Breaking News

कोविड सेंटरमध्ये महिलांच्या सुरक्षेसाठी ३१ मार्चपर्यंत एसओपी लागू उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी

राज्यातील कोविड सेंटरमध्ये महिलांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी ३१ मार्चपर्यंत एसओपी (मानक कार्यप्रणाली) तयार करुन लागू करण्यात येईल. ही एसओपी राज्यातील सर्व कोविड सेंटरसाठी बंधनकारक असेल अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरूवारी विधानसभेत केली.

औरंगाबाद शहरातल्या रुग्णालयात डॉक्टरकडून महिलेचा विनयभंग झाल्याचा मुद्दा विधानसभेत उपस्थित करण्यात आला त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माहिती दिली.

औरंगाबादच्या रुग्णालयात कोविड सेंटरमध्ये महिलेवर डॉक्टरने बलात्कार केल्याचा मुदा भाजपच्या आमदार मनिषा चौधरी यांनी उपस्थित करत अशा व्यकतीवर कडक कारवाई करण्याची मागणी केली. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न केला. मात्र भाजप सदस्यांनी तातडीने कारवाई करावी अशी मागणी लावून धरत गोंधळ घालायला सुरूवात केली. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला याचे गांभीर्य कळत नाही का? असा सवाल केला. सरकारने भूमिका स्पष्ट करावी आणि कोविड सेंटरच्या संदर्भात एसओपी करावी अशी मागणी केली.

यावर सरकार तातडीने दखल घेईल असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देत या भगिनीच्यासंदर्भात घडलेली विनयभंगाच्या प्रयत्नाची घटना दुर्दैवी आहे. संबधित भगिनीवर बलात्कार झालेला नाही. मात्र, विनयभंगाचा प्रयत्न होणे हे देखील वाईट कृत्य आहे. सरकारने ही संपूर्ण घटना गांर्भियाने घेतली आहे. याप्रकरणाची प्राथमिक चौकशी स्थानिक महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत करण्यात आली आहे. विनयभंगाचा प्रयत्न झाल्याचा भगिनीच्या आरोपात प्रथमदशर्नी तथ्य आढळल्याने आरोपी डॉक्टरला बडतर्फ करण्यात आले आहे. भगिनीचे नाव गोपनीय ठेवण्यात येत आहे. याप्रकरणाची सखोल चौकशी करुन अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल व ३१ मार्च पर्यंत कोविड सेंटरच्या संदर्भात एसओपी केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Check Also

कर्जबुडव्या कारखान्यांना पायघड्या, संकटग्रस्त सामान्यांची उपेक्षा! भाजपा मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांची ठाकरे सरकारवर टीका

मुंबईः प्रतिनिधी सहकारी साखर कारखान्यांनी व अन्य सहकारी संस्थांनी थकविलेली ३८०० कोटींची देणी सरकारी तिजोरीतून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *