Breaking News

अर्थमंत्री सीतारामण यांची घोषणा, आधार कार्ड नव्हे तर पॅनकार्ड आता ओळखपत्र सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आणि आधार कार्ड डेटा चोरी झाल्यानंतर केंद्राचा निर्णय

युपीए सरकारने देशातील जनतेची माहिती आणि त्यांचे एकच ओळखपत्र असावे या उद्देशाने आधार कार्ड योजना राबविली. मात्र देशात २०१४ साली सत्तांतर झाल्यानंतर केंद्रातील मोदी सरकारने आधार कार्ड सर्वच ठिकाणी बंधनकारक करण्याचा घेतला. मात्र केंद्राच्या या निर्णयाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली असता त्यावर सरकारला फटकारले. त्यानंतर आधार कार्डचा डेटा हॅक करून तो चोरण्यात आल्याची चर्चा सुरु झाली. त्यावर आजपर्यंत मोदी सरकारला स्पष्टीकरण देता आले नाही. त्यामुळे आगामी निवडणूकीत या सगळ्या घडामोडींचा राजकिय परिणाम होऊ शकतो याचा अंदाज बांधून अखेर केंद्र सरकारने आता आधार कार्ड नव्हे तर पॅनकार्ड ओळखपत्र म्हणून ग्राह्य धरणार असल्याची घोषणा आज अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी केली.

पॅनकार्डला ओळखपत्र म्हणून संपूर्ण देशात मान्यता देण्यात आली आहे. बजेट २०२३ यांनी पॅनकार्डला नवीन ओळख दिली आहे. आता ओळखपत्र म्हणून पॅनकार्डचा वापर नागरिक करू शकता. सीतारमण यांनी यामुळे पॅनकार्डला नवीन ओळख दिली आहे.

आयकर विभागाकडून भारतात प्रत्येक व्यक्तीसाठी पॅनकार्ड जारी केलं जातं. पॅनच्या मदतीने कर भरणाऱ्या व्यक्तीची माहिती मिळते. इन्कमटॅक्स, म्युचअल फंड यासाठीही पॅन कार्ड महत्त्वाचं असतं. पॅन कार्डचा वापर बँक व्यवहारांसाठीही केला जातो.

महत्त्वाच्या अर्थव्यवस्थांमध्ये भारतीय अर्थव्यवस्था वेगाने प्रगती करतेय, असं सीतारमण म्हणाल्या. जागतिक मंदीच्या परिणामाची भीती असताना, विकासाला चालना देण्याच्या दृष्टीने केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी २०२३-२४ चा अर्थसंकल्प सादर केला. कोरोनाची साथ आणि रशिया-.युक्रेन युद्धामुळे जागतिक मंदीच वातावरण असताना, भारतीय अर्थव्यवस्थेची योग्य दिशेने वाटचाल सुरु असल्याचे त्या म्हणाल्या.

२०२४ मध्ये लोकसभा निवडणुका असल्यामुळे पुर्ण अर्थसंकल्प सादर होणार नाही. भारत स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत आहे. यावेळी अर्थमंत्री देशाच्या विकासासाठी सात प्राथमिकता सांगितल्या. या प्राथमिकतांना त्यांनी सप्तर्षी असे नाव दिले आहे.

१. समावेशक विकास
२. शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचणे
३. पायाभूत सुविधा आणि गुंतवणूक
४. क्षमतांचा विकास करणे
५. हरित विकास
६. युवा शक्ती
७. आर्थिक क्षेत्र

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

बँकांना सलग ६ दिवस सुट्टी, यादी पहा सुट्ट्यांची यादी पहा

भारतात आता सणासुदीचा हंगाम सुरू झाला आहे. त्यामुळे देशातील विविध राज्यांमध्ये अनेक दिवस बँकांना सुट्टी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *