Breaking News

अखेर राज्य सरकारकडून निर्बंधात शिथिलताःजाणून घ्या कोणत्या सवलती दिल्या मात्र त्या ११ जिल्ह्यामध्ये निर्बंध कायम

मुंबईः विशेष प्रतिनिधी
राज्य सरकारने शेवटी नागरीकांच्या दबावापुढे नमत MissionBeginAgain अंतर्गत निर्बंधात शिथिलता देत असल्याचे जाहिर केले असून आता सर्व दुकाने रात्री ८ वाजेपर्यंत खुली ठेवण्यास परवानगी देत रविवारी मात्र संपूर्ण शहर बंद ठेण्याचे सुधारीत नियम आज राज्य सरकारकडून संध्याकाळी जारी करण्यात आले. मात्र कोरोनाची संख्या सातत्याने वाढत असलेल्या ११ जिल्ह्यामध्ये लेवल ३ चे निर्बंध कायम राहणार असल्याचे स्पष्ट केले.
राज्यातील कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, सोलापूर, अहमदनगर, बीड, रायगड आणि पालघर या ११ जिल्ह्यामध्ये निर्बंध कायम राहणार असून हे निर्बंध लेवल ३ मधील राहणार असल्याचे स्पष्ट केले. तसेच सिंधुदुर्ग, सातारा आणि अहमदनगरमध्ये कोरोना बाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत असल्याने या जिल्ह्यामधील निर्बंध जिल्हा आपतकालीन व्यवस्थेकडून आणखी कडक करण्यात येणार असल्याचे राज्य सरकारने आपल्या प्रसिध्दीपत्रकात स्पष्ट केले.
मुंबईसह उपनगर आणि ठाणे जिल्ह्यात निर्बंध कमी करायचे कि पुन्हा वाढवायचे याचे अधिकार या शहरांमधील जिल्हा आपत्ती प्राधिकरणाने निर्णय घ्यायचा आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून थेट अशी सवलत मुंबई आणि उपनगरातील रहिवाशांना दिलेली नाही.
या जिल्ह्याशिवाय इतर जिल्ह्यांमध्ये निर्बंधात सवलत देत सर्व अत्यावश्यक-अनावश्यक अशी सर्व प्रकारची शॉपिंग मॉलसह सर्व दुकाने सोमवार ते शुक्रवार या दिवशी रात्री ८ वाजेपर्यंत खुली ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. तर शनिवारी ही सर्व दुकाने दुपारी ३ वाजेपर्यंत आणि रविवारी पूर्ण दिवसभर बंद ठेवण्याची मुभा राज्य सरकारने दिली.
सर्व पध्दतीचे बाग-बगिछे, खुली मैदाने, क्रिंडागणे आदी चालण्यासाठी, फिरण्यासाठी आणि रनिंग, सायकलिंग, व्यायामा करण्यासाठी खुली ठेवण्यासही मान्यता देण्यात आली आहे.
सर्व खाजगी आणि शासकिय कार्यालये पूर्ण क्षमतेने सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र प्रवासादरम्यान गर्दी होणार आणि अशा वेळेत ही सर्व कार्यालये सुरु ठेवण्याची अट घालण्यात आली आहे. तसेच कार्यालयांच्या वेळा वेगवेगळ्या ठेवण्याबाबतही सूचना जारी करण्यात आली आहेत.
याशिवाय वर्क फ्रॉम पध्दतीने कामकाज सुरु ठेवण्यासही परवानगी देण्यात आली आहे.
सर्व कृषी कामे, सिव्हील वर्क, औद्योगिक कामे, मालाची ने-आण करण्याची कामे पूर्ण क्षमतेने करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
वातानुकुलीत नसलेली जिम, योगा सेंटर, कटींग सलुन, ब्युटी पार्लर, स्पा ५० टक्के क्षमतेसह रात्री ८ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. हि सर्व दुकाने कामाकाजाच्या दिवशी अर्थात सोमवार ते शुक्रवार रात्री ८ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास, शनिवारी दुपारी ३ पर्यंत आणि रविवारी बंद ठेवण्यास सांगण्यात आले.
मात्र सर्व चित्रपटगृहे, नाट्यगृहे, मल्टीप्लेक्स थिएटर मात्र यापुढेही बंद राहणार आहेत.
याशिवाय राज्यातील सर्व देवस्थाने आणि मंदीरही यापुढेही कायम बंद राहणार आहेत.
शालेय शिक्षण विभाग आणि उच्च तंत्रशिक्षण विभागाने शाळा-कॉलेजसाठी जारी केलेले सर्व नियम यापुढेही लागू राहणार आहेत.
तर सर्व प्रकारची रेस्टॉरंट्स सोमवार ते शुक्रवार या कालावधीत संध्याकाळी ४ वाजेपर्यंत ५० टक्के क्षमतेने सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र त्यानंतर फक्त पार्सल सेवा सुरु ठेवण्यास परवानगी दिली.
या सवलती देतानाच रात्रो ९ ते पहाटे ५ वाजेपर्यंत सर्वच जिल्ह्यांमध्ये कडक निर्बंध कायम राहणार आहे.
वाढदिवसाचे सेलिब्रेशन, राजकिय-सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम, निवडणूक, निवडणूकीचा प्रचार, रॅली, निदर्शने गर्दी टाळून करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
कोविड नियमांचे उल्लंघन करून यापैकी कोणतीही गोष्ट केल्यास संबधितांवर कायदेशीर कडक कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Check Also

अखेर मालदीव बरोबरचे संबध दृढ करण्यासाठी चीन घेतोय पुढाकार

साधारणतः दोन महिन्यापूर्वी मालदीव मधील निवडणूका पार पडल्या या निवडणूकीत भारतीय वंशाचे मोहम्मद मोईझु यांची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *