Breaking News

‘या’ दोन कंपन्यांचे आयपीओ पुढील आठवड्यात फक्त १५ हजार रूपयांची गुंतवणूक करा

मुंबईः प्रतिनिधी
पुढील आठवड्यात दोन कंपन्यांचे आयपीओ येणार आहेत. आयपीओतून या दोन्ही कंपन्या मिळून २ हजार कोटींहून अधिक रक्कम उभारणार आहेत. यासह पॉलिसी बाजारची मूळ कंपनी पीबी फिनटेकचे शेअर बाजारात लिस्टिंगही होणार आहे.
गो फॅशनचा अंक आयपीओ १७ नोव्हेंबरला सुरू होऊन २२ नोव्हेंबरला बंद होईल. कंपनी आयपीओमार्फत १,०१३ कोटी रुपये उभारणार आहे. प्राइस बँड ६५५ ते ६९० रुपये निश्चित करण्यात आली आहे. यामध्ये २१ शेअर्सचा लॉट असणार आहे. म्हणजेच गुंतवणूकदारांना १४,४९० रुपयांची किमान गुंतवणूक करावी लागेल. त्याची लिस्टिंग ३० नोव्हेंबरला होणार आहे.
गो फॅशनला गेल्या आर्थिक वर्षात तोटा झाला आहे. मार्च २०२१ ला संपलेल्या आर्थिक वर्षात कंपनीची कमाई २८२ कोटी रुपये होती तर तोटा ३.५ कोटी रुपये होता. मार्च २०२० मध्ये कमाई ३९६ कोटी रुपये होती आणि नफा ५२.६ कोटी रुपये होता. जून तिमाहीत कंपनीचा महसूल ४० कोटी रुपये होता आणि १८.९ कोटी रुपयांचा तोटा झाला. ही कंपनी २०१० मध्ये सुरू झाली. गो फॅशन महिलांचे कपडे तयार करते. २३ राज्यांमध्ये त्यांचे ४५० ब्रँड आउटलेट आहेत.
टार्झन प्रोडक्टचाही आयपीओ पुढील आठवड्यात येणार आहे. गुंतवणूकदारांना किमान २२ शेअर्ससाठी तुम्हाला अर्ज करावा लागेल. म्हणजेच १४,५६४ रुपये गुंतवावे लागतील. कंपनीला मार्च २०२१ मध्ये २३४ कोटींच्या महसुलावर ६८ कोटी रुपयांचा नफा झाला. ही कंपनी लाइफ सायन्सेस क्षेत्रात काम करते. कंपनीचा ३० वर्षांचा अनुभव असून ५ उत्पादन युनिट आहेत.
दुसरीकडे गुरुवारी बंद झालेल्या सॅफायर फूड्सला ६.६२ पट प्रतिसाद मिळाला. तर पॉलिसी बाजारचे लिस्टिंग सोमवारी होऊ शकते. फिनो पेमेंट्सची लिस्टिंग शुक्रवारी बाजारात झाली. यामुळे गुंतवणूकदारांची निराशा झाली आहे. त्याची लिस्टिंग 5% ‘डिस्काउंटवर ५४८ रुपयांवर झाली. म्हणजेच प्रत्येक समभागावर गुंतवणूकदारांना २९ रुपयांचे नुकसान झाले आहे. हा शेअर दिवसभरात ५८३ रुपयांपर्यंत गेला असला तरी नंतर ५४५ रुपयांवर बंद झाला.
फाईव्ह स्टार बिझनेस फायनान्सने २,७५२ कोटी रुपये उभारण्यासाठी आयपीओ आणण्यास सेबीकडे अर्ज दाखल केला आहे. तर Droom Tech ने SEBI कडे ३ हजार कोटी रुपयांच्या IPO साठी अर्ज सादर केला आहे. ऑफर फॉर सेलच्या माध्यमातून कंपनी एक हजार कोटी रुपये उभारणार आहे. नोव्हेंबर महिन्यात ५ कंपन्यांनी सेबीकडे आयपीओसाठी अर्ज सादर केले आहेत.

Check Also

बजाज ऑटो लिमिटेडच्या नफ्यात वाढ जाहिर केला डिव्हि़डंट नफा १८ टक्क्याने तर डिव्हीडंड ८०० टक्के

बजाज ऑटो लिमिटेडने आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या चौथ्या तिमाहीत २,०११.४३ कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ नफा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *