Breaking News

ऑक्टोबरमध्ये घरबसल्या पैसे कमवण्याची संधी या कंपन्याचे येणार आयपीओ

मुंबईः प्रतिनिधी
गुंतवणूकदारांना ऑक्टोबर महिन्यात घर बसल्या पैसे कमवण्याची उत्तम संधी मिळणार आहे. याचं कारण म्हणजे या महिन्यात पॉलिसी बाजारसह १२ कंपन्यांचे आयपीओ येणार आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत भारतीय कंपन्यांनी आतापर्यंत आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये आयपीओद्वारे ५९,७१६ कोटी रुपये उभारले आहेत. त्याचबरोबर अनेक कंपन्या अजूनही त्यांच्या आयपीओसाठी भांडवली बाजार नियामक सेबीच्या मंजुरीची वाट पाहत आहेत. ऑक्टोबर २०२१ मध्ये कोणत्या कंपन्या आयपीओ आणत आहेत याची माहिती घेऊया.
आयपीओद्वारे निधी गोळा करण्याच्या दृष्टीने ऑक्टोबर महिना महत्त्वाचा असेल. या महिन्यात १२ कंपन्या आयपीओच्या माध्यमातून २० हजार कोटी रुपयांहून अधिक निधी उभारणार आहेत. शेअर बाजारातील तेजीचा टप्पा आणि लिक्विडिटीच्या अभावामुळे सध्या आयपीओसाठी चांगली परिस्थिती आङे. सप्टेंबरमध्ये पाच कंपन्यांनी ६७०० कोटी रुपये आयपीओद्वारे उभारले होते. यामध्ये अमी ऑर्गेनिक्स, विजया डायग्नोस्टिक्स, सनसेरा इंजिनिअरिंग, पारस डिफेन्स आणि आदित्य बिर्ला सन लाईफ एमसी सारख्या कंपन्यांचा समावेश आहे.
आर्थिक वर्ष २०२१-२२ च्या दुसऱ्या सहामाहीत मोठ्या संख्येने आयपीओ येणार आहेत. कंपन्या याद्वारे एक लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी उभारू शकतात. ऑक्टोबर २०२१ मध्ये पॉलिसी बाजार ६,०१७ कोटी रुपये, नायका ४,००० कोटी रुपये, नॉर्दर्न आर्क कॅपिटल १,८०० कोटी रुपये, फिनकेअर स्मॉल फायनान्स बँक १,३३० कोटी रुपये, एमक्योर फार्मास्युटिकल्स ४,५०० कोटी रुपये आणि मोबिक्विक १,९०० कोटी रुपये आदी कंपन्यांचे आयपीओ येतील.
याशिवाय ऑक्टोबरमध्ये स्टार हेल्थ अँड अलाइड इन्शुरन्स आणि उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेचाही आयपीओ असेल. चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत २६ कंपन्यांनी आयपीओ आणले आहेत. याद्वारे या कंपन्यांनी ५९,७१६ कोटी रुपये उभारले आहेत.
कोरोना लॉकाडाऊनमुळे २०२० मध्ये अवघे १५ आयपीओ आले होते. यामधून २६,६११ कोटी रुपये उभारण्यात आले. २०१७ हे वर्ष आयपीओंसाठी चांगले राहिले. या वर्षात ३६ कंपन्यांनी आयपीओमधून ६७,१४७ कोटी रुपये भांडवल उभारलं.
कंपन्यांना आपल्या व्यवसायवाढीसाठी आणि चालू खर्चासाठी भांडवलाची गरज लागते. भांडवल उभे करण्यासाठी कंपन्यांकडे कर्ज घेण्याचा मार्ग असतो. मात्र, कर्ज घेण्यापेक्षा कंपनी आपले शेअर्स विक्रीला काढून भांडवलाची तजवीज करते. ही शेअर्स विक्री करणे म्हणजे पब्लिक इश्यू काढणे. पब्लिक इश्यूचे प्रारंभिक आणि त्यानंतरचा असे दोन भाग पडतात. प्रारंभिक पब्लिक इश्यू म्हणजेच आयपीओ (इनिशियल पब्लिक ऑफर ). त्यानंतरच्या इश्यूला एफपीओ ( फॉलोऑन पब्लिक ऑफर) म्हणतात. आयपीओ काढणाऱ्या कंपनीची शेअर बाजारात नोंदणी होते. या सर्व प्रक्रियेनंतर हे शेअर्स गुंतवणूकदार शेअर बाजारात हवे तेव्हा विकू शकतात.

Check Also

PNB ने सर्व सेवांवरील शुल्क वाढवले, जाणून घ्या कधीपासून लागू होणार आता किमान शिल्लक १० हजार रुपये

मराठी ई-बातम्या टीम देशातील दुसऱ्या क्रमांकाची सरकारी बँक पंजाब नॅशनल बँक (PNB) ने सर्व सेवांवर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *