Breaking News

एलआयसीमध्ये मोठ्या फेरबदलाची तयारी अध्यक्षांना मिळू शकते इर्डाचे सर्वोच्च पद

मराठी ई-बातम्या टीम

देशातील सर्वात मोठी आयुर्विमा कंपनी भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) पुढील वर्षी मोठ्या प्रमाणात फेरबदल करण्याच्या तयारीत आहे. एलआयसीच्या विद्यमान अध्यक्षांना विमा नियामक इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अॅथॉरिटी ऑफ इंडियाचे (इर्डा-IRDAI) अध्यक्षपद मिळण्याची शक्यता आहे. तर सध्याच्या एमडी यांना एलआयसीचे अध्यक्ष बनवले जाऊ शकते.

आयआरडीएआयचे अध्यक्षपद मे महिन्यापासून रिक्त आहे. आयआरडीएआय अध्यक्ष सुभाषचंद्र खुंटिया मे महिन्यात निवृत्त झाले. त्यांच्या निवृत्तीपूर्वीच एप्रिलमध्ये अर्ज मागविण्यात आले होते. २० हून अधिक अधिकाऱ्यांनी यासाठी अर्ज केले आहेत.या पदासाठी ४.५ लाख रुपये मासिक वेतन दिले जाते. मात्र, ८ महिने उलटूनही सरकारने यावर कोणताही निर्णय घेतलेला नाही.

अर्ज करणार्‍यांमध्ये एलआयसीचे अध्यक्ष एम.आर. कुमार हे स्वतः होते. ते जूनमध्ये एलआयसीमधून निवृत्त होणार होते. परंतु सरकारने त्यांना मुदतवाढ दिली होती. त्यांचा कार्यकाळ ९ महिन्यांसाठी वाढवण्यात आला आणि त्यानंतर त्यांना वयाच्या ६२ वर्षापर्यंत या पदावर राहण्याचा आदेश जारी करण्यात आला. त्यांचा नऊ महिन्यांचा कार्यकाळ १३ मार्च रोजी संपणार आहे.

आयआरडीएआय अध्यक्षपदासाठी एम.आर. कुमार हे प्रमुख दावेदार आहेत. याआधी एलआयसीचे अध्यक्ष टीएस विजयन हे देखील आयआरडीएआय अध्यक्ष राहिले आहेत. एलआयसीचे एमडी राजकुमार जानेवारीतच निवृत्त होणार आहेत. ते सध्या त्यांच्या चार एमडींमध्ये सर्वात वरिष्ठ आहे. सध्या मिनी आइप, राजकुमार, एसके मोहंती आणि बी.सी. पटनायक हे एमडी आहेत. दिनेश भगत हे जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये एमडी होतील. कारण त्यावेळी एमडीचे पद रिक्त असेल.

कुमार आयआरडीएआयमध्ये गेले तर राजकुमार यांना थेट एलआयसीचे अध्यक्ष बनवता येईल. कारण अध्यक्षांचा कार्यकाळ आता ६२ वर्षांचा आहे आणि राजकुमार यांचा अजून दोन वर्षांचा कालावधी बाकी आहे. तसेच राजकुमार यांच्याकडे जानेवारी ते मार्च दरम्यान येणार्‍या एलआयसीच्या आयपीओची जबाबदारी आहे.

आयआरडीएआयचे अध्यक्षपद ८ महिन्यांपासून रिक्त असल्याने पॉलिसीधारक आणि उद्योगजगतात चुकीचा संदेश गेला आहे. विमा उद्योगाचे असे मत आहे की सरकारने बँकिंग आणि इतर क्षेत्रात जसे सेवा विस्तार अधिकारी दिले आहेत, तसे ते आयआरडीएआयमध्ये द्यायला हवे होते किंवा ताबडतोब नवीन नियुक्ती व्हायला हवी होती.

ऑगस्टमध्ये, मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने (ACC) तीन बँकांच्या एमडी आणि सीईओंचा कार्यकाळ वाढवण्यास मान्यता दिली होती. यासोबतच बँकांच्या १० कार्यकारी संचालकांचा (ईडी) कार्यकाळही वाढवण्यात आला आहे. ज्या एमडींचा कार्यकाळ वाढवण्यात आला होता, त्यापैकी पंजाब नॅशनल बँकेचे एसएस मल्लिकार्जुन यांचा कार्यकाळ ३१ जानेवारी २०२२ पर्यंत वाढवण्यात आला होता. युको बँकेचे एमडी अतुल गोयल आणि बँक ऑफ महाराष्ट्रचे एमडी एएस राजीव यांचा कार्यकाळ २ वर्षांनी वाढवण्यात आला आहे.

Check Also

भारतीय समभागांचे मुल्य वाढले, १.४ ट्रिलियन हून जास्त अहवालात माहिती उघड

नॉर्वेच्या सरकारी पेन्शन फंड ग्लोबल, $१.४ ट्रिलियन पेक्षा जास्त पोर्टफोलिओ मूल्यासह जगातील सर्वात मोठा सार्वभौम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *