Breaking News

अनिल देशमुख यांनी ईडीला लिहीलेल्या पत्रात कोणत्या मागण्या केल्या ७२ वर्षाचे असल्याने अनेक व्याधींनी ग्रस्त

मुंबई: प्रतिनिधी

सीबीआयबरोबरच आता ईडीनेही माजी चौकशी सुरु केली असून मंत्री असताना राहीलेले खाजगी सचिव पलांडे आणि शिंदे या दोघांना ईडीने चौकशीनंतर अटक केल्यानंतर चौकशीसाठी ईडीने पुन्हा एकदा देशमुख यांना समन्स पाठविले. मात्र आपले ७२ वय असून प्रत्येकवेळी चौकशीसाठी आपल्या कार्यालयात येता येणार नाही. त्यामुळे आपण माझी ऑडिओ किंवा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून माझा जबाब नोंदवावा आणि

कोणती कागदपत्रे लागणार याची यादी कळवावी अशा दोन मागण्या अनिल देशमुख यांनी एका पत्राद्वारे ईडीकडे आज केली.

ईडीला पाठविलेल्या पत्रात अनिल देशमुख म्हणाले की, आपले समन्स मिळाले. या समन्सवान्वये मी आपल्याला यापूर्वीही चौकशीच्या कामात सहकार्य केले आहे. तसेच यापूर्वीही आपण माझा जबाब घेतलेला आहे. आता पुन्हा आपण २५ जून २०२१ रोजी मला कागदपत्रांसह चौकशीसाठी कार्यालयात हजर राहण्यासंदर्भात समन्स बजाविले. परंतु यापूर्वीच मी आपल्याला दिलेल्या जबाबनुसार माझे प्रतिनिधी अॅड.इंदरपाल सिंग हे कागदपत्रे घेवून आपल्याकडे येतील. तसेच माझे वय ७२ इतके असून मला अनेक व्याधींचा त्रास आहे. त्यामुळे मी माझा अधिकृत प्रतिनिधी आपल्याकडे पाठवित आहे. तुम्हाला सोयीच्या दिवशी किंवा आज, उद्या कधी म्हणाल तेव्हा मी आपल्याला ऑडिओ-व्हिडिओच्या माध्यमातून जबाब देण्यास तयार आहे.

माझ्याविरोधात जाणीवपूर्वक बदनामी कारक प्रचार करण्यात आला आहे. तसेच माझ्याविरोधात नोंदविलेल्या गुन्ह्याची फॅक्ट कॉपीनुसार अद्याप माझ्या विरोधात अद्याप कोणताही ठोस पुरावा मिळाला नसल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे याप्रकरणाची दिशा दुसऱ्याच बाजूला असल्याचे दिसून येत आहे. तसेच माझ्या विरोधात हे जाणीवपूर्वक करण्यात येत असून केंद्र सरकारच्या इशाऱ्यानुसार एका विशिष्ट राजकिय पक्षाच्या विरोधात जाणीवपूर्वक सुरु असलेली कारवाईतून दिसून येत आहे. तसेच विरोधकांना संपविण्यासाठी अशा प्रकारच्या गोष्टी केल्या जात असल्याचे त्यांनी पत्राद्वारे निदर्शनास आणून दिला.

आपण पाठविलेल्या समन्समध्ये आपल्याला कोणती कागदपत्रे हवी आहेत, याची कोणतीही यादी नाही. सदरची कागदपत्रे सादर करण्यासाठी मला काही कालावधी मिळावा अशी मागणी करत कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे ह कळविल्यास मला उपलब्ध करून देणे सोपे होईल. तसेच माझा नैसर्गिक न्यायाचा हक्क नाकारू शकत नाही असे ही त्यांनी ईडीला पत्राद्वारे कळविले.

दरम्यान देशमुख यांचे वकील सिंग म्हणाले की, आम्हाला कागदपत्रे सादर करण्यासाठी आमच्या अशिलाने मागणी केली आहे. कागदपत्रे सादर केल्यानंतर पुढील समन्स आल्यानंतर चौकशीसाठी येवू.

अनिल देशमुख यांनी ईडीला लिहिलेले हेच ते पत्र

Check Also

जयराम रमेश यांचे भाकित, मतदानाचे संकेत स्पष्ट, मोदी सरकारला निरोप…

लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील १०२ जागांवर झालेले मतदान हे भाजपा व नरेंद्र मोदी सरकारचे शेवटचे दिवस …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *