Breaking News

गॅस सिलिंडरपासून अपघात झाल्यास मिळेल ५० लाखांची भरपाई, जाणून घ्या… घराच्या नुकसानीसाठीही करता येणार दावा

मुंबई: प्रतिनिधी

आजच्या काळात प्रत्येकाच्या घरात गॅस सिलिंडर आहे. छोट्याशा चुकीमुळे मोठा अपघात होऊ शकतो म्हणून गॅस सिलिंडरचा वापर अत्यंत जपून केला जातो. अशा परिस्थितीत एलपीजी वापरताना कोणती खबरदारी घेतली पाहिजे आणि कोणत्याही प्रकारची दुर्घटना घडल्यास काय केले पाहिजे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. तसेच एलपीजी गॅस सिलिंडरचा स्फोट झाला किंवा गॅस गळतीमुळे अपघात झाला तर ग्राहक म्हणून तुमचे अधिकार काय आहेत, हेही जाणून घेतले पाहिजे.

५० लाख रुपयांपर्यंतचा विमा

एलपीजी कनेक्शन घेतल्यावर पेट्रोलियम कंपन्या ग्राहकाला वैयक्तिक अपघात कवच देतात. एलपीजी सिलेंडरमधून गॅस गळती किंवा स्फोट झाल्यामुळे अपघात झाल्यास ५० लाख रुपयांपर्यंतचा हा विमा आर्थिक मदतीच्या स्वरूपात आहे. या विम्यासाठी पेट्रोलियम कंपन्यांची विमा  कंपन्यांशी भागीदारी आहे.

डिलिव्हरीपूर्वी सिलिंडर पूर्णपणे ठीक आहे की नाही हे तपासणे आवश्यक आहे. ग्राहकाच्या घरी एलपीजी सिलेंडरमुळे झालेल्या अपघातात जीवित आणि मालमत्तेच्या हानीसाठी वैयक्तिक अपघात संरक्षण देय आहे. अपघातात ग्राहकाच्या मालमत्तेचे/ घराचे नुकसान झाल्यास २ लाख रुपयांपर्यंतचा दावा करता येतो.

जाणून घ्या क्लेम कसा मिळवायचा

अपघातानंतर दावा करण्याची प्रक्रिया अधिकृत वेबसाइट myLPG.in (http://mylpg.in) वर दिली आहे. ग्राहकाला मिळालेल्या सिलिंडरमुळे त्याच्या घरात एखादा अपघात झाला तर ती व्यक्ती ५० लाख रुपयांपर्यंतच्या विम्यासाठी पात्र ठरते.

  1. अपघात झाल्यास कमाल ५० लाख रुपयांपर्यंतची भरपाई मिळू शकते. अपघातात जखमी झालेल्या प्रत्येक व्यक्तीला कमाल १० लाख रुपयांची भरपाई दिली जाऊ शकते.
  2. एलपीजी सिलिंडरचे विमा कवच मिळविण्यासाठी, ग्राहकाने तात्काळ जवळच्या पोलीस स्टेशनला आणि त्याच्या एलपीजी वितरकाला  अपघाताची माहिती द्यावी.
  3. इंडियन ऑइल, HPC आणि BPC सारख्या तेल विपणन कंपन्यांच्या वितरकांना व्यक्ती आणि मालमत्तांसाठी तृतीय पक्ष विमा संरक्षणासह अपघातांसाठी विमा पॉलिसी घ्यावी लागते.
  4. पॉलिसी कोणत्याही वैयक्तिक ग्राहकाच्या नावावर नाहीत. परंतु प्रत्येक ग्राहक या पॉलिसीमध्ये समाविष्ट आहेत. यासाठी त्याला कोणताही प्रीमियम भरावा लागत नाही.
  5. मृत्यू झाल्यास एफआयआरची प्रत, वैद्यकीय बिले आणि जखमींची वैद्यकीय बिले आणि पोस्टमॉर्टम रिपोर्ट, मृत्यू प्रमाणपत्र सोबत ठेवा.

गॅस सिलिंडरचा अपघात झाल्यास सर्वप्रथम पोलिसांत तक्रार नोंदवावी लागते. यानंतर संबंधित क्षेत्रीय कार्यालय अपघाताचे कारण काय याचा तपास करतो.एलपीजीमुळे अपघात असल्यास एलपीजी वितरक एजन्सी क्षेत्र कार्यालय विमा कंपनीच्या स्थानिक कार्यालयाला त्याबद्दल माहिती देईल. यानंतर संबंधित विमा कंपनीकडे दावा दाखल केला जातो. ग्राहकाला दाव्यासाठी अर्ज करण्याची किंवा विमा कंपनीशी थेट संपर्क साधण्याची गरज नाही.

Check Also

केंद्र सरकार EPFO पेन्शन ९००० रुपयांनी वाढवणार ? जाणून घ्या कोणाला मिळणार फायदा

मराठी ई-बातम्या टीम केंद्र सरकार कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) पेन्शन योजनेच्या (EPS) सदस्यांना …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *