Breaking News

अखेर आजपासून दुकाने ११ पर्यंत तर हॉटेल्स १२ वाजेपर्यत खुली राज्य सरकारकडून आदेश जारी

मुंबई : प्रतिनिधी

राज्यातील कोरोनाची परस्थिती आटोक्यात आल्याने परिस्थिती पूर्वरत करण्याच्या अनुशंगाने दुकाने आणि हॉटेलच्या वेळा वाढविण्याचे संकेत काल मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी टास्कफोर्स समोबतच्या बैठकीत दिले. त्यानुसार आजपासून सर्व प्रकारची दुकाने रात्री ११ वाजेपर्यत तर उपहारगृहे, हॉटेल्स, बार-रेस्टॉरंट १२ वाजेपर्यत सुरु ठेवण्यास परवानगी दिली.

यासंदर्भात आज दुपारी राज्य सरकारकडून शासन आदेश जारी करण्यात आला. त्यानुसार आजपासून सर्व प्रकारची दुकाने ११ वाजेपर्यत आणि हॉटेल्स रात्री १२ वाजेपर्यत सुरु राहणार आहेत. त्याचबरोबर या वेळा वाढीव स्वरूपात ठेवण्याचे किंवा त्यात घट करण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला देण्यात आले आहेत. मात्र हे निर्बंध लागू केल्यानंतर त्यात पुन्हा सूट द्यायची असेल तर राज्य आपतकालीन समितीची मान्यता घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.

काल मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी टास्कफोर्सबरोबर बैठक घेतली. त्यात दिवाळीच्या तोंडावर नागरीकांकडून विविध वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारात गर्दी केली जावू शकते. तसेच हॉटेल्समधून खाण्या-पिण्याच्या वस्तुंबरोबर ऑर्डरही मागविल्या जातात. त्यामुळे वेळा वाढविण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. तत्पूर्वी मुख्यमंत्री ठाकरे यांच्या बैठकीनंतर राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दुकानांच्या वेळात वाढ होणार असल्याचे सांगत दुकानांसाठी रात्री ११ वाजेपर्यंत तर हॉटेल्सच्या वेळेत रात्री १२ वाजेपर्यत वाढ केली जावू शकते असे सांगत हॉटेल्सवाल्यांना रात्री १ वाजेपर्यत शेवटची ऑर्डर घेतली जावू शकते असे त्यांनी जाहीर केले होते.

विशेष म्हणजे हॉटेल चालकांच्या संघटनांकडून आणि दुकानदार संघटनेकडून नवरात्रोत्सवाच्या आधीपासून वेळा वाढविण्यासंदर्भात सातत्याने राज्य सरकारकडे मागणी करण्यात येत होती. त्यावेळी मुख्यमंत्र्यांकडून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर वेळ वाढवून देण्यास सातत्याने नकार दिला जात होता. मात्र गणेशोत्सवानंतर नवरात्रोस्तवातही राज्यातील शहरी भागात कोरोनाचे संकट नियंत्रित राहील्याचे दिसून येत आहे. तसेच साधारणत: २ हजारच्या जवळपास असलेल्या संख्येतही आता चांगलीच घट झाल्याचे दिसून येवू लागल्याने अखेर दुकाने आणि उपाहारगृहे उघडण्यास मान्यता देण्यात आल्याचे दिसून येत आहे.

  वेळा वाढविण्यासंदर्भातील हाच तो शासन निर्णय:-

Check Also

मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या भेटीनंतर शरद पवार म्हणाले… काँग्रेसला बाजूला सारून कोणताही पर्याय देता येणार नाही

मुंबई: प्रतिनिधी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बँनर्जी या तीन दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर आल्या असून काल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *