Breaking News

पेटीएमचा आयपीओ ८ नोव्हेंबरला खुला, लिस्टींगनंतर पेटीएम मार्केट कॅपमध्ये टॉप ३५ कंपन्यांमध्ये देशाच्या इतिहासातील सर्वात मोठा आयपीओ

मुंबईः प्रतिनिधी
येत्या १० दिवसांत आयपीओ गुंतवणूकदारांसाठी चांगली संधी आहे. शेअर बाजारात ६ कंपन्या आयपीओमार्फत येत आहेत. यामध्ये सर्वात मोठा आयपीओ पेटीएमचा असणार आहे. १८ नोव्हेंबरला शेअर बाजारात लिस्टींग झाल्यानंतर पेटीएमचा मार्केट कॅपनुसार सर्वात मोठ्या ३५ कंपन्यांमध्ये समावेश होईल. भारताच्या इतिहासातील हा सर्वात मोठा आयपीओ असणार आहे.
पेटीएमचा आयपीओ ८ नोव्हेंबरला खुला होत असून १० नोव्हेंबरला बंद होणार आहे. आयपीओसाठी प्राईस बँड २०८० ते २१५० रुपये दरम्यान ठेवण्यात आली आहे. कंपनी आयपीओमार्फत १८,३०० कोटी रुपये उभारणार आहे. यामध्ये नवीन शेअर्सच्या माध्यमातून ८,३०० कोटी रुपये तर ऑफर फॉर सेलद्वारे १०,००० कोटी रुपये उभे केले जातील. म्हणजेच विद्यमान गुंतवणूकदार त्यात त्यांचे शेअर्स विकतील. पेटीएमची मूळ कंपनी One97 Communications आहे. त्यामुळे पेटीएमचे शेअर्स शेअर बाजारात One97 Communications च्या नावाने लिस्ट केले जातील.
पेटीएममध्ये गुंतवणूक करण्यासाठी गुंतवणूकदारांना किमान ६ शेअर्ससाठी बोली लावावी लागेल. म्हणजेच त्याचा लॉट साईज ६ शेअर्सचा असेल. सेबीच्या नियमांनुसार, किरकोळ गुंतवणूकदार किमान १५,००० रुपयांच्या रकमेसाठी अर्ज करू शकतात. मात्र, पेटीएममधील ६ शेअर्सची किंमत १२,९०० रुपये असेल. त्यामुळे एवढीच रक्कम गुंतवावी लागेल.
शेअर बाजारात लिस्ट केल्यानंतर पेटीएमचे मार्केट कॅप १.४० लाख कोटी रुपये असणार आहे. आघाडीच्या ३५ कंपन्यांमध्ये तिचा समावेश होणार आहे. पेटीएम या वर्षी सूचिबद्ध झालेल्या झोमॅटो या स्टार्टअप कंपनीला मागे टाकेल. याशिवाय कोल इंडिया, हिंदाल्को, एसबीआय कार्ड, बजाज ऑटो, महिंद्रा अँड महिंद्रा, वेदांता, एसबीआय लाईफ, पॉवर ग्रिड, एनटीपीसी, अदानी पोर्ट यांनाही मागे टाकेल. या सर्व कंपन्यांचे मार्केट कॅप १.४० लाख कोटी रुपयांपेक्षा कमी आहे.
पुढील १० दिवसांत ६ आयपीओमधून ३१,४८७ कोटी रुपये उभे केले जातील. Nykaa ५,३५२ कोटी, पॉलिसी बाजार ५,७१० कोटी आणि Fino Payments १,२०० कोटी उभारणार आहे. SJS एंटरप्रायझेस ८०० कोटी रुपये उभारणार आहेत. या सर्वांचा प्राइस बँड निश्चित करण्यात आला आहे.
Nykaa ची प्राइस बँड १,०८५ ते ११२५ रुपये, फिनो पेमेंट्स ५६० ते ५७७ रुपये, SJS एंटरप्रायझेस ५३१ ते ५४२ रुपये, पॉलिसी बाजार ९४० ते ९८० रुपये आणि सिगाची १६१ ते १६३ रुपये असेल. ८ ऑक्टोबर रोजी Nykaa चा आयपीओ खुला झाला आहे. फिनो पेमेंट्सचा इश्यू शुक्रवारी उघडणार आहे. Nykaa आणि Fino साठी तुम्ही १२ आणि २५ शेअर्ससाठी अर्ज करू शकता. एसजेएस एंटरप्रायझेससाठी २७ शेअर्स, पॉलिसी बाजारसाठी २५ शेअर्स आणि सिगाचीसाठी ९० शेअर्ससाठी अर्ज करावा लागेल.

Check Also

विमा दाव्याच्या सेटलमेंटमध्ये एलआयसी तिसऱ्या क्रमांकावर कंपन्यांचा रेशो ९० टक्क्यांपेक्षा जास्त

मराठी ई-बातम्या टीम आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये जीवन विमा कंपन्यांनी ९० टक्क्यांपेक्षा जास्त क्लेम सेटलमेंट केले आहे. यामध्ये देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसी तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारतीय विमा नियामक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *