Breaking News

आठवड्याच्या शेवटी जवळपास ९०० अंकानी शेअर बाजार कोसळला निफ्टीही २६३ अंकानी घसरली

मराठी ई-बातम्या टीम

आठवड्याच्या शेवटच्या दिवशी भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण झाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक (BSE) सेन्सेक्स ८८९ अंकांनी घसरून ५७,०११ वर बंद झाला. दुसरीकडे, राष्ट्रीय शेअर बाजाराचा (NSE) निफ्टी २६३ अंकांनी घसरून १६,९८५ वर बंद झाला या मोठ्या पडझडीत बाजाराच्या मार्केट कॅपमध्ये ४.५५ लाख कोटी रुपयांची घट झाली आहे. गुरूवारी मार्केट कॅप २६४.०२ लाख कोटी रुपये होते, ते आज २५९.४७ लाख कोटी रुपयांवर गेले आहे. घसरणीचे मुख्य कारण म्हणजे ओमिक्रॉन प्रकरणे वाढण्याची भीती, परदेशी गुंतवणूकदारांनी केलेली विक्री आणि मध्यवर्ती बँकेने व्याजदरात केलेली वाढ. विदेशी गुंतवणूकदारांनी (FII) गेल्या ४० दिवसांत बाजारातून ८०,००० कोटी रुपये काढून घेतले आहेत. बँक ऑफ इंग्लंडने अचानक दर ०.१५ वरून ०.२५% पर्यंत वाढवून आश्चर्यचकित केले आहे. सकाळी सेन्सेक्स १२० अंकांनी वाढून ५८,०२१ वर होता. दिवसभरात सेन्सेक्स ५८,०६२ च्या उच्चांकावर तर ५६,९५० चा नीचांकावर गेला. सेन्सेक्सच्या ३० समभागांपैकी २५ समभाग घसरले तर ५ समभाग वाढीसह बंद झाले. मोठ्या घसरणीच्या समभागांमध्ये, १४ समभाग असे होते की ते २-४% घसरले. त्यामध्ये मारुती, महिंद्रा अँड महिंद्रा, रिलायन्स, एअरटेल, कोटक बँक, बजाज ऑटो अॅक्सिस बँक आणि बजाज फिनसर्व्ह यांचा समावेश होता. केवळ इन्फोसिस, टेक महिंद्रा, पॉवर ग्रिड, सन फार्मा आणि टीसीएस समभाग वधारले.

निफ्टीचे केवळ ५ शेअर्स वधारले

निफ्टीतील ५० समभागांपैकी ५ समभाग वधारले. उर्वरित ४५ समभाग घसरले. नेक्स्ट ५०, मिडकॅप, वित्तीय सेवा आणि बँकिंग निर्देशांक प्रत्येकी २.५  टक्क्यांनी घसरले. इन्फोसिस, विप्रो, टाटा कन्सल्टन्सी आणि टेक महिंद्रा हे समभाग वधारले. तर टायटन, टाटा मोटर्स, इंडसइंड बँक समभागात ४-४% घसरण झाली. गुरूवारी मुंबई शेअर बाजार (BSE) सेन्सेक्स ११३ अंकांनी वाढून ५७.९०१ वर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी २७ अंकांनी वाढून १७,२४८ वर बंद झाला. सेन्सेक्सने सकाळी ४०० हून अधिक अंकांची नोंद दाखवली असली तरी दुपारी त्यात घसरण झाली.

Check Also

नेस्ले इंडियाच्या भारतातील उत्पादनात युरोपपेक्षा जास्तीच्या साखरेचे प्रमाण

सेरेलॅक आणि निडो ब्रँड्समध्ये जास्त प्रमाणात साखर आणि मध असल्याचे आढळून आल्यानंतर नेस्ले इंडियाने बेबी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *