Breaking News

गृहकर्ज आणखी स्वस्त… बँक ऑफ महाराष्ट्रकडून व्याजदरात ०.४० टक्के कपात

मराठी ई-बातम्या टीम
गृहकर्जाचे व्याजदर आणखी खाली आले आहेत. बँक ऑफ महाराष्ट्रने ६.४० टक्के दराने गृहकर्ज देण्याची घोषणा केली आहे. बँकेने व्याजदरात ०.४० टक्क्यांनी कपात केली आहे. याआधी गृहकर्जाचा दर ६.८० टक्के होता. बँक ऑफ महाराष्ट्रचा गृहकर्ज पोर्टफोलिओ २० हजार कोटी रुपये आहे.
बँक ऑफ महाराष्ट्र बँकिंग क्षेत्रातील सर्वात कमी व्याजदर गृहकर्ज देणारी ठरली आहे. यापूर्वी सर्वात कमी व्याजदर युनियन बँकेचा होता. ही बँक ६.५० टक्के दराने कर्ज देत होती. याची घोषणा ऑक्टोबरमध्येच केली होती. आता बँक ऑफ महाराष्ट्रने गृहकर्जाच्या दरात कपात करण्याची मोठी घोषणा केली आहे. बँक ऑफ महाराष्ट्रने म्हटले आहे की त्यांचे गृह कर्ज दर आणि कार कर्जाचे दर दोन्ही कमी झाले आहेत.
बँकेने कार कर्जाच्या व्याजदरात ०.२५ टक्के कपात करून ६.८० टक्क्यांवर आणला आहे. हा दर अशा ग्राहकांसाठी उपलब्ध असेल ज्यांचे CIBIL स्कोअर चांगले आहे. १३ डिसेंबरपासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) सध्या ६.७ टक्के दराने गृहकर्ज देत आहे. एसबीआयचा कार कर्जाचा व्याज दर ७.२५ टक्के आहे. HDFC Ltd चा व्याजदर ६.७ टक्के आहे.
युनियन बँकेचा व्याजदर २७ ऑक्टोबरपासून लागू झाला आहे. आतापर्यंत सर्व बँकांचे व्याजदर ६.५० टक्के पेक्षा जास्त आहेत. जे ग्राहक नवीन कर्ज घेत आहेत किंवा जे ग्राहक आपले कर्ज इतर कोणत्याही बँकेतून युनियन बँकेत हस्तांतरित करतील त्यांना नवीन दर लागू होतील.
युनियन बँकेने सांगितले की, सणासुदीच्या काळात कर्जाची वाढती मागणी लक्षात घेऊन हा दर ग्राहकांच्या फायद्यासाठी जाहीर केला आहे. सणासुदीच्या काळात गृहकर्ज खरेदीचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे गृहकर्जाची मागणीही जास्त असते. गृहकर्जाच्या कमी व्याजदरामुळे युनियन बँक सर्वात कमी व्याजदरात गृहकर्ज देत आहे.
युनियन बँकेचे एमडी आणि सीईओ राजकिरण राय यांनी सांगितले की, ज्यांचे सिबिल स्कोअर ८०० पेक्षा जास्त आहे त्यांच्यासाठी हा गृहकर्जाचा व्याजदर असेल. ठेवींवरील व्याजदर कमी झाल्याने गृहकर्जाचे व्याजदर कमी होत आहेत. या कारणास्तव कर्जाच्या व्याजदरात कपात करण्याची संधी असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
सध्या कोटक महिंद्रा बँक, सारस्वत बँकेसह अनेक बँका ६.५० टक्के दराने गृहकर्ज देत आहेत. ICICI बँक ६.७० टक्के, SBI ६.७० टक्के बँक ऑफ बडोदा ६.७५ टक्के, बँक ऑफ महाराष्ट्र ६.८० टक्के दराने गृहकर्ज देत आहे. बहुतांश बँका आणि NBFC चे गृहकर्जाचे व्याजदर सध्या ६.९० टक्क्यांच्या खाली आहेत.

Check Also

केंद्र सरकार EPFO पेन्शन ९००० रुपयांनी वाढवणार ? जाणून घ्या कोणाला मिळणार फायदा

मराठी ई-बातम्या टीम केंद्र सरकार कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) पेन्शन योजनेच्या (EPS) सदस्यांना …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *