Breaking News

दिवाळीच्या तोंडावर गुजरात वगळता इतर राज्यात अमूल दूधाची दरवाढ

ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर अमूलने फुल क्रिम दुधासह म्हशीच्या दुधाच्या दरात लिटरमागे २ रुपयांची वाढ केली. विशेष म्हणजे हा निर्णय गुजरात वगळता देशातील सर्व राज्यांना लागू राहणार आहे. गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आय एस सोधी यांनी ही माहिती दिली. आधीच महागाईमुळे सामान्यांचे कंबरडे मोडलेले असताना अमूल दूधने ही दरवाढ जाहीर केली.

अमूल दूधने फुल क्रीमसह म्हशीच्या दुधात लिटरमागे २ रुपयांची वाढ केली आहे. या दरवाढीमुळे फुल क्रीम दुधाची किंमत लिटरमागे ६१ रुपयांवरून ६३ रुपये होणार आहे. गायीचे दूध आता ५३ रुपये प्रतिलिटरपासून ५५ रुपये प्रतिलिटर होणार आहे. यासह गोल्ड, म्हशीच्या दूध दरातही लीटरमागे २ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. ही दरवाढ गुजरात वगळता देशातील सर्वच राज्यांत लागू असेल. गुजरात राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांमुळे येथील दर स्थिर ठेवण्यात आल्याचा अंदाज बांधला जात आहे. याआधी मार्च, ऑगस्ट महिन्यात दुधाच्या दरात वाढ करण्यात आली होती. ऑगस्ट महिन्यात अमूल गोल्ड, शक्ती, ताझा दुधात प्रतिलिटर २ रुपयांची वाढ करण्यात आली होती.

लम्पी या आजारामुळे दूध उत्पादन आणि वितरणावर परिणाम झालेला आहे. हा आजार म्हैस, गाय तसैच बैलांना होतो. याच कारणामुळे राजस्थान, गुजरात, पंजाब येथील दूध उत्पादनावर परिणाम झालेला आहे. येतील दूध उत्पादन ४५ टक्क्यांनी घटले आहे. या राज्यांसह देशातील एकून १५ राज्यांत लम्पी या आजाराचा प्रादूर्भाव आहे. या कारणामुळेही दूध दरात वाढ करण्यात आली असावी, असा अंदाज व्यक्त केला जातोय.

Check Also

ओला कॅबचा आयपीओ लवकरच बाजारात ५०० लाखाचा निधी उभारण्यासाठी महिनाभरात आणणार

SoftBank अर्थसहाय्याने प्रणित ओला कॅब Ola Cabs पुढील तीन महिन्यांत $५०० दशलक्ष उभारण्यासाठी प्रारंभिक सार्वजनिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *