Breaking News

सप्टेंबर तिमाहीत ओएनजीसीला विक्रमी नफा, रिलायन्सला मागे टाकले टाटाचाही विक्रम मोडला

मुंबईः प्रतिनिधी
सरकारी मालकीच्या तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळाने (ओएनजीसी) एक विक्रम केला आहे. ओएनजीसी ही कोणत्याही एका तिमाहीत देशातील सर्वाधिक नफा कमावणारी कंपनी ठरली आहे. सप्टेंबर तिमाहीत कंपनीने १८,३४७.७३ कोटी रुपयांचा नफा कमावला आहे.
आतापर्यंत कोणत्याही एका तिमाहीत सर्वाधिक नफा कमावण्याचा विक्रमही सरकारी मालकीच्या इंडियन ऑईल कॉर्पोरेशनच्या नावावर होता. मार्च २०१३ च्या तिमाहीत कंपनीला १४,५१३ कोटी रुपयांचा नफा झाला होता. तथापि, टाटा स्टीलने हा विक्रम मोडला आणि मार्च २०१८ मध्ये १४,६८८ कोटी रुपयांचा नफा कमावला.
यापूर्वी सरकारी मालकीच्या कोल इंडियाने मार्च २०१६ तिमाहीत १४,१८९ कोटी रुपयांचा नफा कमावला होता. तर रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने सप्टेंबर २०२१ च्या तिमाहीत १३,६८० कोटी रुपयांचा नफा कमावला. या आकडेवारीत टाटा स्टील आणि रिलायन्स इंडस्ट्रीजच्या सर्व कंपन्यांच्या नफ्याचा समावेश आहे. तर एकट्या ओनजीसीला १८,३४८ कोटी रुपयांचा नफा झाला आहे. इतर ओएनजीसीच्या कंपन्यांचे फायदे एकत्र केल्यास हा आकडा १८,७४९ कोटी रुपये होतो.
यासोबतच ONGC ने देखील ११० टक्के लाभांश जाहीर केला आहे. म्हणजेच कंपनी प्रति शेअर ५.५० रुपये लाभांश देईल. जुलै-सप्टेंबर या तिमाहीत कंपनीने २,७५७.७७ कोटी रुपयांचा नफा कमावला होता. त्या तुलनेत यावेळी सप्टेंबर तिमाहीत नफ्यात ५.६५ पट वाढ झाली आहे. २०२०-२१ या आर्थिक वर्षात केवळ ११,२४६ कोटी रुपयांचा नफा झाला. चालू आर्थिक वर्षातम्हणजे एप्रिल ते सप्टेंबर या सहामाही कालावधीत २२,६८२ कोटी रुपयांचा नफा झाला आहे.
ओएनजीसीच्या नफ्यात एवढी मोठी वाढ होण्यामागे दोन कारणे आहेत. पहिले कारण म्हणजे कच्च्या तेलाच्या किमती ४१ डॉलरवरून वरून ६९ डॉलरवर पोहोचल्या. तर दुसरे कारण म्हणजे कंपनीने एक रकमी कर भरण्याचा फायदा घेतला. एक रकमी करामुळे कंपनीने ८,५४१ कोटी रुपयांचा नफा कमावला. तेल आणि वायू उत्पादनात घट होऊनही ओएनजीसीने हा नफा कमावला आहे. कंपनीचे क्रूड उत्पादन ३.८ टक्क्यांनी घसरून ५४ लाख टन झाले. तर वायूचे उत्पादन ७ टक्के घटून ५.४ अब्ज घनमीटर झाले.
भारत हे आशियातील महत्त्वाचे तेल शुद्धीकरण केंद्र आहे. त्यांची वार्षिक क्षमता २४९.३६ दशलक्ष टन आहे. त्यात २३ रिफायनरीज आहेत. भारताने २०२१ या आर्थिक वर्षात कच्च्या तेलाच्या आयातीवर ६२.७१ अब्ज डॉलर खर्च केले. आर्थिक वर्ष २० मध्ये १०१.४ अब्ज डॉलर आणि २०१९ मध्ये १११.९ अब्ज डॉलर खर्च केले.

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

बँकांना सलग ६ दिवस सुट्टी, यादी पहा सुट्ट्यांची यादी पहा

भारतात आता सणासुदीचा हंगाम सुरू झाला आहे. त्यामुळे देशातील विविध राज्यांमध्ये अनेक दिवस बँकांना सुट्टी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *