Breaking News

दिवाळीच्या मुहूर्तावर ‘या’ वेळी होणार शेअर बाजारातील व्यवहार ट्रेडिंग मात्र एक तासासाठी सुरु राहणार

मुंबईः प्रतिनिधी
दिवाळीत शेअर बाजार बंद राहतील. पण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ट्रेडिंग एक तासासाठी असेल. यावेळी संवत २०७७ ची सुरुवात दिवाळीने होणार आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला कोणतेही नवीन काम किंवा गुंतवणूक शुभ मानली जाते. हिंदू परंपरेनुसार या दिवशी शेअर बाजारात मुहूर्त ट्रेडिंग सत्रात गुंतवणूक करणे शुभ असते. त्यामुळे दरवर्षी दिवाळीला शेअर बाजार उघडतो आणि १ तास ट्रेडिंग होते.
शेअर बाजाराने अनेक वर्षांपासून आपल्या परंपरा जपल्या आहेत. यातील सर्वात महत्त्वाची परंपरा म्हणजे दिवाळीच्या दिवशी मुहूर्त ट्रेडिंग. शेअर बाजारात मुहूर्त ट्रेडिंग दिवाळीच्या दिवशी ४ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ६.१५ ते ७.१५ दरम्यान होईल. या काळात गुंतवणूक करणे शुभ मानले जाते. संवत २०७८ या दिवशी म्हणजेच नवीन वर्ष सुरू होईल. या काळात बाजारातील गुंतवणूक सुख-समृद्धी घेऊन येते अशी धारणा आहे.
दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर शेअर बाजारात मुहूर्ताचं ट्रेडिंग केलं जातं. गुंतवणूकदार मुहूर्तच्या विशेष प्रसंगी नव्या गुंतवणुकीस सुरुवात करतात. मुहूर्त ट्रेडिंग हे शुभ मानलं जातं. दिवाळीच्या निमित्ताने ४ नोव्हेंबर २०२१ रोजी मुंबई शेअर बाजारात (बीएसई) आणि राष्ट्रीय शेअर बाजारात (एनएसई) संध्याकाळी ६:१५ वाजल्यापासून एक तासाचा विशेष मुहूर्त असेल. दिवाळीला मुहूर्ताचं ट्रेडिंगमध्ये संध्याकाळी ६:०० ते संध्याकाळी ६:०८ पर्यंत प्री-ओपन ट्रेडिंग सत्र असेल. यानंतर मुहुर्त ट्रेडिंग संध्याकाळी ६:१५ ते संध्याकाळी ७:१५ पर्यंत होईल.
दिवाळी देशाच्या अनेक भागांमध्ये नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात देखील करते. या शुभ वेळेला शेअर बाजारातील व्यापारी विशेष शेअर ट्रेडिंग करतात. म्हणून याला मुहूर्त ट्रेडिंग असं म्हणतात. श्रीमंत लोक निश्चितपणे या दिवशी गुंतवणूक करतात. ते छोट्या गुंतवणुकीवर लाखो रुपये कमवतात. दिवाळीच्या विशेष मुहूर्तावर ट्रेडिंग करून सुरू करून गुंतवणूकदार नवीन आर्थिक वर्ष चांगलं जाण्याची इच्छा व्यक्त करतात.
मुहूर्ताच्या ट्रेडिंगदिवशी व्यापारी गुंतवणुकीचा विचार करून बाजारात प्रवेश करतात. परंपरा मानणारे सहसा पहिली ऑर्डर खरेदीची देतात. मागील काही वर्षांमध्ये मुहूर्ताच्या ट्रेडिंगमध्ये शेअर बाजार बहुतांश प्रसंगी एका मर्यादेतच राहिला असल्याचं दिसून येतं. तसंच काही काळ बाजारात तेजीही दिसून आली आहे.
मुहूर्त ट्रेडिंगच्या दृष्टीने आणखी एक महत्त्वाचे काम म्हणजे, विश्वासार्ह आणि दर्जेदार स्टॉक्सची खरेदी करणे. बहुतांश लार्ज-कॅप स्टॉक्स उच्च मूल्यांकन पातळीवर व्यवहार करत असतात. विशेष करून मुहूर्त ट्रेडिंग काळात दीर्घ कालावधीच्या दृष्टीने ब्ल्यू चिप स्टॉक्सची निवड करण्याचा सल्ला देण्यात येतो. जेणेकरून तुमच्या पोर्टफोलिओला मजबूती देऊन स्थैर्य आणता येईल.

Check Also

ओला कॅबचा आयपीओ लवकरच बाजारात ५०० लाखाचा निधी उभारण्यासाठी महिनाभरात आणणार

SoftBank अर्थसहाय्याने प्रणित ओला कॅब Ola Cabs पुढील तीन महिन्यांत $५०० दशलक्ष उभारण्यासाठी प्रारंभिक सार्वजनिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *