Breaking News

५ वर्षांत बँक ग्राहकांसोबत सायबर फसवणूकीत २१ पटीने वाढ, महाराष्ट्रात सर्वाधिक खाजगी बँकांमध्ये सर्वाधिक प्रकरणे

मराठी ई-बातम्या टीम

अलिकडच्या वर्षांत देशातील बँकांमध्ये डिजिटल व्यवहार वाढले आहेत. परंतु सायबर फसवणुकीच्या घटनांमध्येही झपाट्याने वाढ झाली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या आकडेवारीनुसार, देशात सायबर आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये गेल्या ५ वर्षांत २१ पटीने वाढ झाली आहे. पैशाच्या बाबतीत अशा फसवणुकीत सुमारे ३०० टक्केवाढ झाली आहे. कार्ड/इंटरनेट फसवणुकीची प्रकरणे २०१६-१७ या आर्थिक वर्षात बँकांनी एटीएम, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड आणि इंटरनेट बँकिंग फसवणुकीची ३२२३ प्रकरणे नोंदवली होती. तर २०२०-२१ या आर्थिक वर्षात ही प्रकरणे वाढून ६९,४१० पर्यंत गेली. रकमेच्या बाबतीत, २०१६-१७ मध्ये एकूण ४५.५६ कोटी रुपयांची फसवणूक झाली होती. तर २०२०-२१ मध्ये हा आकडा २०० कोटींहून अधिक होता. विशेष बाब म्हणजे बँक ग्राहकांसोबत होणाऱ्या सायबर फसवणुकीच्या बहुतांश तक्रारी खासगी बँकांशी संबंधित आहेत. सर्वाधिक प्रकरणे महाराष्ट्रात बँक ग्राहकांसोबत सायबर फसवणुकीच्या सर्वाधिक घटना महाराष्ट्रात घडतात. २०१६-१७ मध्ये, महाराष्ट्रात फसवणुकीची १,०७५ प्रकरणे नोंदवण्यात आली होती. तर २०२०-२१ मध्ये हा आकडा वाढून २६,५२२ वर गेला.

कोरोना कालावधीमध्ये ऑनलाइन माध्यमातून व्यवहार वाढल्याने आर्थिक फसवणुकीमध्ये मोठी वाढ झाली. ऑनलाइन फसवणूक झाल्यास नक्की काय करावं हे अनेकांना कळत नाही. अनेकदा छोटी रक्कम असल्यावर जाऊ दे म्हणून विषय सोडून देण्याकडे लोकांचा कल असतो. मात्र ऑनलाइन फसवणूक झाल्यानंतर  योग्य पद्धतीने तक्रार केल्यास सर्व पैसे परत मिळू शकतात.

फसवणूक झाल्यापासून तीन दिवसांच्या आत तक्रार करणे आवश्यक आहे. फसवणूक झाल्यानंतर https://www.cybercrime.gov.in/ किंवा स्थानिक पोलीस स्थानकात तक्रार दाखल करता येते. या वेबसाईटवर तक्रार नोंदवल्यावर तक्रारदाराला एसएमएसच्या माध्यमातून माहिती दिली जाते. तसेच एक रेफ्रन्स क्रमांकही तक्रार दाखल केल्यानंतर दिला जातो. या माध्यमातून तक्रारदाराला तपासासंदर्भातील माहिती घेता येते. जर बँकेला माहिती देऊन योग्य पद्धतीने तक्रार केल्यास फसवणूक झालेल्या व्यक्तीचं मोठं नुकसान होत नाही. नियमांनुसार त्या व्यक्तीला दहा दिवसांमध्ये रिफंड मिळू शकतो.

२०२०-२१ मध्ये सायबर फसवणुकीच्या प्रकरणात टॉप ५ बँका

बँक फसवणुकीची रक्कम (कोटींमध्ये)
कोटक महिंद्रा बँक 64.20
अॅक्सिस बँक 29.62
ICICI 25.74
SBI 12.60
अमेरिकन एक्सप्रेस 12.04

२०२०-२१ मध्ये महाराष्ट्रात बँक ग्राहकांसोबत फसवणुकीच्या घटना अधिक

राज्य संख्या
महाराष्ट्र 26,522
दिल्ली NCR 7,774
तमिलनाडु 5,659
गुजरात 4,671
हरियाणा 5,605
निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

बँकांना सलग ६ दिवस सुट्टी, यादी पहा सुट्ट्यांची यादी पहा

भारतात आता सणासुदीचा हंगाम सुरू झाला आहे. त्यामुळे देशातील विविध राज्यांमध्ये अनेक दिवस बँकांना सुट्टी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *