Breaking News

व्हॉट्सअॅपवर हाय करा आणि मिळवा १० लाखांचं कर्ज अशी आहे प्रोसेस

मुंबई: प्रतिनिधी

तुम्हाला १० लाख रुपयांपर्यंतच्या कर्जाची गरज असेल तर अवघ्या काही मिनिटांमध्ये तुम्हाला ते मिळेल. यासाठी फक्त तुम्हाला व्हॉट्सअॅपवर हाय म्हणावे लागेल. त्यानंतर काहीमिनिटातच तुमच्या खात्यावर १० लाख रुपये जमा होतील.

भारतात प्रथमच अशा प्रकारची सुविधा नॉन-बँकिंग फायनान्शियल कंपनी इंडिया इन्फोलाईन (आयआयएफएल – IIFL) ने सुरू केली आहे. कंपनीने १० लाख रुपयांचे व्यवसाय कर्ज त्वरित देण्याची योजना सुरू केली आहे. हे कर्ज तुम्हाला व्हॉट्सअॅपवर मिळेल. व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांना हे कर्ज काही मिनिटांत मिळू शकते, असे कंपनीने म्हटले आहे.

कंपनीने सांगितले की, इंडिया इन्फोलाईन ही योजना सुरू करणारी देशातील पहिली कंपनी आहे. यासाठी किमान कागदपत्रांची आवश्यकता असेल. या कर्जासाठी कंपनी आर्टिफिशियल इंटेलिजेंस वापरेल. याद्वारे वापरकर्त्यांचे तपशील तपासले जातील. यातून फक्त कर्जदाराचा अर्ज आणि केवायसी पूर्ण होईल. यासह बँक खाते देखील याद्वारे व्हेरिफाय केले जाईल.

या योजनेअंतर्गत तुम्ही किमान १० हजार आणि कमाल १० लाख रुपयांपर्यंत कर्ज घेऊ   शकता. तुम्हाला हे कर्ज ५ वर्षात म्हणजेच ६० महिन्यांत परत करावे लागेल. तुमच्या कर्जाची रक्कम तुमच्या खात्यात २४ तासांच्या आत जमा होईल. हे कर्ज १० मिनिटांत मंजूर होईल. कर्ज घेण्यासाठी तुम्हाला 9019702184 वर व्हॉट्सअॅपद्वारे हाय म्हणावे लागेल. हा व्हॉट्सअॅप क्रमांक आयआयएफएल फायनान्सचा आहे. यानंतर तुम्हाला कंपनीकडून  स्वागत संदेश येईल. यामध्ये, तुम्हाला व्यवसाय कर्जासाठी अर्ज कसा करावा आणि अलर्ट कसा मिळवावा याबद्दल विचारले जाईल. तुम्हाला काही माहिती विचारली जाईल. यामध्ये तुमचे नाव आहे, व्यवसाय तुमचा आहे किंवा भागीदारीत चालवायचा आहे? व्यवसायाची उलाढाल आणि व्यवसाय किती काळ   चालू आहे याची माहिती द्यावी लागेल. सर्व तपशील दिल्यानंतर आपल्याला आपल्या तपशीलांची पुष्टी करण्यास सांगितलं जाईल. यानंतर तुमचा क्रेडिट इतिहास तपासला जाईल.

तुमच्या तपशीलांची पुष्टी केल्यानंतर आयआयएफल ओटीपीद्वारे तुमच्या क्रेडिट हिस्ट्रीची  पडताळणी करेल. पडताळणी केल्यानंतर तुम्हाला कर्जाची रक्कम दिली जाईल. यामध्ये   कर्जाची रक्कम, व्याज आणि मासिक हप्त्याची माहिती दिली जाईल. अंतिम कर्जाची रक्कम निवडल्यानंतर, तुम्हाला तुमची बँक आणि आयएफसी कोड द्यावा लागेल. यानंतर कर्जाची रक्कम तुमच्या खात्यात जमा होईल. जर तुम्ही ८.११ लाख रुपयांचे कर्ज घेतले असेल तर तुमचा मासिक हप्ता २३,३३३ रुपये असेल. म्हणजेच, तुम्हाला वार्षिक २४ टक्के व्याज द्यावे लागेल.

Check Also

व्होडाफोन आयडियाचा एफपीओ १८ एप्रिलला वित्त विभागाच्या अधिकाऱ्यांकडून स्वागत

दूरसंचार क्षेत्रातील स्पर्धेला पाठिंबा देण्यासाठी, सरकार फॉलो ऑन पब्लिक ऑफरिंग (FPO) द्वारे व्होडाफोन आयडियाच्या निधी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *