Breaking News

आर्थिक सर्व्हेक्षण अहवाल जाहीर, धोरण आत्मनिर्भरतेचे आणि गुंतवणूक वाढली परदेशी अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी चालू वर्षाचा आर्थिक सर्व्हेक्षण अहवाल लोकसभेत मांडला

मागील दोन वर्षे कोरोनामुळे देशातील सर्वसामान्य नागरीकांसह सरकारच्या उत्पनावर मोठ्या प्रमाणावर परिणाम झाला. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण या केंद्र सरकारच्या मालकीच्या कंपन्या विकायला काढल्या त्यासाठी मॉनेटायझेशन धोरण आणत त्याची प्रक्रियाही सुरु केली. यापार्श्वभूमीवर आर्थिक अडचणींवर मात करण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय उत्पादनावरील अवलंबितत्व कमी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर हे नवे धोरण जाहीर केले. मात्र आज अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी आर्थिक सर्व्हेक्षण सादर करताना आत्मनिर्भर धोरणाखाली देशांतर्गत किती उद्योग आणि रोजगार निर्माण झाले यावर चकार शब्द न काढता देशात परदेशी गुंतवणूक वाढल्याची बाब आवर्जून नमूद केली.

अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी संसदेत अहवाल सादर केल्यानंतर म्हणाल्या, येत्या आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्था ६ ते ६.८ टक्के वाढेल अशी अपेक्षा व्यक्त करत २०२२-२३ चा आर्थिक अहवाल संसदेच्या पटलावर ठेवला. आर्थिक सर्वेक्षणात २०२३-२४ चा GDP वाढीचा दर ६.५ टक्के असेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मागील तीन वर्षांचा विचार केला तर ही वाढ सर्वात कमी असणार आहे. Nominal GDP ११ टक्के राहिल असंही नमूद करण्यात आले.

२०२२-२३ या वर्षात सेवा क्षेत्राने ८.४ टक्के वाढ नोंदवली पुढील आर्थिक वर्षात म्हणजेच २०२३-२४ मध्ये ९.१ टक्के वाढ अपेक्षित आहे.

संपूर्ण आर्थिक सर्व्हेक्षण अहवाल वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक कराः

file:///C:/Users/Admin/Downloads/Economic%20Survey%20Complete%20PDF.pdf

https://www.indiabudget.gov.in/economicsurvey/

कोरोनामुळे झालेल्या तोट्याची भरपाई पूर्ण झाली आहे. कोरोनाच्या काळात देशाची आर्थिक घडी विस्कटली होती. मात्र यावर्षी ती भरून निघाला आहे असंही अहवालात नमूद करण्यात आलं आहे. सेवा क्षेत्राला बँकांकडून होणाऱ्या वित्तपुरवठ्यातही सकारात्मक वाढ झाली आहे. ही वाढ २१ टक्क्यांची आहे. वैद्यकीय उपचारांसाठी जगभरातून भारतात येणाऱ्यांच्या संख्येतही वाढ झाली आहे. चांगल्या जगातील ४६ देशांमध्ये भारताचा क्रमांक दहावा आहे अशी माहिती आर्थिक अहवालात नोंदवण्यात आली आहे.

भारतात थेट परकीय गुंतवणुकीचा ओघही चांगला वाढला आहे. UNCTAD च्या २०२२ च्या जागतिक गुंतवणूक अहवालात जगभरातील सर्वाधिक विदेशी गुंतवणूक मिळवणाऱ्या २० देशांमध्ये भारताचं स्थान आठवं आहे. भारतात यावर्षी ८४ अब्ज अमेरिकी डॉलर्सची थेट विदेशी गुंतवणूक झाली आहे. त्यातील एकट्या सेवाक्षेत्रात ७.१ अब्ज अमेरिकी डॉलर्सची गुंतवणूक झाली आहे.

भारत देशात मध्यमवर्गीय लोकांची संख्या खूप जास्त आहे. त्यामुळे आपल्या घरांघरांमध्ये महिन्याचं बजेट कसं ठरवायचं किंवा जमा-खर्चाचा ताळमेळ कसा घालायचा यासाठी डायरी किंवा वही ठेवली जाते. वर्ष संपल्यानंतर आपण त्या डायरी किंवा वहीचा आढावा घेऊ शकतो. घरात कुठे किती पैसे खर्च झाले? कुठे जास्त पैसे खर्च झाले? कुठे पैसे वाचवता आले असते? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळू शकतात. आर्थिक सर्वेक्षण हे आपल्या घरातल्या हिशोबाच्या वही किंवा डायरी प्रमाणेच असते. अर्थ संकल्पाच्या एक दिवस आधी आर्थिक सर्वेक्षण सादर केलं जातं.

Check Also

गुंतवणूकदारांसाठी खुषखबरः या तीन कंपन्यांचे आयपीओ बाजारात ९ कंपन्या होणार सूची बध्द

भारतीय आयपीओ बाजारात येत्या आठवड्यात तीन कंपन्यांचे आयपीओ सबस्क्रिप्शनसाठी खुल्या होणार आहेत. तर नऊ कंपन्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *