Breaking News

पीएनबीकडून व्याजदरात मोठी कपात; गृह, कार, सोने तारण कर्जावर सवलत फेस्टिव्हल ऑफर अंतर्गत खास योजना

मुंबई: प्रतिनिधी

सार्वजनिक क्षेत्रातील पंजाब नॅशनल बँकेने (पीएनबी) फेस्टिव्हल ऑफरअंतर्गत सोने तारण कर्जावरील (गोल्ड लोन ) व्याजदर कमी करण्याची घोषणा केली आहे. बँकेने सोन्याचे दागिने आणि सॉवरेन गोल्ड बॉन्डच्या बदल्यात दिल्या जाणाऱ्या एसजीबी कर्जावरील व्याज दर १.४५ टक्क्यांनी कमी केला आहे. एसजीबी कर्जावर आता ७.२० टक्के आणि सोन्याच्या दागिन्यांवर ७.३० टक्के व्याज दराने कर्ज दिले जाणार आहे.

पीएनबीने गृहकर्जाचे व्याजदरही कमी केले आहेत. बँक आता ग्राहकांना ६.६० टक्के दराने गृहकर्ज देईल. तर पीएनबीच्या कार कर्जाचे दर ७.१५ टक्क्यांपासून सुरू होत आहेत. याशिवाय पीएनबीच्या ग्राहकांना सुरुवातीच्या ८.९५ टक्के व्याज दराने वैयक्तिक कर्ज मिळेल. सणासुदीच्या काळात दिलेल्या विशेष ऑफर अंतर्गत पीएनबीने या सर्व कर्जावरील व्याजदर कमी करण्याची घोषणा केली आहे.

सेवा शुल्क आणि प्रक्रिया शुल्कात सूट

बँकेने सोन्याचे दागिने आणि एसजीबी कर्जावरील सेवा शुल्क आणि प्रक्रिया शुल्क संपूर्ण माफ केले आहे. पीएनबीने गृहकर्ज आणि वाहन कर्जावरीलही सेवा शुल्क आणि प्रक्रिया शुल्क माफ करण्याची घोषणा केली आहे. मात्र, बँकेने गृहकर्जावरील मार्जिन कमी केले आहे. ग्राहक आता मालमत्ता मूल्याच्या केवळ ८० टक्केपर्यंत गृहकर्ज घेऊ शकतील.

काही दिवसांपूर्वी स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) पर्सनल लोन, कार आणि सोने तारण कर्जाचा व्याजदर कमी केला आहे. याशिवाय बँकेने कर्जावर प्रक्रिया शुल्क न आकारण्याचा निर्णय घेतला आहे.

एसबीआय सध्या ७.२५ टक्के व्याज दराने कार कर्ज देत आहे. ग्राहकांना कारच्या ऑन रोड किमतीच्या ९० टक्केपर्यंत कर्ज मिळणार आहे. तर एसबीआयच्या सोने तारण कर्जाचा व्याजदर ७.५० टक्के आहे. दुसरीकडे, पर्सनल लोनचा व्याज दर ९.६० टक्केपासून सुरू होत आहे. या कर्जावर तुम्हाला कोणतेही प्रक्रिया शुल्क भरावे लागणार नाही.

 एसबीआयने सणांच्या पार्श्वभूमीवर गृहकर्ज ग्राहकांसाठी उत्सव ऑफर सुरू केल्या आहेत. एसबीआयने गृहकर्जावरील व्याजदर कमी केले आहेत. आता ७५ लाख रुपयांपर्यंतच्या गृहकर्जावरील व्याजदर समान राहील. बँकेने केवळ ६.७० टक्के दराने क्रेडिट स्कोअर लिंक्ड होम लोन देण्याची ऑफर दिली आहे. कर्जाची रक्कम कितीही असली तरी आता कर्जदारांना किमान ६.७० टक्के दराने गृहकर्ज घेता येईल. याशिवाय, गृहकर्ज घेण्यासाठी प्रक्रिया शुल्कही भरावे लागणार नाही.

पीएनबीचे नवीन व्याज दर

गृहकर्ज                 –   ६.६०%

कार कर्ज               –   ७.१५%

एसजीबी कर्ज           –  ७.२०%

सोने तारण कर्ज        –  ७.३०%

वैयक्तिक कर्ज          –   ८.९५%

Check Also

एलआयसीने अदानी कंपनीत गुंतवणूकीचे मुल्य वाढले ५९ टक्क्याने मूल्य वाढल्याचे उपल्बध आकडेवारीवरून दिसते

एलआयसीने २०२३-२४ या आर्थिक वर्षात अदानी समूहाच्या कंपन्यांमध्ये केलेल्या गुंतवणुकीच्या मूल्यात ५९ टक्क्यांनी वाढ झाली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *