Breaking News

शेतीमाल किंमती आणि बोंडअळी नुकसानीचा प्रस्ताव केंद्राकडे नाहीच राज्य सरकारकडून उत्तर न आल्याने विरोधकांचा सभात्याग

नागपूर : प्रतिनिधी

राज्यातील शेतकऱ्यांच्या शेती मालाला हमी भाव मिळावा यासाठी सातत्याने गळा काढणाऱ्या भाजप सरकारने शेतीचा दर ठरविण्यासाठी कृषी आयोगाची स्थापना केली. मात्र या कृषी आयोगाने राज्यातील शेती मालाचा हमीभाव ठरविण्याचा प्रस्ताव आणि बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीचा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठविला नसल्याचा खुलासा केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंग यांनी केला असल्याचा दाखला राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप वळसे-पाटील यांनी विधानसभेत दिला. तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चांगले काम करत असल्याचा दावा राज्य सरकारकडून सातत्याने केला जातो. मग हा प्रस्ताव का पाठविला नाही असा सवाल विचारत केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंग यांनीच १९ तारखेला लोकसभेत सांगितल्याची बाब वळसे-पाटील यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून देत या स्थगन प्रस्तावावर चर्चा करण्याची मागणी केली.

त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते अजित पवार यांनीही याबाबतचा मुद्दा उपस्थित करत चर्चेची मागणी केली. तसेच याप्रश्नावर राज्य सरकारने सर्व कामकाज थांबवून चर्चा करावी अशी मागणीही त्यांनी केली.

त्यावर महसूल मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, बोंडअळीच्या प्रादुर्भावने नुकसान झालेल्या शेतींचे पंचनामे घेण्याचे काम सध्या सुरु असल्याचे राज्याच्या कृषीमंत्र्यांनी कालच सांगितले आहे. त्यामुळे एनडीएफकडे हा प्रस्ताव पाठविला नाही. मात्र केंद्राने भरपाई नाही तरी राज्य सरकार मदत करणार आहे.

महसूल मंत्र्यांच्या या उत्तरावर राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांनी हरकत घेत जो प्रस्तावच तुम्ही पाठविला नाही. त्याचे समर्थन कशाला करताय असा खोचक सवाल करत कृषी मूल्य आयोगाचे विद्यमान अध्यक्ष फक्त टी व्हीवर बोलतात. त्यांना काम करायला सांगा असा उपरोधिक सल्लाही दिला. परिस्थितीत अशीच राहीली तर राज्यातील शेतकऱ्यांना पुन्हा दोन वर्षांनी कर्जमाफी द्यावी लागेल अशी टीका करत विरोधकांनी सभात्याग केला.

Check Also

बाळासाहेब थोरात यांचा आरोप तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बैठकीचे आश्वासन

दुधाचे भाव २५ रुपयांपर्यंत खाली आले आहेत, राज्यभर आंदोलने आणि मोर्चे सुरू आहेत. सरकार मात्र …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *