Breaking News

नियंत्रण मिळवण्यासाठी लष्कर, नौदल आणि बचाव पथके तैनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

यवतमाळः प्रतिनिधी
सततच्या मुसळधार पावसामुळे कोल्हापूर, सांगली, नाशिक भागात पूरपरिस्थिती निर्माण झालेली असून या उद्भवलेल्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी लष्कर, नौदल आणि बचाव पथकांना तैनात करण्यात आले आहे. सर्व प्रकारच्या उपाययोजना तातडीने राबविल्या जात आहेत. जे जे आवश्यक आहे ते सर्व तातडीने करण्याचे स्पष्ट आदेश आपण प्रशासनाला दिल्याचे मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात यात्रेच्या सहाव्या दिवसाची सुरुवात यवतमाळ येथून झाली. सात जिल्ह्यातून, 35 विधानसभा मतदारसंघातून 992 किलोमीटरचा प्रवास करून काल रात्री महा जनादेश यात्रा यवतमाळ येथे पोहोचली. आज सकाळी पत्रकार परिषदेपूर्वी मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या पूर परिस्थितीचा तपशीलवार आढावा घेतला. लष्कर, नौदल, वायुसेना, प्रशासनातील विविध विभागांशी मुख्यमंत्री सतत संपर्कात आहेत. पुराने वेढलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे काम युद्ध स्तरावर सुरू आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात पंचगंगा नदीने 43 फूट ही धोक्याची पातळी ओलांडली असून 52 फुटापर्यंत पाणी चढलेले आहे. परिणामी कोल्हापूर, शिरोळ, हातकणंगले ही गावे प्रभावित झाली आहेत. एनडीआरएफच्या पथकांनी मदत कार्यास वेगाने प्रारंभ केलेला आहे. पाण्याने वेढलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे काम युद्धस्तरावर सुरू आहे. एअर लिफ्टिंगची आवश्यकता पडली तर वायुसेनेचे हेलीकॉप्टर्स देखील सज्ज ठेवण्यात आले आहे. कालपासून या भागात पंधराशे लोकांना सुरक्षितपणे हलवण्यात बचाव यंत्रणेला यश आल्याचे त्यांनी सांगितले.
सांगली आणि नाशिक जिल्ह्यातही गंभीर पूर परिस्थिती आहे. राज्याचे मुख्य सचिव सर्व परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील हे स्वतः पूरग्रस्त भागाकडे लक्ष देत आहेत. ते या भागाचा दौराही करणार आहेत. ठिकठिकाणी एनडीआरएफच्या पथकांना आवश्यकतेनुसार रवाना करण्यात आले आहे.
केंद्र सरकारकडूनही आवश्यक ती मदत मिळवण्यासाठी बोलणे झाले असून कर्नाटकचे मुख्यमंत्री येदियुरप्पा यांनाही धरणातून पाण्याचा विसर्ग करण्याविषयीची विनंती आपण केली आहे. यासंदर्भातील आवश्यक त्या सर्व सूचना संबंधित खात्यांना देण्यात आल्या असून कुठलीही कमतरता भासू द्यायची नाही असे आदेश आपण दिल्याचे त्यांनी सांगितले.

Check Also

नाना पटोले यांचा सवाल महागाई, बेरोजगारीसारख्या प्रश्नावर भाजपा गप्प का?

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या शेवटच्या दिवशीही काँग्रेस नेत्यांनी प्रचाराचा धडाका लावला. लोकसभेची निवडणूक जनतेने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *