Breaking News

सोमवारच्या जोरदार घसरणीनंतर सेन्सेक्सची उसळी ४९७ अंशानी निर्देशांक वधारला

मराठी ई-बातम्या टीम
सोमवारच्या जोरदार घसरणीनंतर मंगळवारी भारतीय शेअर बाजाराने जोरदार पुनरागमन केले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ४९७ अंकांनी वाढून ५६,३१९ वर बंद झाला. या तेजीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत ३.२६ लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे. सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप सोमवारी २५२.५७ लाख कोटी रुपये होते, जे आज २५५.८३ लाख कोटी रुपये झाले आहे.
सकाळी ४८० अंकांच्या वाढीसह सेन्सेक्स ५६,३२० वर उघडला. दिवसभरात त्याने ५६,९०० ची वरची आणि ५६,०४७ ची खालची पातळी गाठली. म्हणजेच सेन्सेक्स १०७० ने वधारला. तथापि, शेवटी ही तेजी गमावली आणि केवळ ४९७ अंकांनी वधारून सेन्सेक्स बंद झाला. सेन्सेक्समधील ३० पैकी ७ समभाग घसरले. बजाज फायनान्स, अॅक्सिस बँक आणि पॉवरग्रीड या कंपन्यांचे मोठे नुकसान झाले. एचसीएल टेक, विप्रो, टाटा स्टील, टेक महिंद्रा, टायटन, सन फार्मा आणि अल्ट्राटेक यांचा सर्वाधिक फायदा झाला.
दुसरीकडे, राष्ट्रीय शेअर बाजाराचा (NSE) निफ्टी १७४ अंकांच्या वाढीसह १६,७८८ वर बंद झाला. दिवसभरात निफ्टीने १६,९३६ चा उच्चांक आणि १६,६८८चा नीचांक गाठला. त्याचा निफ्टी नेक्स्ट ५० इंडेक्स, मिड कॅप इंडेक्स, निफ्टी बँक आणि निफ्टी फायनान्शियल इंडेक्स 1.50% पेक्षा जास्त वाढीसह बंद झाले. ५० समभागांपैकी ३९ समभाग वाढीसह बंद झाले आणि ११ घसरले.
आयसीआयसीआय बँक, टायटन आणि टाटा स्टील वधारले
आयसीआयसीआय बँक, टायटन, टाटा स्टील २ ते ४% पर्यंत वाढले. याआधी सोमवारी कोरोनाच्या ओमिक्रॉन या नवीन प्रकारामुळे जगातील बिघडत चाललेली परिस्थिती आणि जागतिक बाजारातील कमजोरी यांचा परिणाम भारतीय बाजारावरही दिसून आला. सेन्सेक्स १,१८९.७३(२.०९%) खाली ५५,८२२.०१ वर बंद झाला. निफ्टी देखील ३७१.०० (२.१८%) ने १६,६१४.२० वर घसरला. मात्र, दिवसभरात त्यात १७०० हून अधिक अंकांची घसरण झाली होती.
सोमवारी सेन्सेक्समधील ३० पैकी २८ शेअर्स घसरले. फक्त हिंदुस्तान युनिलिव्हर (१.७०%) आणि डॉ. रेड्डी (१.०२%) शेअर्स वधारले. टाटा स्टील (५.२०%), SBI (३.९७%), इंडसइंड बँक (३.९३%), बजाज फायनान्स (३.८९%) आणि HDFC बँक (३.१४%) मध्ये सर्वात मोठी घसरण दिसून आली.
कोरोनाचा नवीन प्रकार ओमिक्रॉन झपाट्याने पसरत आहे. ओमिक्रॉनचा धोका पाहता प्रवासी निर्बंधापासून ते लॉकडाऊनपर्यंत लादण्यात येत आहे. नेदरलँड्सने नुकतेच लॉकडाऊन जाहीर केले आहे. अशा परिस्थितीत जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम होण्याची चिंता वाढली आहे.

Check Also

विमा दाव्याच्या सेटलमेंटमध्ये एलआयसी तिसऱ्या क्रमांकावर कंपन्यांचा रेशो ९० टक्क्यांपेक्षा जास्त

मराठी ई-बातम्या टीम आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये जीवन विमा कंपन्यांनी ९० टक्क्यांपेक्षा जास्त क्लेम सेटलमेंट केले आहे. यामध्ये देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसी तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारतीय विमा नियामक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *