Breaking News

FD वर मिळणार जास्त व्याज, SBI आणि HDFC बँकेने व्याजदरात केली वाढ जितके जास्त महिने ठेव तितके जास्त व्याज

मराठी ई-बातम्या टीम

बँकेच्या बचत योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी चांगली बातमी आहे. अनेक बँकांनी मुदत ठेवींचे दर वाढवले आहेत. यामुळे ग्राहकांना आता पूर्वीपेक्षा जास्त परतावा मिळणार आहे. सार्वजनिक क्षेत्रातील स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) आणि खाजगी क्षेत्रातील HDFC बँक यांनी मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ केली आहे.
स्टेट बँक ऑफ इंडियाने व्याजदर ०.१० टक्क्यांनी वाढवले आहेत, तर एचडीएफसी बँकेने ०.०५ ते ०.१ टक्क्यांनी वाढ केली आहे. दरम्यान, या बँकांनी एफडीच्या सर्व मॅच्युरिटी कालावधीवरील व्याजदरात वाढ केलेली नाही. ही वाढ काही मुदतीच्या बचत योजनांसाठी आहे.
SBI ने १ वर्ष ते दोन वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठी २ कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेच्या FD वरील व्याजदारत ०.१० टक्के वाढ केली आहे. या कालावधीतील एफडीवरील व्याजदर आता ५ टक्क्यांवरून ५.१ टक्के करण्यात आला आहे. हा व्याजदर १५ जानेवारी २०२२ पासून लागू झाला आहे. ज्येष्ठ नागरिकांना या कालावधीतील एफडीवर ५.६ टक्के व्याज मिळेल, जो आधी ५.५ टक्के होता.
गेल्या महिन्यात डिसेंबरमध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाने बेस रेट ०.१० टक्के वाढवला होता. बेस रेटमध्ये वाढ झाली म्हणजे व्याजदर कमी होण्याचा ट्रेंड आता बदलत आहे. भविष्यात व्याजदरात आणखी काही वाढ होऊ शकते.
SBI चे FD व्याज दर
०७ दिवसांपासून ४५ दिवसांच्या मुदत ठेवींवर –२.९ टक्के
४६ दिवस ते १७९ दिवसांच्या मुदत ठेवींवर – ३.९ टक्के
१८० दिवस ते २१० दिवसांच्या मुदत ठेवींवर – ४.४ %
२११ दिवसांपासून एक वर्षापेक्षा कमी मुदत ठेवी – ४.४ टक्के
मुदत ठेव १ वर्ष ते दोन वर्षांपेक्षा कमी – ५.१%
२ वर्ष ते ३ वर्षांपेक्षा कमी कालावधी – ५.१%
३ वर्ष ते ५ वर्षांपेक्षा कमी कालावधी – ५.३%
५ वर्षे ते १० वर्षे कालावधी – ५.४%
HDFC बँकेने २ कोटी रुपयांपेक्षा कमी मुदत ठेवींवरील व्याजदरात ०.०५-०.१ टक्क्यांनी वाढ केली आहे. आता बँकेत २ वर्षे १ दिवस ते ३ वर्षे FD वर वार्षिक ५.२%, ‘३ वर्षे १ दिवस ते ५ वर्षे’ आणि ‘५ वर्षे १ दिवस ते १० वर्षे’ FD वर वार्षिक ६.४% व्याजदर आहे. नवीन व्याजदर १२ जानेवारी २०२२ पासून लागू झाले आहेत.
HDFC बँक FD व्याज दर
०७ दिवस ते १४ दिवसांचा कालावधी – २.५० टक्के
१५ दिवस ते २९ दिवसांचा कालावधी – २.५० टक्के
३० दिवसांपासून ४५ दिवसांपर्यंतचा कालावधी – ३.०० टक्के
६१ दिवस ते ९० दिवसांचा कालावधी – ३.०० टक्के
९१ दिवस ते ६ महिने कालावधी – ३.५० टक्के
६ महिने ते ९ महिने कालावधी – ४.४० टक्के
९ महिने ते एक वर्षापेक्षा कमी – ४.४० टक्के
एक वर्षाच्या कालावधीसाठी – ४.९० टक्के
१ वर्ष ते २ वर्षांपर्यंत – ५.०० टक्के
२ वर्षे ते ३ वर्षे – ५.२० टक्के
तीन वर्षे ते पाच वर्षे – ५.४० टक्के
५ वर्षे ते १० वर्षे – ५.६० टक्के

Check Also

ओला कॅबचा आयपीओ लवकरच बाजारात ५०० लाखाचा निधी उभारण्यासाठी महिनाभरात आणणार

SoftBank अर्थसहाय्याने प्रणित ओला कॅब Ola Cabs पुढील तीन महिन्यांत $५०० दशलक्ष उभारण्यासाठी प्रारंभिक सार्वजनिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *