Breaking News

शाळा आणि महाविद्यालयांना दिवाळीची २० दिवस सुट्टी शिक्षण विभागाकडून आदेश जारी

मुंबईः प्रतिनिधी
मागील जवळपास वर्ष-दिडवर्षापासून बंद असलेल्या शाळा, महाविद्यालये आता कुठे सुरु होत असताना नेमका दिवाळीचा सण आल्याने दिवाळीची सुट्टी किती दिवस द्यायची यावरून शिक्षण विभाग संभ्रमात होते. मात्र आज अखेर मुंबईतील शिक्षण विभागाने एक पत्रक काढत राज्यातील शाळा आणि १२ वी पर्यंतच्या महाविद्यालयांना २० दिवसांची सुट्टी जाहीर केली. १ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर २०२१ या कालावधीत शाळा महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली.
यासंदर्भात शिक्षक भारतीकडून या मागणीचा सातत्याने पाठपुरावा करण्यात येत होता. त्यास अखेर आज यश आले असून त्यानुसार शिक्षण विभागाने अखेर शासन निर्णय जाहिर केला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद राहील्याने दिवाळीनिमित्त नेमके किती दिवसांची सुट्टी जाहिर करायची याबाबतचा निर्णय शालेय शिक्षण विभागाकडून घेण्यात आला नव्हता. त्यामुळे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांच्यामध्ये संभ्रमाचे वातावरण होते. दिवाळीचा निश्चित कालावधी किती? त्यात सुट्टी नेमकी किती दिवस? असे अनेक प्रश्न होते. त्यामुळे शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे यांनी २१ ऑक्टोबर रोजी मुंबईचे शिक्षण उपसंचालक यांना याबाबत पत्र लिहलं होतं. शिक्षण उपसंचालक यांनी आज सकाळीच याबाबत उत्तर, पश्चिम, दक्षिण तिन्ही शिक्षण निरीक्षकांना सुट्टीचा कालावधी जाहीर करण्याबाबत स्पष्ट सूचना दिल्या होत्या, त्यानुसार आता सुट्टी जाहीर आहे. त्यामुळे मुख्याध्यापक, शिक्षक, विदयार्थी, पालक सर्वांनाच दिलासा मिळाला आहे.

Check Also

न्यायालयाचे आदेश: वानखेडे आणि मलिक दोघांनीही आपले म्हणणे सिध्द करा अब्रु नुकसानीच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश

मुंबई: प्रतिनिधी एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव कचरू वानखेडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *