Breaking News

डिसेंबर अखेर भारताची विक्रमी निर्यात ९ महिन्यांत निर्यात ३०० अब्ज डॉलरवर

मराठी ई-बातम्या टीम

इतिहासात पहिल्यांदाच भारताने डिसेंबरमध्ये ३७.२९ अब्ज डॉलरची निर्यात केली. निर्यातील वार्षिक आधारावर ३७ टक्के वाढ झाली आहे. डिसेंबर २०२० मध्ये भारताने २७.२२ अब्ज डॉलरची निर्यात केली होती. दरम्यान, मागील ९ महिन्यांत भारताच्या निर्यातीने ३०० अब्ज डॉलरचा टप्पा ओलांडला आहे.

याबाबत केंद्रीय मंत्री पीयूष गोयल म्हणाले की, भारत २०२१-२२ मध्ये ४०० अब्ज डॉलर निर्यातीचे लक्ष्य गाठण्याच्या मार्गावर आहे. भारताने जवळपास सर्वच क्षेत्रात प्रगती पाहिली आहे. अभियांत्रिकी वस्तूंच्या निर्यातीत ३७ टक्के, रत्ने आणि दागिने निर्यातीत १६ टक्के  वाढ झाली आहे. तर रेडीमेड वस्त्र निर्यातीत २२ टक्के आणि इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनाच्या  निर्यातीत ३३ टक्के वाढ झाली.

एप्रिल-डिसेंबर २०२० पासून ४८.८५ टक्के अधिक निर्यात

भारताने एप्रिल-डिसेंबर २०२१ मध्ये २९९.७४ अब्ज डॉलरची निर्यात केली, जी एप्रिल-डिसेंबर २०२० मध्ये २०१.३७ अब्ज डॉलरवरून ४८.८५ टक्के वाढली आहे. एप्रिल-डिसेंबर २०१९ मध्ये ते २३८.२७ अब्ज डॉलरची निर्यात होती. त्या तुलनेत ही वाढ २५.८० टक्के आहे.

डिसेंबरमध्ये आयात ५९.२७ अब्ज डॉलर

डिसेंबर २०२१ मध्ये भारताची आयात ५९.२७ अब्ज डॉलर होती, जी डिसेंबर २०२० मधील ४२.९३ अब्ज डॉलर वरून ३८.०६ टक्के वाढली आहे. डिसेंबर २०१९ मध्ये ते ३९.५९ अब्ज डॉलरची आयात झाली होती. आयातीत ४९.७ टक्के वाढ झाली आहे.

एप्रिल-डिसेंबर २०२० पासून ६९.२७ टक्के अधिक आयात

एप्रिल-डिसेंबर २०२१ मध्ये भारताची आयात ४४३.७१ अब्ज डॉलर होती, जी एप्रिल-डिसेंबर २०२० मधील २६२.१३ अब्ज डॉलरच्या तुलनेत ६९.२७ टक्के वाढली आहे.   तर एप्रिल-डिसेंबर २०१९ मध्ये आयात ३६४ अब्ज डॉलर होती. त्या तुलनेत ही वाढ २१.८४ टक्के आहे.

व्यापार तूट २१.९९ अब्ज डॉलर

डिसेंबर २०२१ मध्ये व्यापार तूट २१.९९ अब्ज डॉलर होती. एप्रिल-डिसेंबर २०२१ दरम्यान ही तूट ४३.९७ अब्ज डॉलर होती. डिसेंबर २०२१ मध्ये बिगर पेट्रोलियम वस्तूंची निर्यात ३१.६७ दशलक्ष अमेरिकन डॉलर इतकी होती, यात डिसेंबर २०२० मध्ये असलेल्या २४.८८ दशलक्ष डॉलर निर्यातीच्या तुलनेत २७.३१ टक्के वाढ झाली. एप्रिल – डिसेंबर २०२१ दरम्यान भारताची बिगर पेट्रोलियम पदार्थांची एकूण निर्यात २५७.१४ दशलक्ष डॉलर इतकी होती. यात एप्रिल – डिसेंबर २०२० दरम्यान असलेल्या १८३.९१ दशलक्ष डॉलर निर्यातीच्या तुलनेत ३९.८२ टक्के वाढ नोंदवली गेली.

एप्रिल – डिसेंबर २०२१ दरम्यान भारताची बिगर पेट्रोलियम पदार्थांची एकूण आयात ३२५.७३ दशलक्ष डॉलर इतकी होती. यात एप्रिल – डिसेंबर २०२० दरम्यान असलेल्या २०८.२५ दशलक्ष डॉलर आयातीच्या तुलनेत ५६.४१ टक्के वाढ नोंदवली गेली.

Check Also

विमा दाव्याच्या सेटलमेंटमध्ये एलआयसी तिसऱ्या क्रमांकावर कंपन्यांचा रेशो ९० टक्क्यांपेक्षा जास्त

मराठी ई-बातम्या टीम आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये जीवन विमा कंपन्यांनी ९० टक्क्यांपेक्षा जास्त क्लेम सेटलमेंट केले आहे. यामध्ये देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसी तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारतीय विमा नियामक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *