Breaking News

या बँकाकडून होम लोनवर मिळवा १२ ईएमआयची सूट अॅक्सिस बँक- इंडसइंड बँकेची आकर्षक ऑफर

मुंबई: प्रतिनिधी

देशातील दोन आघाडीच्या खाजगी बँका अॅक्सिस बँक आणि इंडसइंड बँकेने सणापूर्वी दोन मोठ्या ऑफर्स आणल्या आहेत. या ऑफर्समध्ये अॅक्सिस बँक गृह कर्जावर १२ मासिक हप्त्यांची (ईएमआय) सूट देणार आहे. म्हणजे कर्जदाराचे १२ ईएमआय माफ होणार आहेत.

इंडसइंड बँकेनेही आकर्षक ऑफर दिली आहे. बँकेने आपल्या ऑफरमध्ये डेबिट कार्डवर खरेदी करताना ईएमआयमध्ये रूपांतर करण्याचा पर्याय दिला आहे. इंडसइंड बँकेने उत्सवाच्या ऑफरमध्ये डेबिट कार्ड सुविधेवर ईएमआय सुरू केल्याचे जाहीर केले. बँकेचा ग्राहक कोणत्याही भागीदार स्टोअरमध्ये खरेदी करू शकतो आणि डेबिट कार्डवर ईएमआयची सुविधा घेऊ शकतो.

इंडसइंड बँकेचे सीडीओ चारू माथूर यांनी याबाबत सांगितलं की, बँकेने ६० हजार ऑफलाइन स्टोअरमध्ये भागीदारी केली आहे. यात ग्राहक घरगुती वस्तू, इलेक्ट्रॉनिक्स, कपडे, ऑटोमोबाईल, होम डेकोर, रुग्णालये आदींचा समावेश आहे. येथे ग्राहकाने खरेदी करून डेबिट कार्डने पैसे भरल्यानंतर त्याला खरेदीचे EMI मध्ये रूपांतर करण्याची संधी मिळेल. तो आपली खरेदी ३ ते २४ महिन्यांच्या ईएमआयमध्ये रूपांतरित करू शकतो. यासाठी ग्राहक 5676757 या क्रमांकावर एसएमएस पाठवून त्यांची पात्रता जाणून घेऊ शकतात. ग्राहकाला MYOFR हा मेसेज टाईप करून पाठवावा लागेल.

दुसरीकडे अॅक्सिस बँकेने गृह कर्जासह विविध ऑनलाइन खरेदीवर सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. निवडक गृहकर्ज उत्पादनांवर १२ ईएमआयची सूट देत असल्याचे बँकेने सांगितले आहे. तसंच बँक दुचाकी ग्राहकांना कोणत्याही प्रक्रिया शुल्काशिवाय कर्ज देत आहे. बँक व्यावसायिकांना मुदत कर्ज, उपकरणे कर्ज आणि व्यावसायिक वाहन कर्जावर अनेक फायदे देत आहे.

अॅक्सिस बँकेने ‘दिल से ओपन सेलिब्रेशन्स: क्यूंकी दिवाळी रोज रोज नही आती’ ही योजना लाँच केली आहे. यामध्ये अॅक्सिस बँकेच्या डेबिट आणि क्रेडिट कार्ड्ससह रेस्टॉरंट्स आणि इतर किरकोळ कर्ज उत्पादनांवर केलेल्या खरेदीवर सूट मिळणार आहे.  या ऑफरमध्ये ५० शहरांमधील निवडक २५०० स्थानिक व्यापाऱ्यांकडून खरेदीवर ग्राहकांना २० टक्के सूट देण्यात येणार आहे.  या स्टोअरमधून खरेदीवर बँक ग्राहकांना २० टक्के सूट मिळेल.

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर देशातील अनेक बँका गृहकर्जावर विशेष ऑफर देत आहेत. बँक ऑफ बडोदा आणि कोटक महिंद्रा बँक फेस्टिव्हल ऑफर अंतर्गत ६.५० टक्के दराने गृहकर्ज देत आहेत. तर एसबीआयचा  गृहकर्जाचा व्याजदर ६.७० टक्के आहे. बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांना गृहकर्ज आणि वाहन कर्जावर सूट जाहीर केली आहे. बँकेने आपल्या गृह कर्जावरील व्याजदरात ०.३५ टक्के कपात केली आहे. या कपातीनंतर, बँकेचे गृहकर्ज दर ६.५० टक्क्यापासून सुरू होईल. तर बँक ऑफ बडोदाने सणासुदीच्या काळात गृहकर्जाचा व्याजदर ६.५० टक्क्यांपर्यंत कमी केला आहे. नवीन कर्जाव्यतिरिक्त नवीन व्याजदराचा लाभ इतर बँकांकडून हस्तांतरित केलेल्या गृहकर्जावरही उपलब्ध होईल. या ऑफरचा लाभ ३१ डिसेंबरपर्यंत मिळेल.

Check Also

फेब्रुवारीत महागाईचा दर ५ टक्क्यावर चलनवाढीचा दर ५.१ टक्क्यावर

फेब्रुवारीमध्ये ग्राहक किमतीवर आधारित किरकोळ महागाई फेब्रुवारीमध्ये ५ टक्क्यांच्या आसपास बंद होण्याची शक्यता आहे. सरकारचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *