Breaking News

व्हॉट्सअॅपवरून होणार आता उबर बुकिंग चालकाचे नाव आणि पिकअपची माहिती चॅटवर उपलब्ध

उबर टॅक्सी सेवा आता व्हॉट्सअॅपवरूनही बुक करता येणार आहे. लखनौ शहरातून ही सेवा सुरू करण्यात येत आहे. लवकरच देशातील इतर ठिकाणीही ते सुरू होईल. उबर कंपनीच्या म्हणण्यानुसार, व्हॉट्सअॅपसोबत केलेल्या भागीदारीमुळे आता लोक व्हॉट्सअॅप चॅटबॉटवर एसएमएस पाठवून उबेर बुक करू शकतील.
उबर अॅप डाउनलोडची गरज नाही
उबरच्या व्यवसाय विकासाच्या वरिष्ठ संचालक नंदिनी माहेश्वरी यांनी सांगितलं की, सर्व भारतीयांसाठी उबेरचा प्रवास अधिक सोपा करायचा आहे. त्यामुळे आम्ही वापरकर्त्यांना व्हॉट्सअॅपद्वारे टॅक्सी बुक करण्याची सुविधा देत आहोत. यासह वापरकर्त्यांना यापुढे Uber अॅप स्वतंत्रपणे डाउनलोड करण्याची आवश्यकता नाही. लोक नोंदणी करू शकतील, राइड बुक करू शकतील आणि व्हॉट्सअॅपवरूनच सहलीच्या पावत्या मिळवू शकतील.
अटी व शर्ती पूर्वीप्रमाणेच
कंपनीचे म्हणणे आहे की वापरकर्ते उबेर अॅपवर किंवा व्हॉट्सअॅपवर राइड बुक करत असले तरी, बुक केलेल्या राइड्समध्ये सुरक्षा सेवा आणि विमा सुरक्षा नियम सारखेच राहतील. व्हॉट्सअॅप बुकिंगमध्ये ड्रायव्हरचे नाव, लायसन्स प्लेट आणि पिकअपची माहिती देखील असेल. व्हॉट्सअॅपद्वारे राइड्सचे बुकिंग सध्या फक्त इंग्रजी भाषेत सुरू असल्याचे उबरने म्हटले आहे. लवकरच ते इतर भारतीय भाषांमध्येही आणले जाईल.
जिओ मार्टच्या धर्तीवर सेवा
ही सेवा मुकेश अंबानींच्या रिलायन्स डिजिटल आउटलेट जिओ मार्ट सारखी असेल. ज्याप्रमाणे तुम्ही तुमचा किराणा सामान व्हॉट्सअॅपद्वारे खरेदी करता, त्याचप्रमाणे तुम्ही उबेर टॅक्सी देखील बुक करू शकता.
व्हॉट्सएप वर Uber कसे बुक करायचे ते जाणून घ्या
– व्हॉट्सअॅप वापरकर्ते तीन प्रकारे उबर राइड्स बुक करू शकतील.
– पहिला प्रकार म्हणजे वापरकर्ते Uber च्या व्यवसाय खाते क्रमांकावर संदेश पाठवू शकतात.
– दुसऱ्या प्रकारात ते QR कोड स्कॅन करू शकतात.
– तिसऱ्या प्रकारात Uber WhatsApp चॅट उघडण्यासाठी थेट लिंकवर क्लिक करू शकतात.
उबरने अद्याप कोणताही व्हॉट्सअॅप नंबर जारी केलेला नाही. जे ग्राहक Uber सोबत WhatsApp वर चॅट सुरू करतात त्यांना पिकअप आणि ड्रॉप डेस्टिनेशन माहिती देण्यास सांगितले जाईल. वापरकर्त्यांना व्हॉट्सअॅपद्वारेच भाड्यासह ड्रायव्हरची अपेक्षित आगमन वेळ कळेल.
दरम्यान, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने ऑनलाइन किराणा खरेदी पोर्टल, जिओमार्ट (JioMart) गेल्या वर्षी सुरू केले आहे. आता व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून JioMart वर तुम्ही खरेदी करू शकता. JioMart द्वारे नवीन टॉप आणि चॅट पर्यायासह किराणा सामानाची ऑर्डर देण्यासाठी WhatsApp वापरता येणार आहे.

Check Also

भारतीय समभागांचे मुल्य वाढले, १.४ ट्रिलियन हून जास्त अहवालात माहिती उघड

नॉर्वेच्या सरकारी पेन्शन फंड ग्लोबल, $१.४ ट्रिलियन पेक्षा जास्त पोर्टफोलिओ मूल्यासह जगातील सर्वात मोठा सार्वभौम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *