Breaking News

फ्रि काश्मीर फलकप्रकरणाची माहिती घेवून निर्णय घेणार गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती

मुंबईः प्रतिनिधी

नवी दिल्लीतील जेएनयु विद्यापीठातील हल्ल्याच्या निषेधार्थ गेट वे ऑफ इंडिया येथे विद्यार्थी आणि पुरोगामी विचारवंतांनी निदर्शने केली. या निदर्शनात फ्रि काश्मीरचा फलक मेहर या तरूणीने हाती धरल्याने या युवतीसह अन्य काहीजणांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. मात्र या संपूर्ण प्रकरणाची माहिती घेवून या गुन्ह्याबाबत निर्णय घेणार असल्याचे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले.

विधानसभेचे कामकाज संपल्यानंतर मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघात पत्रकारांशी वार्तालाप करताना त्यांनी वरील माहिती त्यांनी दिली.

वास्तविक पाहता काश्मीर राज्यात इंटरनेट सेवा, एसएमएस सेवा सगळ्या बंद आहेत. तसेच तेथील जनतेवर अनेक निर्बंध असल्याचे आपण सर्वच जण वेगवेगळ्या माध्यमातून पहात आहोत. त्यामुळे फ्रि काश्मीरचा फलक त्या अनुषंगाने असावा असे सांगत मेहर हीने सांगितल्याप्रमाणे तो फलक त्या ठिकाणी पडला होता. तो तीन हाती घेवून फडकाविला. त्यामुळे तो फलक कोणी तयार केला, कोणी आणला याची माहिती घेवून त्याबाबत निर्णय घेणार असल्याचे ते म्हणाले.

भीमा कोरेगांव येथे झालेल्या दंगलप्रकरणाचा तपास अद्यपही सुरु आहे. यातील काहींचे अहवाल आलेले आहेत. याचीही माहीती घेवून त्यानंतर आपण बोलू असे सांगत काही प्रसारमाध्यमांनी आपल्या तोंडी काही वाक्य टाकली आहेत. त्याचे मी खंडन करत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

गत सरकार असताना सरकारच्या मतापेक्षा वेगळे मत इतरांनी मत मांडल्यास त्यांना अर्बन नक्षल म्हटले जात असल्याचा खुलासाही त्यांनी करत याबाबत अधिक बोलण्याचे टाळले.

 

Check Also

EVM आणि VVPAT प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात पुढील सुनावणी १८ एप्रिलला

सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी (१६ एप्रिल) व्होटर-व्हेरिफायेबल पेपर ऑडिट ट्रेल (VVPAT) रेकॉर्डच्या विरोधात इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *