Breaking News

पुढील आठवड्यात आणखी २ आयपीओ येणार गुंतवणुकदारांना गुंतवणूकीची संधी

मुंबई: प्रतिनिधी

पुढील आठवड्यात दोन कंपन्या आयपीओ आणणार आहेत. नायका (Nykaa) ५,४०० कोटी रुपये आणि फिनो पेमेंट्स बँक ३०० कोटी रुपये आयपीओद्वारे उभारणार आहेत. या महिन्यात येणारा हा पहिला आयपीओ आहे. मात्र, या महिन्यात दोन आयपीओ सूचीबद्ध करण्यात आले. यामध्ये एक बिर्ला म्युच्युअल फंड आणि दुसरा पारस डिफेन्सचा आयपीओ होता.

फिनो पेमेंट्सचा आयपीओ २९ ऑक्टोबर रोजी सुरू होणार असून २ नोव्हेंबर रोजी बंद होईल. फिनो पेमेंट्सचा शेअर्स १२ नोव्हेंबर रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध केला जाईल. ३१ मार्च २०२१ रोजी कंपनीची एकूण कमाई ७९१ कोटी रुपये होती. तर नफा २०.४ कोटी रुपये होता. मात्र, कंपनीला २०२० मध्ये ३२ कोटी आणि २०१९ मध्ये ६२ कोटी रुपयांचा तोटा झाला. फिनो पेमेंट्स बँक डिजिटल आर्थिक उत्पादनांची सेवा प्रदान करते.

ब्यूटी और वेलनेस सेवा देणाऱ्या Nykaa चा आयपीओ २८ ऑक्टोबर रोजी उघडून १ नोव्हेंबर रोजी बंद होईल. Nykaa ५,४०० कोटी रुपयांपैकी ६३० कोटी रुपये आयपीओमधून उभारेल. तर उर्वरित पैसे ऑफर फॉर सेल (OFS) द्वारे उभारले जातील.Nykaa ४.३१ कोटी शेअर्स जारी करेल.

सेबीने गेल्या आठवड्यातच हा आयपीओ मंजूर केला होता. यामध्ये टीपीजी, लाईट हाऊस इंडिया फंड, जेएम फायनान्शियल, योगेश एजन्सीज, सुनील कांत मुंजाल, हरिंदर पाल सिंग, नरोत्तम सेक्सारिया आणि माला गांवकर त्यांचे शेअर्स विकतील. मुंबईस्थित कंपनीने कोटक महिंद्रा कॅपिटल, बँक ऑफ अमेरिका सिक्युरिटीज, आयसीआयसीआय सिक्युरिटीज, सिटीबँक, मॉर्गन स्टॅन्ले आणि जेएम फायनान्शियल यांना मर्चंट बँकर्स म्हणून नियुक्त केले आहे.

Nykaa ची सुरूवात २०१२ मध्ये इन्व्हेस्टमेंट बँकर फाल्गुनी नायर यांनी केली. या कंपनीत प्रवर्तकाचा ५३ टक्के हिस्सा आहे. यामध्ये फाल्गुनी, त्यांचे पती संजय नायर आणि त्यांच्या दोन मुलांचा समावेश आहे. आयपीओनंतरही प्रवर्तकाकडे अधिक हिस्सा असेल. आयपीओमधून जमा झालेला पैसा कर्जाची परतफेड करण्यासाठी, गुंतवणूक करण्यासाठी वापरला जाईल. आर्थिक वर्ष २०२१ मध्ये कंपनीचा नफा ६१.९६ कोटी रुपये होता. तर २०२० मध्ये कंपनीला १६.३४ कोटी रुपयांचे नुकसान झाले.

मार्च २०२१ ला संपलेल्या आर्थिक वर्षात नायकाचा महसूल २,४४०.८९ कोटी रुपये होता. वर्षभरापूर्वीच्या तुलनेत त्यात ३८ टक्के वाढ झाली आहे. Nykaa ची ७३ स्टोअर्स देशातील ३८ शहरांमध्ये आहेत.

Check Also

साबण, डिटर्जंटच्या किंमती वाढल्या हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड (HUL) आणि ITC लिमिटेडने वाढविल्या किंमती

मुंबईः प्रतिनिधी ग्राहकोपयोगी वस्तू बनवणाऱ्या हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड (HUL) आणि ITC लिमिटेड यांनी त्यांच्या निवडक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *