Breaking News

नारायण राणे म्हणाले, व्यापार उद्योगाच्या विकासासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरावी

महाराष्ट्र राज्य भारतात प्रगत राज्य म्हणून नावारूपाला आलेले आहे. वैद्यकीय उत्पादन क्षेत्रात सर्वात पुढे आहे जीडीपी मध्ये पुढे आहे आत्मनिर्भर भारत बनवणे व महासत्तेकडे वाटचाल करताना सूक्ष्म लघु व मध्यम विभागाकडे आशावादी दृष्टिकोनातून बघितले जात आहे. उत्पन्न कसे वाढेल यावर लक्ष देणे गरजेचे आहे.  आधुनिकरणामुळे उत्पादन वाढते, उत्पादन वाढले की नफा वाढत जातो. आधुनिकीकरण ही काळाची गरज असून स्वावलंबी होण्यासाठी अत्यावश्यक आहे. निर्यात वाढवा, आयात कमी करा असे केंद्रीय सूक्ष्म लघुउद्योग मंत्री नारायण राणे म्हणाले.

तसेच महाराष्ट्र चेंबरने राज्यामध्ये उद्योग उभारणीसाठी मार्गदर्शनपर कार्यक्रमांचे आयोजन करावे, सूक्ष्म लघु व मध्यम उद्योगांना मदत करावी, बंद व आजारी उद्योग व्यवस्थित सुरू होण्यासाठी त्यांना मार्गदर्शन व शासनाची मदत मिळवून देण्यास सहकार्य करावे. सूक्ष्म लघु व मध्यम विभागाकडून महाराष्ट्र चेंबरला आवश्यक ती सर्व मदत देण्यात येईल असे आश्वासन महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांना नारायण राणे यांनी दिले.

राज्यातील व्यापार उद्योग कृषी क्षेत्राच्या विकासासाठी महाराष्ट्र चेंबर प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहे. महाराष्ट्र चेंबरच्या कार्याचे कौतूक नारायण राणे यांनी याप्रसंगी केले. राज्यस्तरीय उद्योग परिषदेमध्ये मुख्य पाहुणे केंद्रीय सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी भारताच्या सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग क्षेत्राची प्रगती भारतीय अर्थव्यवस्थेचे इंजिन या विषयावर मार्गदर्शन केले.

महाराष्ट्र सरकारचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी राज्यातील उद्योगांना गतवैभव पुन्हा प्राप्त करून देण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. महाराष्ट्र चेंबर प्रत्येक जिल्ह्यात जाऊन उद्योजक वाढविण्याचे जे काम करतेते कौतुकास्पद आहे. व्यापार उद्योगाच्या विकासासाठी जे जे आवश्यक असेल ते सर्व सहकार्य व उद्योजकांच्या मागण्या पूर्ण करण्यात येतील. राज्यातील व्यापार उद्योजकांच्या अडचणी सोडविण्यासाठी महाराष्ट्र चेंबरच्या पदाधिकाऱ्यांबरोबर ८ दिवसात बैठक आयोजित करण्याचे आश्वासन उद्योग मंत्री सामंत यांनी महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांना दिले.

मोठी गुंतवणूक वा मोठा रोजगार उपलब्ध करणारे उद्योग राज्यात आणणार असून महाराष्ट्राला उद्योग क्षेत्रात भविष्यात गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी नवीन उद्योजकांना जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल. मोठे उद्योग महाराष्ट्रात आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती उद्योग मंत्री सामंत यांनी दिली. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँण्ड अग्रिकल्चर तर्फे आयोजित राज्यस्तरीय उद्योग परिषदेत मेक इन महाराष्ट्रमध्ये उद्योगांची भूमिका या विषयावर उद्योग मंत्री सामंत यांनी मार्गदर्शन केले.

एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अनबलगन यांनीही यावेळी विशेष मार्गदर्शन केले. केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणेयांच्या हस्ते महाराष्ट्र चेंबरच्या ९४ व्या वार्षिक अहवालाचे अनावरण करण्यात आले. तसेच महिला उद्योजकता समितीचे धोरण व युथ विंग समिती व सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग समितीच्या लोगोचे अनावरण करण्यात आले. महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी नारायण राणे व उदय सामंत यांचा सत्कार केला व प्रास्ताविक करताना राज्यस्तरीय उद्योगपरिषदेची सविस्तर माहिती दिली तसेच महाराष्ट्र चेंबर तर्फे राज्यांमध्ये महिला समिती व युथ विंग आणि सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग समिती यांच्यामार्फत महिला व तरुणांसाठी “उद्योग वृद्धीयात्रा” आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती दिली.

तसेच महाराष्ट्र चेंबर तर्फे राज्यातील ३६ जिल्ह्यात महिला क्लस्टर, कृषी क्लस्टर व उत्पादन आधारित क्लस्टरची निर्मिती करण्यात येणार असल्याचे सांगितले. भारत अमेरिके दरम्यान व्यापार उद्योग वाढीसाठी इंडो यूएस डेव्हलपमेंट फोरमची स्थापना महाराष्ट्र चेंबरतर्फे करण्यात आली असून परत अमेरिकेत गुळ व आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात येणारअसल्याचे सांगितले.

व्यापार उद्योगांच्या विविध अडचणींची माहितीयाप्रसंगी दिली व राज्यांमध्ये प्लास्टिक बंदीला स्थगिती देण्यात यावी अशी मागणी अध्यक्ष ललित गांधी यांनी केली.

याप्रसंगी व्यासपीठावर महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी, मुख्य पाहुणे केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे व प्रमुख पाहुणे महाराष्ट्र सरकारचे उद्योग मंत्री उदय सामंत, महाराष्ट्र सरकारचे पर्यटन व कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, वरिष्ठ उपाध्यक्ष उमेश दाशरथी, उपाध्यक्ष करुणाकर शेट्टी, उपाध्यक्षा शुभांगी तिरोडकर, उपाध्यक्ष रवींद्र मानगावे, उपाध्यक्ष सुधाकर देशमुख, उपाध्यक्ष चंद्रशेखरपुनाळेकर, उपाध्यक्ष तनसुख झांबड, वर्ल्ड ट्रेड सेंटरचे चेअरमन विजय कलंत्री महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.पी. अनबलगन उपस्थित होते. राज्यस्तरीय परिषदेत महाराष्ट्र चेंबरचे कार्यकारिणी सदस्यव राज्यभरातील व्यापारी उद्योजक मोठया संख्येने उपस्थित होते.

Check Also

व्होडाफोन आयडीयाच्या एफपीओची २६ टक्के खरेदी किंमत १० आणि ११ रूपये

व्होडाफोन आयडियाची फॉलो-ऑन पब्लिक ऑफर (FPO) पहिल्या दिवशी सावधपणे सुरू झाली आहे, ऑफरवरील केवळ २६ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *