Breaking News

इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत पैसे जमा करण्याचे नियम बदलले आता शुल्क द्यावे लागणार

मराठी ई-बातम्या टीम
इंडिया पोस्ट पेमेंट बँक (IPPB) ने पैसे काढणे आणि जमा करण्याचे नियम बदलले आहेत. १ जानेवारीपासून खातेधारकांना एका ठराविक मर्यादेपेक्षा जास्त रक्कम काढण्यासाठी आणि जमा करण्यासाठी शुल्क भरावे लागेल.
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेनुसार, बेसिक सेव्हिंग अकाऊंटमधून दर महिन्याला ४ वेळा पैसे काढणे मोफत असेल. परंतु त्यानंतर प्रत्येक पैसे काढल्यावर ०.५०% शुल्क भरावे लागेल जे किमान २५ रुपये असेल. मात्र, बेसिंग बचत खात्यावर पैसे जमा करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
बेसिक सेव्हिंग अकाऊंट व्यतिरिक्त बचत खाते आणि चालू खात्यात १०,००० रुपये जमा करण्यासाठी कोणतेही शुल्क लागणार नाही. १० हजार नंतर ०.५०% शुल्क आकारले जाईल. जे प्रति व्यवहार किमान २५ रुपये असेल. बचत आणि चालू खात्यांमध्ये दरमहा रु २५,००० पर्यंत रोख काढणे विनामूल्य असेल आणि त्यानंतर प्रत्येक व्यवहारावर ०.५०% शुल्क आकारले जाईल.
आरबीआयने मोफत व्यवहारानंतर रोख पैसे काढण्यावरील शुल्क वाढवण्यास मान्यता दिली आहे. बँका सध्या ग्राहकांकडून प्रति व्यवहारासाठी २० रुपये आकारतात. त्यात करांचा समावेश नाही. रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे की, जास्त इंटरचेंज फीमुळे, बँका मोफत व्यवहारानंतर ग्राहकांकडून आकारले जाणारे शुल्क वाढवून खर्चाची भरपाई करू शकतील.
आरबीआयच्या म्हणण्यानुसार, मोफत व्यवहारानंतर बँका त्यांच्या ग्राहकांकडून प्रति व्यवहार २० ऐवजी २१ रुपये आकारू शकतील. त्यात करांचा समावेश नाही. हा नियम १ जानेवारी २०२२ पासून लागू होणार आहे. एटीएममधून पैसे काढण्यावरील शुल्क तब्बल ७ वर्षांनंतर वाढवण्यात आले आहे.
IPPB च्या वेबसाइटनुसार, हे सर्व नियम १ जानेवारी २०२२ पासून लागू होतील. GST/CESS वेगळा लावला जाईल. यापूर्वी इंडिया पोस्ट पेमेंट बँकेने १ ऑगस्ट २०२१ डोअरस्टेप बँकिंग चार्ज (Doorstep banking charges) चे नवीन दर लागू केले होते. यासाठी ग्राहकांना २० रुपयांचा चार्ज ठरवण्यात आला होता.
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक १ सप्टेंबर २०१८ रोजी देशाच्या पंतप्रधानांनी सुरू केली. इंडिया पोस्ट पेमेंट बँक ही भारत सरकारच्या पोस्ट विभाग आणि दळणवळण मंत्रालयाच्या अंतर्गत असलेली सार्वजनिक क्षेत्रातील बँक आहे, ज्यामध्ये तिचा १००% हिस्सा आहे. खेड्यापाड्यातून बँकिंगचा प्रसार करण्यासाठी, भारतीय पोस्टल सेवेच्या माध्यमातून एक नवीन बँकिंग सिस्टीम सुरू करण्यात आली जी ‘इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक’ म्हणून ओळखली जाते. इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेच्या माध्यमातून, भारत सरकार देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात बँकिंग सुविधा देण्यास सक्षम असेल तसेच शेतकरी आणि खेड्यापाड्यात राहणाऱ्या लोकांना त्यांची अर्थव्यवस्था सुधारण्यास मदत करेल.

Check Also

PNB ने सर्व सेवांवरील शुल्क वाढवले, जाणून घ्या कधीपासून लागू होणार आता किमान शिल्लक १० हजार रुपये

मराठी ई-बातम्या टीम देशातील दुसऱ्या क्रमांकाची सरकारी बँक पंजाब नॅशनल बँक (PNB) ने सर्व सेवांवर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *