OFS) द्वारे उभारले जातील. Nykaa ४.३१ कोटी शेअर्स जारी करेल. फिनो पेमेंट्सचा शेअर्स १२ नोव्हेंबर रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध केला जाईल.

Check Also

साबण, डिटर्जंटच्या किंमती वाढल्या हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड (HUL) आणि ITC लिमिटेडने वाढविल्या किंमती

मुंबईः प्रतिनिधी ग्राहकोपयोगी वस्तू बनवणाऱ्या हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड (HUL) आणि ITC लिमिटेड यांनी त्यांच्या निवडक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *