Breaking News

मोबाईलवर ४० टक्के तर इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवर ७० टक्के मिळणार सूट फ्लिपकार्ट, अॅमेझॉनकडून रिपब्लिक सेलची घोषणा

मराठी ई-बातम्या टीम

तुम्हाला स्वस्तात स्मार्टफोन, स्मार्ट टीव्ही, स्मार्टवॉच, इअरबड्स तसेच इतर इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदी करण्याची आता संधी मिळणार आहे. कारण फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनने रिपब्लिक सेलची घोषणा केली आहे. Amazon चा ग्रेट रिपब्लिक डे सेल १७ जानेवारी ते २० जानेवारी पर्यंत चालेल. पण Amazon प्राइमचे सदस्य या सेलमध्ये १६ जानेवारीपासूनच खरेदी करू शकतील. फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डेज सेल देखील १७ जानेवारीपासून सुरू होईल. पण Flipkart चा हा सेल २२ जानेवारीला संपणार आहे. फ्लिपकार्ट प्लस सदस्यांसाठी हा सेल १६ जानेवारीपासून सुरू होईल.

फ्लिपकार्टवर ऑफर आणि सूट

फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डेज सेलमध्ये खरेदीदारांना ICICI बँक क्रेडिट आणि डेबिट कार्डवर १०% ची झटपट सूट दिली जाईल. सध्या, फ्लिपकार्टने स्मार्टफोनवर उपलब्ध असलेल्या विशिष्ट डीलबद्दल सांगितले नाही. तथापि, पोको, ऍपल, रिअॅलिटी, सॅमसंग आणि इतर ब्रँड्सच्या स्मार्टफोन्सवर बंपर सूट दिली जाईल. याशिवाय इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवर ८०% सूट, स्मार्टवॉच, फिटनेस बँडवर ६०% आणि लॅपटॉपवर ४०% सूट असेल.

Amazon ऑफर आणि सूट

Amazon ‘ग्रेट रिपब्लिक डे सेल’ OnePlus, Xiaomi, Samsung, iQoo, Apple आणि इतर ब्रँडच्या मोबाईल आणि अॅक्सेसरीजवर ४०% पर्यंत सूट देत आहे. जे लोक टीव्ही खरेदी करण्याचा विचार करत आहेत त्यांना आता Redmi, OnePlus, Sony, Samsung, Mi सारख्या टॉप ब्रँडवर ६०% पर्यंत सूट मिळू शकते. इलेक्ट्रॉनिक्स आणि अॅक्सेसरीजच्या बाबतीत, इंटेल, एचपी, बोट, लेनोवो, असुस, डेल, सॅमसंग, एलजी, सोनी सारख्या ब्रँड्सकडून ७०% पर्यंत सूट मिळणार आहे.

व्हिडिओ गेम्सवर ५५% पर्यंत सूट

या सेलमध्ये व्हिडिओ गेम्सवर ५५% पर्यंत सूट मिळेल, तर फायर टीव्ही उपकरणांवर ४८% सूट मिळेल. इको स्मार्ट स्पीकरवर ५०% पर्यंत सूट मिळेल. किंडल वाचकांना ३,४०० रुपयांपर्यंत सूट मिळेल. सेल दरम्यान Amazon SBI क्रेडिट कार्डवर १०% इन्स्टंट डिस्काउंट ऑफर करेल.

नवीन स्मार्टफोन सादर

या सेलमध्ये पहिल्यांदाच अनेक नवीन लाँच केलेले स्मार्टफोन देखील सादर केले जातील. यामध्ये OnePlus 9RT, Samsung Galaxy S21 FE 5G, Redmi Note 11T 5G आणि Xiaomi 11T Pro 5G सारख्या स्मार्टफोनचा समावेश आहे. या सेलमध्ये स्मार्ट टीव्ही, स्मार्टवॉच, इअरबड्स आणि इतर उत्पादनेही अतिशय स्वस्तात विकली जातील. यामध्ये तुम्ही एक्सचेंज आणि बँक ऑफर्सचाही लाभ घेऊ शकता.

Check Also

रिलायन्स जिओचा आयपीओ येणार, मूल्यांकन १०० अब्ज डॉलर गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी

मराठी ई-बातम्या टीम मुकेश अंबानींची टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओ यावर्षी (आयपीओ) IPO आणू शकते. आयपीओचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *