Breaking News

भारत-चीन वादाचा परिणाम नाहीचः उलट व्यापार विक्रमी पातळीवर दोन्ही देशांच्या व्यापारात ४६.४ टक्के वाढ झाली

मराठी ई-बातम्या टीम

भारत आणि चीन यांच्यामधील व्यापार यावर्षी विक्रमी पातळीवर पोहोचला आहे. १ जानेवारी ते ३० नोव्हेंबर २०२१ या कालावधीत दोन्ही देशांमध्ये एकूण ८.५७ लाख कोटी रुपयांचा व्यवसाय झाला आहे. मागील पूर्ण वर्षाच्या तुलनेत यामध्ये ४६.४ टक्के वाढ झाली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या ११ महिन्यांत भारताने चीनकडून ६.५९ लाख कोटी रुपयांच्या वस्तू खरेदी केल्या आहेत. मागील वर्षाच्या तुलनेत ही आयात ४९ टक्के अधिक आहे. तर या कालावधीत चीनने भारताकडून एकूण १.९८ लाख कोटी रुपयांचे सामाने घेतले आहे.  गेल्या वर्षीच्या तुलनेत ही खरेदी ३८.५ टक्के जास्त  आहे.
व्यापार वाढला असला तरी भारताची व्यापार तूट वाढून ४.६१ लाख कोटी झाली आहे, ही तूट आतापर्यंतची सर्वाधिक आहे. दोन्ही देशांमधील विक्रमी व्यापाराचा हा आकडा जगाला चकित करणारा आहे . कारण गेल्या वर्षभरापासून सीमेवर दोन्ही देशांमध्ये तणाव वाढला आहे. दोन्ही बाजूला ५०-५० हजारांहून अधिक सैनिक तैनात आहेत. ही संख्या १९६२ च्या युद्धानंतरची सर्वाधिक आहे.
सीमा वादावर कमांडर स्तरावरील १२ वेळा झालेल्या चर्चा अयशस्वी होऊनही दोन्ही देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयात समन्वय कायम आहे. चीन सरकारने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, भारतासोबतच्या व्यापाराच्या दृष्टिकोनातून २०२१ हे वर्ष त्यांच्यासाठी खूप चांगले आहे. व्यापार वाढवण्यासाठी दोन्ही देशांनी उच्चस्तरीय आर्थिक आणि व्यापार संवाद तयार करण्याचे मान्य केले आहे. यामध्ये भारताचे परराष्ट्र मंत्री आणि चीनचे उपप्रधानमंत्री उपस्थित राहणार आहेत.
वर्ष २०२० मध्ये भारताचा चीनसोबतचा व्यापार ६.६ लाख कोटी रुपयांचा (८७.६ अब्ज डॉलर) राहिला आहे. यापैकी सुमारे ५०.२८ लाख अब्ज डॉलरची चीनमधून भारतात आयात करण्यात आली. या अगोदर २०१९ मध्ये, भारताने चीनकडून २०.१७ अब्ज डॉलरची विद्युत यंत्रसामग्री आणि उपकरणे आयात केली. याशिवाय चीनेकडून केलेली ८.३९ अब्ज डॉलरची अब्ज सेंद्रिय रसायने आणि १.६७ अब्ज डॉलरची खते ही भारतातील सर्वोच्च आयात होती.
लोह खनिज, पेट्रोलियम इंधनची निर्यात
भारताकडून चीनला होत असलेल्या  निर्यातीत प्रामुख्याने लोहखनिज, पेट्रोलियम इंधन, सेंद्रिय रसायने, शुद्ध तांबे, सूती धागे यांचा समावेश होतो. याशिवाय निर्यात होणाऱ्या खाद्य पदार्थांमध्ये मासे, काळी मिरी, वनस्पती तेल, चरबी इत्यादी प्रमुखआहेत. ग्रॅनाइट ब्लॉक्स आणि इतर बांधकाम दगड आणि कच्चा कापूस देखील निर्यात केला गेला.

या वस्तू आयात
गेल्या काही वर्षांत चीनमधून भारतात आयात करण्यात आलेल्या प्रमुख वस्तूंमध्ये स्वयंचलित डेटा प्रोसेसिंग मशीन आणि युनिट्स, टेलिफोन उपकरणे आणि व्हिडिओ फोन, इलेक्ट्रॉनिक सर्किट्स, ट्रान्झिस्टर आणि सेमीकंडक्टर उपकरणे, प्रतिजैविक, खते, ध्वनी रेकॉर्डिंग उपकरणे आणि टीव्ही कॅमेरा, ऑटो घटक आणि अॅक्सेसरीज आदींचा समावेश आहे. भारत आपल्या देशांतर्गत गरजा पूर्ण करण्यासाठी चीनकडून मोठ्या प्रमाणावर तयार उत्पादने आयात करतो. इलेक्ट्रॉनिक हार्डवेअर मार्केटमध्ये चीनचे वर्चस्व आहे.

Check Also

विमा दाव्याच्या सेटलमेंटमध्ये एलआयसी तिसऱ्या क्रमांकावर कंपन्यांचा रेशो ९० टक्क्यांपेक्षा जास्त

मराठी ई-बातम्या टीम आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये जीवन विमा कंपन्यांनी ९० टक्क्यांपेक्षा जास्त क्लेम सेटलमेंट केले आहे. यामध्ये देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसी तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारतीय विमा नियामक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *