Breaking News

मुंबई ठरले महागडे शहर अहमदाबाद परवडणाऱ्या घरांसाठी अव्वलस्थानी

मराठी ई-बातम्या टीम

अहमदाबाद शहर परवडणाऱ्या घरांसाठी अव्वल स्थानावर असून मुंबई हे महागडे शहर ठरले आहे. एकूण उत्पन्नाच्या प्रमाणात मोठा ईएमआय पडत असल्याने ते परवडत नसल्याचे नाईट फ्रँकच्या अहवालात म्हटले आहे. नाईट फ्रँकच्या परवडणाऱ्या घराच्या इंडेक्स २०२१ अहवाल बुधवारी जाहीर करण्यात आला. त्यात परवडणाऱ्या घरांच्याबाबतीत भारतीय बाजारपेठ दशकातील सवोर्त्तम असल्याचे नमूद करण्यात आले. घरांच्या किंमतीत झालेली घट आणि गृहकजार्त झालेली मोठी कपात यामुळे २०२१ मध्ये घरांच्या किंमती कमी होण्यास म्हणजे परवडण्यास मदत झाली आहे, असे या अहवालात म्हटले आहे.

परवडणारा इंडेक्स हा उत्पन्नाच्या प्रमाणात काढला जातो. घर चालवण्यासाठी लागणारी रक्कम आणि विशिष्ट शहरांसाठी असणारा हफ्ता यानुसार हा इंडेक्स काढला जातो. त्यानुसार शहरांनुसार उत्पन्नाच्या ४० टक्क्याच्या पातळीवर सरासरी घरगुती खर्च असेल तर उत्पन्नाच्या गृहकजार्साठी हफ्ता (ईएमआय) परवडतो. एकूण उत्पन्नाच्या ५० टक्के प्रमाणात ईएमआय गेल्यास तो परवडणारा ठरत नाही. या अहवालानुसार दिल्ली – एनसीआरमध्ये परवडणाऱ्या घरांचे प्रमाण २०२० मध्ये ३८ टक्क्यांवरुन २०२१ मध्ये २८ टक्के ठरला आहे. मुंबई वगळता सर्व ठिकाणच्या बाजारपेठांमध्ये परवडणाऱा इंडेक्स ५० टक्के आहे. तर अहमदाबादचा इंडेक्स २०२१ मध्ये परवडणाऱ्या घरांसाठी देशात अव्वल ठरला असून हा २० टक्के, पुण्यासाठी २४ टक्के, मुंबई ५३ टक्के झाला आहे.

परंतु २०११ नंतरची मुंबई हे परवडणाऱ्या घराबाबत काही प्रमाणात सुधारणा झाली आहे. १५० जागतिक शहरांमध्ये वार्षिक सरासरी निवासी किमतींमध्ये १०.६ टक्के वाढ आपल्या ताज्या अहवाल ग्लोबल रेसिडेन्शियल सिटीज इंडेक्स २०२१ च्या तिसऱ्या तिमाहीमध्ये नाइट फ्रँक या प्रमुख आंतरराष्ट्रीय मालमत्ता सल्लागाराने म्हटले आहे की जगभरातील १५० शहरांमध्ये निवासी किंमती २०२१ च्या तिसऱ्या तिमाहीत १०.६ टक्के वर्षानुवर्षेच्या वार्षिक सरासरीवर वाढले. हे २००५ च्या पहिल्या तिमाहीपासून सर्वात जलद निवासी किंमती वाढीचा दर म्हणून नोंदवले गेले. अहवालात असे म्हटले आहे की १२-महिन्याच्या कालावधीत ९३ टक्के शहरांच्या किमती वाढल्या आहेत. ४४ टक्के शहरांनी वर्षात२०२० च्या तिसऱ्या तिमाहीपर्यंत दोन-अंकी दर वाढ नोंदविली.

नाईट फ्रँकच्या ग्लोबल रेसिडेन्शियल सिटीज इंडेक्समध्ये चार भारतीय शहरे आहेत जसे की हैदराबाद, चेन्नई, कोलकाता आणि अहमदाबाद ज्यांनी २०२१च्या तिसऱ्या तिमाहीमध्ये निवासी किंमतीत वाढ पाहिली आहे. ग्लोबल रेसिडेन्शियल सिटीज इंडेक्समध्ये हैदराबाद घरांच्या किमतीत २.५ टक्के वाषिर्क वाढ बरोबर १२८ व्या क्रमांकावर आहे. देशांतर्गत स्तरावर, हैदराबादने भारतीय शहरांमध्ये सर्वाधिक निवासी वाढ नोंदवली. चेन्नई भारतीय शहरांमध्ये दुसरे आणि २.२ टक्क्यांच्या निवासी किंमती वाढीसह जागतिक स्तरावर १३१ व्या क्रमांकावर आहे. निवासी मालमत्ता वर्गात अनुक्रमे १.५ टक्के आणि ०.४ टक्के किंमत वाढीसह ग्लोबल इंडेक्सवर कोलकाता १३५व्या आणि अहमदाबाद १३९व्या क्रमांकावर आहे. घरांच्या किमतींमध्ये १.८ टक्क्यांची घट नोंदवत, मुंबई हे इंडेक्सवर १४६ च्या ग्लोबल रँकिंगसह सर्वात खालच्या क्रमांकावर असलेले भारतीय शहर होते. घरांच्या किमतींमध्ये किरकोळ घट झालेल्या इतर भारतीय शहरांमध्ये बेंगळुरू ०.२ टक्के वर्षानुवर्षेच्या घसरणीसह १४० व्या स्थानावर आहे, त्यानंतर दिल्ली०.७ टक्का वर्षानुवर्षेच्या घसरणीसह १४२ व्या क्रमांकावर आहे, पुणे १.५ टक्के वर्षानुवर्षेच्या घसरणीसह १४४ व्या क्रमांकावर आहे.

Check Also

Broad band इंटरनेट वापरकरर्त्यांची संख्या चांगली वाढ मोबाईल आणि स्वतंत्र ब्रॉडबँड वापरकरर्त्यांची संख्या वाढली

कोविड-19 महामारीनंतर वाढलेल्या ऑप्टिकल फायबर केबल्सद्वारे वितरित ब्रॉडबँड इंटरनेटचा अवलंब सतत वाढत आहे. भारतीय दूरसंचार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *