Breaking News

जाणून घ्या, बँकींग क्षेत्रातील अध्यक्ष, एमडीना किती वेतन मिळते ? एलआयसीच्या सीएफओंना अध्यक्षांपेक्षाही मिळणार जास्त वेतन

मुंबई : प्रतिनिधी

देशातील सर्वात मोठी विमा कंपनी भारतीय जीवन विमा महामंडळ (LIC) सीएफओ (CFO) ची नेमणूक करणार आहे. एलआयसीने सीएफओ पदासाठी अर्ज मागवले होते. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख १२ ऑक्टोबर होती.

एलआयसी सीएफओला अध्यक्षांपेक्षा जास्त पगार देणार असल्याचं समोर आलं आहे. सीएफओला वार्षिक ७५ लाख ते १ कोटी रुपयांपर्यंत पगार मिळणार आहे. तर अध्यक्षांना वार्षिक ३५ लाख रुपये पगार मिळतो. म्हणजेच अध्यक्ष एम.आर. हे कुमारपेक्षा सीएफओला दोन पट अधिक वेतन मिळणार आहे.

एलआयसी आयपीओपूर्वी सीएफओची नियुक्ती करण्याच्या प्रक्रियेत आहे. नुकतीच एक जाहिरात प्रसिद्ध झाली. यामध्ये एलआयसीने सांगितलं की, सीएफओ पदासाठी १२ ऑक्टोबरपर्यंत अर्ज मागवण्यात आले होते. सीएफओची नियुक्ती तीन वर्षांसाठी किंवा ६३ वर्षांचे होईपर्यंत असेल. खरं तर, आतापर्यंत एलआयसीमध्ये चेअरमन कंपनीच्या आतीलच व्यक्ती राहिली आहे. पण आता सीएफओ बाहेरून आणले जाणार आहेत.

देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया देखील सीएफओला अध्यक्षांपेक्षा जास्त पगार देते. जून २०२० मध्ये एसबीआयने सीएफओच्या नियुक्तीसाठी जाहिरात मागवली होती. यावेळी सीएफओला ७५ लाख रुपये वार्षिक वेतन देण्याचे सांगितले होते. याशिवाय इतर सुविधाही मिळणार आहेत. त्यावेळी अध्यक्ष रजनीश कुमार यांना वार्षिक २९.५३ लाख रुपये पगार मिळत होता. विद्यमान अध्यक्ष दिनेश खारा यांना वार्षिक ३८ लाख रुपये पगार मिळतो.

एसबीआयने  सीएफओची नियुक्ती ३ वर्षांच्या करारावर केली होती. तसेच दोन वर्षांसाठी नूतनीकरण करता येते. सरकारी कंपन्यांमध्ये एमडी आणि सीईओचे वेतन वार्षिक फक्त ३०-४० लाख रुपये आहे. अगदी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांचे वेतन वार्षिक ३५ लाख रुपये आहे. या लोकांना प्रचंड सुविधा मिळतात ही वेगळी बाब आहे. यासह, आजीवन पेन्शन देखील उपलब्ध आहे. देशातील तिसऱ्या क्रमांकाची बँक असलेल्या बँक ऑफ बडोदाचे एमडी आणि सीईओ यांना वार्षिक ३५.३९ लाख रुपये पगार मिळतो.

खाजगी बँका किंवा कंपन्यांमध्ये पगार जास्त असू शकतो, पण तेथे पेन्शन नाही. एचडीएफसी बँकेचे एमडी आणि सीईओ यांना वार्षिक वेतन ४.७१ कोटी रुपये मिळते. खाजगी बँकांच्या एमडी आणि सीईओचा पगार सार्वजनिक क्षेत्रातील बँकांपेक्षा १४-१५ पट अधिक आहे.

चालू आर्थिक वर्षात एलआयसीचा आयपीओ येणार आहे. आतापर्यंतचा देशातील सर्वात मोठा हा आयपीओ असणार आहे. आयपीओआधीच सीएफओचा नियुक्ती एलआयसी करेल.

Check Also

जिंदाल समुह विकणार इंधनाच्या वाहन किंमतीत इलेक्ट्रीक वाहन १० लाख प्रवासी वाहने विकण्याचे उद्दिष्ट

सज्जन-जिंदालच्या नेतृत्वाखालील JSW समूहाचे उद्दिष्ट भारतातील इलेक्ट्रीक प्रवासी वाहन विभागामध्ये विद्युत वाहनाची किंमत किमान इंधनावर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *