Breaking News

एसबीआय आणि आरबीआय बँकेकडून अहवाल प्रसिध्द, गुंतवणूक वाढली तर ठेवी कमी झाल्या शेअर बाजारातील तेजीचा परिणाम, FD मधून पैसे काढून IPO मध्ये गुंतवणूक

मराठी ई-बातम्या टीम

गेल्या १२-१८ महिन्यांपासून भारतीय बाजारपेठेत आयपीओला (IPO) गुंतवणूकदारांना मोठा प्रतिसाद मिळत आहेत. लोक त्यांच्या मुदत ठेवी मोडत आहेत आणि त्यांचे पैसे बाजारात गुंतवत आहेत. त्यामुळे गेल्या पंधरवड्यात बँकांच्या ठेवींमध्ये २.६७ लाख कोटी रुपयांची घट झाली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) याबाबतची आकडेवारी जाहीर केली आहे.

आरबीआयच्या आकडेवारीनुसार, दिवाळीनंतर बँक ठेवींमध्ये मोठी घट झाली आहे. १९ नोव्हेंबर रोजी संपलेल्या पंधरवड्यात बँक ठेवी २.६७ लाख कोटी रुपयांनी कमी होऊन १५७.८ लाख कोटी रुपयांवर आल्या आहेत. ५ नोव्हेंबर २१ रोजी संपलेल्या पंधरवड्यात ठेवींमध्ये ३.३ लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

एसबीआयने अहवालात माहिती दिली

SBI चीफ इकॉनॉमिस्ट सौम्यकांती घोष यांनी त्यांच्या अहवालात सांगितले की, ठेवींमधील ही वाढ आणि त्यानंतरचा मंदीचा कल याच्या अगदी विरुद्ध आहे. ठेवींमध्ये ही मोठी वाढ १९९७ नंतरची पाचवी सर्वात मोठी वाढ आहे. २५ नोव्हेंबर २०१६ ला संपलेल्या पंधरवड्यात ४.१६ लाख कोटी रुपये, ३० सप्टेंबर २०१६ च्या पंधरवड्यात ३.५५ लाख कोटी रुपये, २९ मार्च २०१९ च्या पंधरवड्यात ३.४६ लाख कोटी रुपये आणि ३.४१ लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

नोव्हेंबर २०१६ मध्ये ठेवी वाढल्या

नोटाबंदीमुळे नोव्हेंबर २०१६ मध्ये बँक ठेवींमध्ये वाढ झाल्याचे अहवालात म्हटले आहे. नवीन युग आणि इतर कंपन्यांच्या इश्यूनंतर शेअर बाजारात तेजीच्या आशेने लोकांनी बँकांतून पैसे काढले. ५ नोव्हेंबर २०२१ रोजी संपलेल्या पंधरवड्यात बँकिंग प्रणालीमध्ये ठेवींचा ओघ वाढला आहे. डिजिटल व्यवहारांच्या तेजीमुळे चालू आर्थिक वर्षात रोख रकमेचा वापर कमी झाला असावा, असे घोष यांचे म्हणणे आहे. 

दरम्यान, ५ नोव्हेंबर रोजी संपलेल्या पंधरवड्यात सर्व व्यावसायिक बँकांच्या कर्जामध्ये १.१८ लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे. सणासुदीच्या मागणीमुळे वार्षिक आधारावर ७.१ टक्के कर्जात वाढ झाली आहे.  सप्टेंबर २०२१ मध्ये १५.६ लाख नवीन गुंतवणूकदार बाजारात सामील झाले. सप्टेंबर २०२० मध्ये, ७.५ लाख गुंतवणूकदारांचा सहभाग होता. यावर्षी एप्रिलमध्ये १०.३ लाख, मेमध्ये १४.८ लाख, जूनमध्ये १४.९ लाख, जुलैमध्ये १५.४ लाख, ऑगस्टमध्ये १४.९ लाख गुंतवणूकदार सामील झाले. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये ४.१ लाख, मेमध्ये ४.२ लाख, जूनमध्ये ५.६ लाख, जुलैमध्ये ६.७ लाख आणि ऑगस्टमध्ये ८.२ लाख गुंतवणूकदार सामील झाले होते.

Check Also

विमा दाव्याच्या सेटलमेंटमध्ये एलआयसी तिसऱ्या क्रमांकावर कंपन्यांचा रेशो ९० टक्क्यांपेक्षा जास्त

मराठी ई-बातम्या टीम आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये जीवन विमा कंपन्यांनी ९० टक्क्यांपेक्षा जास्त क्लेम सेटलमेंट केले आहे. यामध्ये देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसी तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारतीय विमा नियामक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *