Breaking News

अॅक्सिस बँकेला सप्टेंबर तिमाहीत विक्रमी नफा कॅनरा बँकेचा नफा दुप्पट

मुंबई: प्रतिनिधी

दोन खाजगी आणि दोन सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी मंगळवारी आर्थिक निकाल जाहीर केले. यामध्ये अॅक्सिस बँक आणि कॅनरा बँकेने सप्टेंबर तिमाहीत सर्वाधिक नफा कमावला. सेंट्रल बँक आणि कोटक महिंद्रा बँकेनेही आर्थिक निकाल जाहीर केले आहेत.

खासगी क्षेत्रातील तिसरी सर्वात मोठी बँक असलेल्या अॅक्सिस बँकेने सप्टेंबर तिमाहीत ३,१३३ कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. मागील वर्षीच्या याच तिमाहीत १,६८३ कोटी रुपयांच्या नफ्यापेक्षा हा नफा ८६ टक्के जास्त आहे. नफा वाढला तरी बँकेचा शेअर्स थोड्या घसरणीसह ८४२ रुपयांवर बंद झाला. बँकेने सांगितले की, कोणत्याही एका तिमाहीत सर्वाधिक नफा कमावण्याचा हा विक्रम आहे. बँकेचे व्याज उत्पन्न वार्षिक आधारावर ८ टक्के वाढून ७,९०० रुपये कोटी झाले आहे जे एका वर्षापूर्वीच्या याच तिमाहीत ७,३२६ कोटी रुपये होते.

सप्टेंबर तिमाहीत बँकेचे एकूण बुडीत कर्ज (NPA) ३.५३ टक्के होते. एका वर्षापूर्वी ते ४.२८ टक्के होते. गेल्या २० तिमाहींमध्ये म्हणजेच ५ वर्षांतील बँकेचा हा सर्वात कमी NPA होता. बँकेचे शुल्क उत्पन्न वार्षिक १७% वाढून ३,२३१ कोटी रुपये झाले आहे. किरकोळ शुल्क १९% वाढले आहे.

आणखी एक खाजगी क्षेत्रातील बँक कोटक महिंद्रा बँकेने देखील निकाल जाहीर केला. सप्टेंबर तिमाहीत बँकेचा नफा ७ टक्के घटून २,०३२ कोटी रुपये झाला आहे. वर्षभरापूर्वी बँकेला २,१८४ कोटी रुपयांचा नफा झाला होता. जून तिमाहीत बँकेला १,६४२ कोटी रुपयांचा नफा झाला होता. कोटक महिंद्रा बँकेच्या चालू खात्यातील ठेवी ३२ टक्के वाढून ५३,२८० कोटींवर गेल्या आहेत.बचत खात्यातील ठेवी १३ टक्क्यांनी वाढून १.२३ लाख कोटींवर पोहोचल्या.

सप्टेंबरच्या तिमाहीत कॅनरा बँकेच्या निव्वळ नफ्यात वर्षभरापूर्वीच्या तुलनेत जवळपास दुप्पट वाढ झाली आहे. बँकेचा नफा सप्टेंबर २०२१ च्या तिमाहीत १,३३३ कोटी रुपये होता, जो एका वर्षापूर्वी ४४४ कोटी रुपये होता. बँकेचा एकूण व्यवसाय १७.१९ लाख कोटी रुपये आहे जो एका वर्षापूर्वीच्या तुलनेत ७.६१ टक्के वाढला आहे.

सरकारी बँक सेंट्रल बँकेला सप्टेंबर तिमाहीत २५० कोटी रुपये नफा झाला आहे. वर्षभरापूर्वी याच तिमाहीत बँकेला १६१ कोटी रुपयांचा नफा झाला होता. या तुलनेत बँकेने यावेळी ५५.२८ टक्के अधिक नफा कमावला आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत बँकेने २०६ कोटी रुपयांचा नफा कमावला होता. बँकेचा ऑपरेटिंग नफा सप्टेंबर २०२० मध्ये १,३८६ कोटी रुपयांच्या तुलनेत सप्टेंबर तिमाहीत १,४०१ कोटी रुपये होता. बँकेचे निव्वळ व्याज उत्पन्न २,४५९ कोटी रुपयांवर गेले आहे. हे उत्पन्न मागील वर्षी २,३५४ कोटी रुपये होते.

Check Also

स्टार हेल्थचा आयपीओ ३० नोव्हेंबरला खुला, प्रती शेअर ‘इतकी’ असेल किंमत ८७० ते ९०० राहणार किंमत

मुंबईः प्रतिनिधी स्टार हेल्थ अँड अलाईड इन्शुरन्स कंपनीचा आयपीओ ३० नोव्हेंबर रोजी उघडणार असून तो …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *