Breaking News

शेअर बाजार कोसळला, सेन्सेक्स ७९६ अंकांनी घसरला निफ्टी १९९५० अंकांच्या खाली बंद

बुधवारी देशांतर्गत शेअर बाजारात चौफेर विक्री दिसून आली. रिलायन्स इंडस्ट्रीज आणि एचडीएफसी बँकेच्या प्रचंड घसरणीमुळे शेअर बाजार कोसळले. सेन्सेक्स तब्बल ७९६ अंकांच्या घसरणीसह ६६,८०० वर बंद झाला. निफ्टी २३१.९० अंकांनी कोसळून १९,९०१ च्या पातळीवर बंद झाला.

आज बीएसईचे बाजार भांडवल ३,२०,६५,१२२.४३ कोटी रुपये राहिले. त्यात मागील ट्रेडिंग सत्राच्या तुलनेत सुमारे २.५ लाख कोटी रुपयांची घसरण नोंदवली गेली. आज बँकिंग समभागांमध्ये घट झाली होती. परंतु मिडकॅप पीएसयूमध्ये तुलनेने कमी घट झाली होती.

बाजारातील घसरणीचे प्रमुख कारण म्हणजे बँक निफ्टीतील घसरण. आजच्या व्यवहारात, बँक निफ्टी ७०३ अंकांनी घसरला होता आणि सध्या तो ४५,३९० पर्यंत म्हणजेच ४५४०० च्या खाली पोहोचला आहे. भारतीय शेअर बाजाराचे मार्केट कॅप १८ सप्टेंबर रोजी ३,२३,००,११५.५९ कोटी रुपये होते आणि आज ते ३,२०,४३,११४.३० कोटी रुपयांवर आले आहे. याचा अर्थ आजच्या ट्रेडिंग सत्रात मार्केट कॅपमध्ये आतापर्यंत ३ लाख कोटी रुपयांहून अधिकची घसरण दिसून आली आहे. अशाप्रकारे आजच्या घसरत्या बाजारात गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटींहून अधिक नुकसान झाले.

बीएसई सेन्सेक्सवर एचडीएफसी बँकेच्या शेअर्समध्ये सर्वाधिक चार टक्क्यांची घसरण झाली. त्याचप्रमाणे जेएसडब्ल्यू स्टील, रिलायन्स इंडस्ट्रीज, अल्ट्राटेक सिमेंट, टाटा स्टील, मारुती, विप्रो, टेक महिंद्रा, इंडसइंड बँक, भारती एअरटेल, टायटन, लार्सन अँड टुब्रो, हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेड, नेस्ले इंडिया, एचसीएल टेक, एसबीआय आणि टाटा मोटर्सचे शेअर्स घसरून बंद झाले. याशिवाय आयसीआयसीआय बँक, कोटक महिंद्रा बँक, बजाज फिनसर्व्ह, महिंद्रा अँड महिंद्रा आणि बजाज फायनान्सचे समभाग घसरले. पॉवर ग्रिडचे शेअर्स सेन्सेक्समध्ये सर्वाधिक २.३२ टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले. एशियन पेंट्स, सन फार्मा, अॅक्सिस बँक, आयटीसी, एनटीपीसी आणि टीसीएसचे समभाग वधारून बंद झाले.

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

बँकांना सलग ६ दिवस सुट्टी, यादी पहा सुट्ट्यांची यादी पहा

भारतात आता सणासुदीचा हंगाम सुरू झाला आहे. त्यामुळे देशातील विविध राज्यांमध्ये अनेक दिवस बँकांना सुट्टी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *