Breaking News

शेअर्स विकल्यानंतर एकाच दिवसात मिळणार पैसे शेअर्स सेटलमेंटचा नवा नियम

मुंबईः प्रतिनिधी
शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी शेअर्स सेटलमेंटचा नवा नियम येत आहे. देशातील सर्व प्रमुख शेअर बाजार आणि इतर मार्केट इन्फ्रास्ट्रक्चर संस्थांनी सोमवारी शेअर्स सेटलमेंटची T+1 प्रणाली जाहीर केली. शेअर बाजार आणि संस्थांनी सांगितले की, त्यांनी समभागांच्या सेटलमेंटच्या T+1 प्रणालीसाठी ब्लू प्रिंट तयार केली आहे. नवीन नियम २५ फेब्रुवारी २०२२ पासून टप्प्याटप्प्याने लागू केला जाईल.
गुंतवणूकदारांना काय फायदा होईल
T+1 मध्ये, T चा अर्थ “ट्रेडिंग डे” आहे. T+1 प्रणाली लागू केल्यामुळे, शेअर्स विकल्यानंतर एका दिवसानंतर गुंतवणूकदाराच्या खात्यात पैसे जमा होतील. सध्या शेअर्ससच्या सेटलमेंटसाठी T+2 प्रणाली लागू आहे. म्हणजेच शेअर्सची विक्री किंवा ट्रेडिंग केल्यानंतर दोन दिवसांनी गुंतवणूकदाराच्या खात्यात पैसे येतात. T+1 प्रणाली लागू केल्यानंतर गुंतवणूकदारांना शेअर्स विकल्यास एक दिवस आधी पैसे मिळतील.
२५ फेब्रुवारीपासून T+1 प्रणाली टप्प्याटप्प्याने लागू केली जाईल, असे निवेदनात म्हटले आहे. पहिल्या टप्प्यात ही प्रणाली सर्वात कमी बाजार भांडवल असलेल्या १०० कंपन्यांच्या शेअर्समध्ये लागू होईल. त्यानंतर मार्च २०२२ पासून या प्रणालीमध्ये आणखी ५०० शेअर्स आणले जातील. सर्व मार्केट इन्फ्रास्ट्रक्चर संस्थांनी एकत्रितपणे हा निर्णय घेतला आहे, असे निवेदनात म्हटले आहे. या संस्थांमध्ये शेअर बाजार, क्लिअरिंग कॉर्पोरेशन आणि डिपॉझिटरीज समाविष्ट आहेत.
यापूर्वी बाजार नियामक SEBI ने एक्स्चेंजना १ जानेवारी २०२२ पासून इक्विटी विभागात उपलब्ध असलेल्या कोणत्याही सिक्युरिटीजसह T+1 प्रणाली लागू करण्याची परवानगी दिली होती. यामध्ये शेअर बाजारातील (BSE, NSE आणि MSEI) सर्व सूचीबद्ध शेअर्सना घटत्या मार्केट कॅपनुसार क्रमवारी लावली जाईल.
T+1 सेटलमेंट व्यवस्था लागू झाल्यानंतर शेअर्सची विक्री केल्यानंतर लवकरच गुंतवणूकदारांच्या खात्यात पैसे येतील. याचा अर्थ तुम्ही शेअर्स विकल्यानंतर एक दिवस तुमच्या खात्यात पैसे जमा होतील. शेअर्स खरेदीसाठी हीच प्रणाली लागू असेल. ही यंत्रणा पूर्णपणे पारदर्शक आणि सुरक्षित असेल. याचा फायदा गुंतवणूकदाराला होईल.
सध्या शेअर्सच्या सेटलमेंटसाठी T+2 प्रणाली लागू आहे. या व्यवस्थेत शेअर्स विकल्यानंतर गुंतवणूकदाराच्या खात्यात पैसे यायला ३ दिवस लागतात. समजा गुंतवणूकदाराने मंगळवारी शेअर्स विकले. हा व्यवहार पूर्ण करण्यास दोन दिवस लागतात. हा व्यापार हाताळणाऱ्या दलालाला मंगळवारी पैसे मिळतील. पण, शुक्रवारपर्यंत गुंतवणूकदारांच्या खात्यात पैसे पोहोचतील. याचा अर्थ गुंतवणूकदाराला शेअर्स विकल्यानंतर तीन दिवसांनीच पैसे मिळतील.

Check Also

गेल्या वर्षीच्या तुलनेत रिटेल व्यापारात ५ टक्क्याने वाढ सर्व्हेक्षणातून माहिती आली पुढे

रिटेलर्स असोसिएशन ऑफ इंडिया (RAI) च्या रिटेल बिझनेस सर्व्हेनुसार रिटेलर्स असोसिएशन ऑफ इंडिया (RAI) च्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *